दांडी यात्रेत सहभागी झालेल्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
March 12th, 10:34 am
आजच्याच दिवशी 1930 मध्ये झालेल्या दांडी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मी तुमच्याशी 'मन की बात' मधून संवाद साधत आहे, मात्र माझे मन अतिशय व्यथित आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति प्रत्येक भारतीयाच्या मनात सहानुभूती आहे. भले ते कुठल्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, मात्र या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे दुःख त्यांना जाणवत आहे. मला जाणीव आहे, दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रं पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळलं आहे. पहलगाममधील या हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, युवकांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र देशाच्या शत्रूंना हे पसंत नव्हतं. दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादाविरोधातल्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हीच एकता दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले संकल्प अधिक बळकट करायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल. आज जग पाहत आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे.Mahakumbh has strengthened the spirit of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat’ by uniting people from every region, language, and community: PM Modi
March 18th, 01:05 pm
PM Modi while addressing the Lok Sabha on Mahakumbh, highlighted its spiritual and cultural significance, likening its success to Bhagirath’s efforts. He emphasized unity, youth reconnecting with traditions, and India's ability to host grand events. Stressing water conservation, he urged expanding river festivals. Calling it a symbol of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat,’ he hailed Mahakumbh’s legacy.महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी सांगतेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत संबोधन
March 18th, 12:10 pm
उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी सांगतेनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनामध्ये योगदान दिलेल्या देशातल्या असंख्य नागरिकांप्रती त्यांनी कृतज्ञताभाव व्यक्त केला. महाकुंभच्या यशात विविध व्यक्ती आणि संस्थांचा वाटा असल्याचे अधोरेखित करुन यामध्ये सहभागी सरकार, समाज आणि सर्व समर्पित कामगारांचे त्यांनी आभार मानले. देशभरातून आलेल्या भाविकांचे आभार मानताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाविकांचा विशेष उल्लेख केला, त्यातही प्रयागराजमधील भाविकांनी दिलेल्या अमूल्य पाठिंब्यासाठी आणि सहभागासाठी त्यांचे विशेष आभार मानले.पंतप्रधानांनी महात्मा गांधी आणि दांडी यात्रेत जे सहभागी झाले होते त्यांना केले अभिवादन
March 12th, 09:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्या सर्वांना अभिवादन केले जे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा अध्याय ठरलेल्या दांडी यात्रेत सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेने देशभरात स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या देशव्यापी चळवळीची मशाल प्रज्वलित केली, असे मोदी यांनी सांगितले. जे लोक दांडी यात्रेत सहभागी झाले त्या सर्वांचे धैर्य, त्याग आणि सत्य आणि अहिंसेप्रति अविचल बांधिलकी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मोदी म्हणाले.