राजस्थानमधील बांसवाडा येथे विकासकामांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
September 25th, 02:32 pm
आपणा सर्वांना जय गुरु! राम-राम! राज्यपाल श्रीमान हरिभाऊ बागडे जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधराराजे जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, आमच्यासोबत जोधपूरहून उपस्थित असणारे बंधू गजेंद्र सिंह शेखावत जी आणि अश्विनी वैष्णव जी, बीकानेरहून आमच्या सोबत असणारे अर्जुन राम मेघवाल जी, येथे उपस्थित उप मुख्यमंत्री प्रेम चंद बैरवा जी, दिया कुमारी जी, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मदन राठौड़ जी, राजस्थान सरकार मधले मंत्री, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधील बंसवाडा येथे 1,22,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 25th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बंसवाडा येथे 1,22,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी बंसवाडा येथील त्रिपुरा सुंदरी मातेच्या पवित्र भूमीला भेट देण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे ते यावेळी म्हणाले. कंथाल आणि वागदची गंगा म्हणून पूजनीय असलेल्या माँ माहीचे दर्शन घेण्याची संधी आपल्याला मिळाली, असे त्यांनी सांगितले. माहीचे पाणी भारतातील आदिवासी समुदायांच्या लवचिकतेचे आणि संघर्षाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी महायोगी गोविंद गुरुजी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर प्रकाश टाकला, ज्यांचा वारसा आजही प्रतिध्वनित होत आहे, आणि माहीचे पवित्र पाणी त्या महान गाथेची साक्ष देत आहे. मोदी यांनी माता त्रिपुरा सुंदरी आणि माता माही यांना आदरांजली वाहिली आणि भक्ती आणि शौर्याच्या भूमीतून महाराणा प्रताप आणि राजा बन्सिया भिल यांच्या प्रति आदर भाव व्यक्त केला.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली
February 11th, 01:45 pm
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.पंडित दीनदयाळ उपाध्यायजी हे एक दूरदृष्टी असलेले विचारवंत होते ज्यांनी स्वतःला भारताच्या सेवेसाठी समर्पित केले. समाजात शेवटच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीचा उध्दार करण्याचे त्यांचे तत्वज्ञान सशक्त राष्ट्र उभारणीच्या दिशेने होत असलेल्या आमच्या प्रवासाला प्रेरणा देत आहे, असे मोदी यांनी यात नमूद केले आहे.वाराणसी - पंडित दीनदयाळ उपाध्याय (DDU) जंक्शन रेल्वे मार्गावर अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारण्यासह, गंगा नदीवरील नवीन रेल्वे तसेच रस्ते मार्ग पूल (rail-cum-road bridge) उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 16th, 03:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाद्वारे प्रस्तावित 2,642 कोटी रुपये (अंदाजे) इतक्या एकूण अंदाजित खर्चाच्या एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आज मंजुरी दिलेला प्रस्तावित प्रकल्प बहुपदरी - मार्गिकांविषयीचा (multi - tracking) असून, या प्रकल्पामुळे रेल्वेचे परिचालन सुलभ होणार असून, त्यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होऊ शकणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक वर्दळ असलेल्या विभागांमधील आवश्यक पायाभूत सोयी सुविधांचा विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यांतर्गत राबवला जाणार आहे.