2026 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
December 12th, 04:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने 2026 हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना किफायतशीर किंमत देण्यासाठी, सरकारने 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली होती की, सर्व अनिवार्य पिकांसाठी किमान आधारभूत किंमत अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर निश्चित केला जाईल. सरासरी गुणवत्तेच्या किसलेल्या खोबऱ्याची किमान आधारभूत किमत प्रति क्विंटल 12,027 रुपये आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल 12,500 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.2024 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला मंत्रिमंडळाची मंजुरी
December 27th, 03:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2024 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला (एम. एस. पी.) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी सर्व अनिवार्य पिकांची एमएसपी अखिल भारतीय उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट पातळीवर निश्चित केली जाईल अशी घोषणा सरकारने 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली होती.