Odisha is emerging as a gateway to growth and prosperity in eastern India: PM Modi in Pahadpur

June 20th, 01:10 pm

The President, Smt. Droupadi Murmu and the Prime Minister, Shri Narendra Modi visited Pahadpur village in Mayurbhanj district today. The President and the Prime Minister offered prayers at the sacred groves Santhali Jahera and Ho Jahera, Skill Centre and Pahadpur School. The President and Prime Minister participated in a programme at Rairangpur in Mayurbhanj district, marking the completion of two years of the Government of Odisha. The theme of the programme is “Vikas ra Dhara, Odisha Sara”. Shri Modi inaugurated and laid the foundation stone of various development projects worth over ₹47,600 crore.

ओदिशा राज्य सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

June 20th, 01:00 pm

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या पवित्र उपवनांत, तसेच हो जाहेरा कौशल्य केंद्रात आणि पहाडपूर शाळेत जाऊन प्रार्थना केली. यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतला. ओदिशा राज्य सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विकास रा धारा, ओदिशा सारा अशी या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2A ला (कोटेश्वर रोड ते विमानतळ कॉरिडोअर) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 10th, 01:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2(A) ला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 5 स्थानकांचा (4 उन्नत आणि 1 भूमिगत) समावेश असलेला 6.032 किलोमीटर लांबीचा कॉरिडोअर बांधला जाणार आहे. टप्पा 2(A) कार्यान्वित झाल्यानंतर, अहमदाबाद-गांधीनगर दरम्यान एकूण 77.63 किलोमीटरचे सक्रिय मेट्रो रेल्वेचे जाळे स्थापित होणार आहे. आश्रम रोड, कोटेश्वर प्राचीन मंदिर, साबरमती रिव्हर, सरदार नगर आणि एअरपोर्ट अशी या टप्पा 2(A) कॉरिडोअरअंतर्गतच्या पाच स्थानकांची नावे आहेत.

From waste to wealth: PM Modi showcases Surat’s green development model

June 05th, 04:30 pm

At the launch of development projects in Surat, Gujarat, PM Modi called upon all elected representatives of local bodies to work even harder for the state's progress. Expressing pride in Surat being one of the cleanest cities in the country, he lauded the continuous efforts of all stakeholders. He credited Gujarat for its significant contribution to India's energy self-reliance, noting that the state produces one-fifth (50 GW) of the nation's 250 GW renewable energy capacity.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील सुरत येथे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचे उदघाटन, पायाभरणी आणि लोकार्पण

June 05th, 04:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सुरत येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थित मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे त्यांच्या अढळ पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मी प्रथमच सुरतला भेट देत आहे. सुरत मधून मी संपूर्ण गुजरात मधील जनतेला अभिवादन करतो आणि अभिनंदन करतो असे पंतप्रधान म्हणाले.

बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 व 231 वरील खगडिया–पूर्णिया मार्गाचे चौपदरीकरण करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; 143.529 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ₹3,936.05 कोटी खर्च अपेक्षित, प्रकल्पाची उभारणी बीओटी (टोल) तत्वावर

June 03rd, 03:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 आणि 231 च्या खगडिया-पूर्णिया टप्प्याचे बीओटी (BOT - Toll) तत्त्वावर चौपदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. 143.529 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 3,936.05 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

भारताच्या पंतप्रधानांच्या नेदरलँड्स भेटीनिमित्त भारत-नेदरलँड्स संयुक्त निवेदन

May 17th, 03:45 am

16 मे रोजी सकाळी नेदरलँड्सचे राजे विलियम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांनी द्विपक्षीय बैठकीसाठी हेग येथील ह्युस्टन बॉस रॉयल पॅलेस येथे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. महाराजांनी पंतप्रधान मोदींसमवेत भोजन घेतले.

पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) दौरा

May 15th, 03:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे अधिकृत भेट दिली. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले, आणि त्यांना औपचारिक मानवंदना देण्यात आली.

पंतप्रधान 10 मे रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार

May 09th, 11:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे 2026 रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी साधारण 11 वाजता बंगळूरु येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होतील आणि याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होतील आणि दुपारी 3 च्या सुमारास ते, अंदाजे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगीही ते उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी 3:45 वाजता पंतप्रधान हैदराबादमधील सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील.

