पंतप्रधानांनी दिल्लीच्या ईशान्य भागातल्या दयालपूरमध्ये इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला

April 19th, 09:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईशान्य दिल्लीतल्या दयालपूर भागात इमारत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) कडून 2 लाख रुपयांचे सहाय्य आणि जखमींना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.