उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 25th, 10:22 am
यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये सहभागी झालेले सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण मित्रांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. येथे 2200 पेक्षा अधिक प्रदर्शक आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे प्रदर्शन करत आहेत, याचा मला आनंद वाटत आहे. यंदाच्या ट्रेड शोचा भागीदार देश रशिया आहे. म्हणजेच, या ट्रेड शोच्या माध्यमातून आपण काळाच्या कसोटीवर पारखलेली एक भागीदारी आणखी बळकट करत आहोत. मुख्यमंत्री योगीजींना, सरकारमधील इतर सर्व सहकाऱ्यांना आणि हितधारकांना या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला केले संबोधित
September 25th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 याचे आज उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण प्रतिनिधींचे स्वागत केले.या कार्यक्रमात 2,200 हून अधिक प्रदर्शक त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. रशिया हा या व्यापार प्रदर्शनातील भागीदार देश आहे, जो काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भागीदारीच्या सबलीकरणावर भर देतो, असे मोदींनी यावेळी अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शासकीय अधिकारी आणि इतर भागधारकांचे अभिनंदन केले. हा दिवस पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी आला आहे,ज्यांनी राष्ट्राला अंत्योदय - म्हणजे तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी मार्गदर्शन केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.अंत्योदय म्हणजे विकास हा गरिबातल्या गरीबापर्यंत पोहोचणे, सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करणे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि भारत आता जगाला सर्व समावेशक विकासाचे हेच प्रारुप असल्याचे दाखवून देत आहे,असे ते पुढे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथे ‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
September 20th, 11:00 am
आपल्या भावनगरने तर अगदी ‘धमाका‘च केला आहे, हे आत्ता लक्षात आले. आज इथे मला मंडपाबाहेर जनसागर - जणू माणसांचा समुद्र दिसतोय. इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी आले आहात, त्यासाठी आपल्या सर्वांचा खूप-खूप आभारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमाला केले संबोधित; भावनगर, गुजरात येथे 34,200 कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भावनगर इथे 34,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमात केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सर्व मान्यवर आणि उपस्थित जनतेचे स्वागत केले. 17 सप्टेंबर रोजी मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा उल्लेख करत, लोकांकडून मिळालेले प्रेम हा उर्जेचा मोठा स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वकर्मा जयंतीपासून गांधी जयंतीपर्यंत, म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत, देश 'सेवा पंधरवडा' साजरा करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांत गुजरातमध्ये अनेक सेवाभावी उपक्रम झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. शेकडो ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, आतापर्यंत एक लाख व्यक्तींनी रक्तदान केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अनेक शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून, लाखो नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यभरात 30,000 हून अधिक आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत, तिथे सामान्य जनतेला आणि विशेषतः महिलांना वैद्यकीय तपासणी आणि उपचार पुरवले जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी देशभरातील सेवा उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले आणि आभार मानले.राजस्थानमधील बिकानेर येथे विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 22nd, 12:00 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीयुत भजन लाल जी, माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधरा राजे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, अर्जुन राम मेघवाल जी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी जी, प्रेमचंद जी, राजस्थान सरकारमधील अन्य मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी मदन राठौर जी, अन्य खासदार आणि आमदारगण, आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधल्या बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले
May 22nd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना, त्यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे स्वागत केले आणि 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून ऑनलाईनरित्या लक्षणीय संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे कौतुक केले. त्यांनी अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले. देशभरातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेल्या सर्व मान्यवर आणि नागरिकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 06th, 02:00 pm
तमिळनाडूचे राज्यपाल एन. रवि, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, तमिळनाडू सरकारचे मंत्री, खासदार, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन
April 06th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.'महाराष्ट्रातील वाढवण येथे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदराच्या विकासाला' केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
June 19th, 09:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे मोठे बंदर उभारण्यास मंजुरी दिली. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) यांनी अनुक्रमे 74% आणि 26% समभागांद्वारे स्थापन केलेली विशेष उद्देश वाहन एसपीव्ही, वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (व्हीपीपीएल) द्वारे हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील बारमाही ग्रीनफिल्ड डीप ड्राफ्ट प्रमुख बंदर म्हणून विकसित केले जाईल.Today, Ramlala sits in a grand temple, and there is no unrest: PM Modi in Karakat, Bihar
