केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के अतिरिक्त महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा देण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

October 01st, 03:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त तीन टक्के महागाई भत्ता देण्याला आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा देण्याला मंजुरी दिली. वाढत्या महागाईतून दिलासा म्हणून सध्याच्या मूळ वेतन / निवृत्ती वेतनावरील 55 टक्के महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ जाहीर करण्यात आली असून ती 01.07.2025 पासून लागू होणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा निधीचा अतिरिक्त हप्ता 01.01.2025 पासून जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

March 28th, 04:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा (डीआर) निधीचा अतिरिक्त हप्ता 01.01.2025 पासून जारी करायला मंजुरी दिली. महागाईची भरपाई करण्यासाठी मूळ वेतन /निवृत्तीवेतनच्या सध्याच्या 53% दरात ही 2% वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या तीन टक्के अतिरिक्त हप्ता आणि निवृत्तिवेतनधारकांना महागाई दिलासा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 16th, 03:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा (डीए) अतिरिक्त हप्ता आणि निवृत्तिवेतनधारकांना महागाई दिलासा (डीआर) मंजूर केला आहे. दिनांक 01.07.2024 पासून हे लागू असून भाववाढीची भरपाई करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ही सवलत मूळ वेतन/निवृत्तिवेतनाच्या 50% च्या विद्यमान दरापेक्षा तीन टक्के (3%) वाढ दर्शविते.

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना महागाई भत्ता तसेच महागाई सवलतीच्या अतिरिक्त हप्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

March 07th, 08:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा (DA) अतिरिक्त हप्ता आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई सवलत (DR) जारी करण्यास मंजुरी दिली आहे. ही सवलत 1.1.2024 पासून लागू करण्यात आली आहे. भाव वाढीची भरपाई करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ही सवलत मूळ वेतन किंवा निवृत्तीवेतनाच्या 46% म्हणजे विद्यमान दरापेक्षा 4% ची वाढ दर्शविते.