Ganga Expressway to become new lifeline of Uttar Pradesh’s development: PM Modi in Hardoi

April 29th, 11:35 am

PM Modi inaugurated the 594-km access-controlled Ganga Expressway in Hardoi, calling it a new lifeline for Uttar Pradesh’s development that will boost connectivity, support farmers and create industrial opportunities across multiple districts. He said the expressway will also bring the possibilities of the NCR closer and strengthen the state’s role in the journey towards Viksit Bharat.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेशात हरदोई इथे, 594 किमी लांबीच्या प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन

April 29th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील हरदोई इथे 594 किमी लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड गंगा द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी, भगवान नरसिंह यांच्या पवित्र भूमीला वंदन करून आणि जवळच वाहणाऱ्या गंगामातेच्या दैवी उपस्थितीचा उल्लेख करून केली. संपूर्ण उत्तरप्रदेश, गंगा नदीच्या आध्यात्मिक आणि पालनपोषण करणाऱ्या कृपेने पवित्र झालेले तीर्थक्षेत्र असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “उत्तर प्रदेशाला लाभलेले द्रुतगती मार्ग स्वतः गंगामातेचे आशीर्वाद आहेत,” असे मोदी म्हणाले. या द्रुतगती मार्गामुळे पवित्र स्थळांपर्यंतचा प्रवास काही तासांत शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान 28-29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर

April 26th, 03:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28-29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी साधारण 5 वाजता, पंतप्रधान महिला संमेलनामध्ये सहभागी होतील. येथे ते वाराणसीमधील सुमारे ₹6,350 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

सातत्यपूर्ण सागरी विमा संरक्षण सुलभ करण्यासाठी 12980 कोटी रुपयांच्या सार्वभौम हमीसह 'भारत सागरी विमा संकोष' तयार करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

April 18th, 03:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सातत्यपूर्ण सागरी विमा संरक्षण सुलभ करण्यासाठी 12,980 कोटी रुपयांच्या सार्वभौम हमीसह 'भारत सागरी विमा संकोष' या नावाने देशांतर्गत विमा संकोष तयार करण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. अगदी अस्थिर सागरी कॉरिडॉरमधून प्रवास करतानाही कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून भारतीय बंदरांपर्यंत आणि त्याउलट माल वाहून नेणाऱ्या जहाजांसाठी भारतीय व्यापाराला परवडणाऱ्या दरात विमा संरक्षण उपलब्ध असेल, याची खातरजमा भारत सागरी विमा संकोषामुळे होणार आहे.

TMC is Anti-North Bengal, Anti-tribal, Anti-tea garden, Anti-women & Anti-youth: PM Modi in Siliguri

April 12th, 01:15 pm

Ahead of the West Bengal Assembly elections, Prime Minister Narendra Modi today turbocharged the BJP’s campaign with a high-energy address in Siliguri, drawing massive public support. Addressing a packed rally in North Bengal, the PM launched a scathing attack on the ruling All India Trinamool Congress (TMC), accusing it of corruption, neglect and fostering a climate of fear.

PM Modi’s high-energy speech electrifies the Siliguri crowd

April 12th, 01:00 pm

Ahead of the West Bengal Assembly elections, Prime Minister Narendra Modi today turbocharged the BJP’s campaign with a high-energy address in Siliguri, drawing massive public support. Addressing a packed rally in North Bengal, the PM launched a scathing attack on the ruling All India Trinamool Congress (TMC), accusing it of corruption, neglect and fostering a climate of fear.

केंद्रीय मंत्रिमंडळाची जयपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

April 08th, 04:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मंजुरी मिळाली. या टप्प्याअंतर्गत प्रल्हादपुरा ते तोडी मोड हा 41 किलोमीटर लांबीचा हा परिवर्तनकारी उत्तर-दक्षिण कॉरिडॉर बांधला जाणार आहे. या मार्गावर 36 मेट्रो स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 13,037.66 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे. राजस्थान मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल. हा प्रकल्प केंद्र आणि राजस्थान सरकारचा संयुक्त उपक्रम असून, यात दोघांचाही वाटा 50:50 असणार आहे.