May 25th, 11:45 am
Prime Minister Narendra Modi graced the historic lands of Karakat, Bihar, vowing to tirelessly drive the nation’s growth and prevent the opposition from piding the country on the grounds of inequality.बिहारमध्ये पाटलीपुत्र, करकट आणि बक्सर येथील सभांना जमलेल्या उत्साही जनसमुदायाला पीएम मोदींनी संबोधित केले
May 25th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या पाटलीपुत्र, करकट आणि बक्सर या ऐतिहासिक भूमीत घेतलेल्या सभांमध्ये देशाच्या विकासाला अथकपणे चालना देण्याचे आणि असमानतेच्या आधारावर विरोधकांना देशाची फाळणी करण्यापासून रोखण्याचे आश्वासन दिले.Only BJP can provide the pace of development needed for the country: PM Modi in Ajmer
April 06th, 03:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public gathering in Ajmer, Rajasthan, highlighting the rich cultural heritage and significant strides towards development in the region of Ajmer-Nagaur. Speaking on the auspicious occasion of the Sthapana Diwas of the BJP, PM Modi emphasized the spiritual significance and valorous history of the region, paying homage to revered figures like Veer Tejaji Maharaj, Meera Bai, and Prithviraj Chauhan.Prime Minister Narendra Modi addresses a public meeting in Ajmer, Rajasthan
April 06th, 02:30 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public gathering in Ajmer, Rajasthan, highlighting the rich cultural heritage and significant strides towards development in the region of Ajmer-Nagaur. Speaking on the auspicious occasion of the Sthapana Diwas of the BJP, PM Modi emphasized the spiritual significance and valorous history of the region, paying homage to revered figures like Veer Tejaji Maharaj, Meera Bai, and Prithviraj Chauhan.पंतप्रधान 12 मार्च रोजी गुजराथ आणि राजस्थानला देणार भेट
March 10th, 05:24 pm
पंतप्रधान 12 मार्च 2024 रोजी गुजरात आणि राजस्थानला भेट देणार आहेत. साधारण सकाळी सव्वानऊ वाजता पंतप्रधान 85,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर दहा वाजता पंतप्रधान साबरमती आश्रमाला भेट देतील, तिथे ते कोचरब आश्रमाचे उद्घाटन करतील तसेच गांधी आश्रम स्मारकाच्या मुख्य आराखड्याचे अनावरणही करतील. त्यानंतर पावणेदोन वाजता पंतप्रधान राजस्थानात पोखरण येथे भारत शक्ती या संयुक्त आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणाऱ्या तिन्ही दलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेच सरावाचे प्रात्यक्षिक बघतील.The egoistic Congress-led Alliance intends to destroy the composite culture of Santana Dharma in both Rajasthan & India: PM Modi
September 25th, 04:03 pm
PM Modi addressed the Parivartan Sankalp Mahasabha in Jaipur, Rajasthan. While addressing the event PM Modi recalled Pt. Deendayal Upadhyaya on his birth anniversary. He said, “It is his thoughts and principles that have served as an inspiration to put an end to the Congress-led misrule in Rajasthan.PM Modi addresses the Parivartan Sankalp Mahasabha in Jaipur, Rajasthan
September 25th, 04:02 pm
PM Modi addressed the Parivartan Sankalp Mahasabha in Jaipur, Rajasthan. While addressing the event PM Modi recalled Pt. Deendayal Upadhyaya on his birth anniversary. He said, “It is his thoughts and principles that have served as an inspiration to put an end to the Congress-led misrule in Rajasthan.रेल्वेने या आर्थिक वर्षात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक नोंदवली
April 04th, 10:15 am
रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षात 1512 मेट्रीक टन इतकी मालवाहतूक केली आहे. ही रेल्वेच्या इतिहासातली आत्तापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक असल्याची माहीती केन्द्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण जारी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 17th, 05:38 pm
स्वातंत्र्याच्या अमृत काळात आज देशाने विकसित भारताच्या उभारणीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. भारतात शेवटच्या टोकापर्यंत मालाचे जलद वितरण सुनिश्चित करणे , वाहतुकीशी संबंधित समस्या दूर करणे , उत्पादकांचा वेळ आणि पैशाची बचत करणे , कृषी मालाची नासधूस रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणजे आजचे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण आहे आणि आणि मला विश्वास आहे की आपल्या या व्यवस्थांमध्ये सुधारणांसाठी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी विभागांमध्येही एक समन्वय स्थापित होईल. सर्वांगीण दृष्टिकोन निर्माण होईल. परिणामी या क्षेत्राला अपेक्षित गती मिळेल.PM launches National Logistics Policy
September 17th, 05:37 pm
PM Modi launched the National Logistics Policy. He pointed out that the PM Gatishakti National Master Plan will be supporting the National Logistics Policy in all earnest. The PM also expressed happiness while mentioning the support that states and union territories have provided and that almost all the departments have started working together.पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातला भेट देणार
June 16th, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 18 जूनला सकाळी सव्वा नऊ च्या सुमाराला पंतप्रधान, पावागडच्या टेकडीवरील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री कलिका माता मंदिराचे लोकार्पण करतीत आणि देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर साडेअकरा वाजता ते ‘विरासत वन’ ला भेट देतील. त्यानंतर, साधारण साडेबाराच्या सुमाराला ते वडोदरा इथे गुजरात गौरव दिन या कार्यक्रमात सहभागी होतील. इथे त्यांच्या हस्ते, 21000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, तसेच काही प्रकल्पांचे उद्घाटनही ते करतील.