गुजरातमधील साणंद येथील केन्स सेमिकाॅन प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

March 31st, 01:05 pm

गेल्या महिन्याच्या अखेरीस मी साणंदला आलो होतो आणि या महिना अखेरीस देखील साणंदमध्ये उपस्थित आहे. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी माइक्रोन प्रकल्पातून उत्पादनाची सुरुवात झाली आणि आज 31 मार्च रोजी केन्स टेक्नॉलॉजीयुक्त सेमीकंडक्टर प्रकल्पातून उत्पादन सुरू झाले आहे.हा केवळ योगायोग नाही तर भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था कशा गतीने, किती जलद, किती वेगाने काम करत आहे याचे हे उदाहरण आहे. रमेश रघु आपले अभिनंदन! गुजरात सरकार तसेच या प्रकल्पांवर काम करणाऱ्या सर्वांचेच आणि माझ्या मित्रांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये साणंद येथे 'केन्स सेमीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये साणंद येथे 'केन्स सेमीकॉन' प्रकल्पाचे उद्घाटनकॉन' प्रकल्पाचे उद्घाटन

March 31st, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद येथे 'केन्स टेक्नॉलॉजी'च्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन केले; यासह या प्रकल्पातील उत्पादनास औपचारिक सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी 'मायक्रॉन' प्रकल्पातील उत्पादनाच्या प्रारंभासाठी आपण साणंद येथे उपस्थित होतो आणि बरोबर एका महिन्यानंतर 'केन्स'च्या या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आपण पुन्हा येथे आलो आहोत, या बाबीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रगतीला प्राप्त झालेल्या गतीवर विशेष भर दिला. हा केवळ एक योगायोग नाही, तर भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था ज्या वेगाने विकसित होत आहे, त्याचा हा एक ठोस पुरावा आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

'आर्थिक विकास शाश्वत आणि बळकट करताना' या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांचे संबोधन

March 03rd, 11:30 am

गेल्या आठवड्यात, अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील पहिल्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते आणि तो यशस्वी झाला असे मला कळले आहे, आणि अर्थसंकल्पामधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक खूप चांगल्या सूचना दिल्या, सर्वांच्या सक्रिय सहभागीचे मी स्वागत करतो आणि आज या मालिकेतल्या दुसऱ्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मला सांगण्यात आले आहे की, हजारोंच्या संख्येने, अनेक विषयांवर असंख्य लोक आपल्या सूचना देणार आहेत. विषय तज्ज्ञही यामध्ये सहभाग घेणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पावर चर्चा होणे, हा नक्कीच मोठा यशस्वी प्रयोग आहे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या वेबिनरमध्ये सहभागी झाला आहात. मी आफल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपले स्वागत करतो. या वेबिनारचे विषयसूत्र देशाच्या आर्थिक विकासाला सातत्यपूर्ण बळकटी देणे असा आहे. आज, देश आपल्या बळकट अर्थव्यवस्थेमुळे साऱ्या जगाचे आशास्थान झाला आहे, आज जेव्हा जागतिक पुरवठा साखळीची पुनर्रचना होते आहे, तेव्हा अर्थव्यवस्थेची वेगाने होणारी प्रगती विकसित भारताचा मोठा आधार आहे. आमची दिशा स्पष्ट आहे, आमचा संकल्प स्पष्ट आहे, अधिक निर्मिती, अधिक उत्पादन, अधिक संपर्क आणि आता गरज आहे ती अधिक निर्यातीची आणि आज तु्म्हा सर्वांमध्ये निश्चितच विचारमंथन होणार आहे, या विचार मंथनातून येणाऱ्या सूचना यामध्ये मोठी भूमिका बजावतील.

आर्थिक विकासाची शाश्वतता आणि बळकटीकरण या विषयावरील वेबीनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

March 03rd, 11:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्प वेबीनार मालिकेच्या दुसऱ्या भागात संबोधित करताना “शाश्वत आणि बळकट आर्थिक विकास” या संकल्पनेवर भर दिला. मागील आठवड्यातील प्रगतीचा आढावा घेताना पहिले वेबिनार अतिशय यशस्वी ठरल्याचे आणि त्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत उत्तम सूचना देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सध्याचे वेबिनार हे देशाच्या आर्थिक विकासासाठी सलग बळ देण्याशी संबंधित आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.