ब्राझीलच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनाचा मराठी मजकूर
July 08th, 08:30 pm
रिओ आणि ब्राझिलियामध्ये अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष लुला यांचे मनापासून आभार मानतो. अमेझॉनच्या सौंदर्याने आणि तुमच्या सह्रदयतेने आम्ही खरोखरच प्रभावित झालो आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला केले संबोधित
July 07th, 11:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला संबोधित केले. या सत्राला ब्रिक्स समूहातील सदस्य देश, भागीदार राष्ट्र आणि आमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विषयांवर अधिवेशन आयोजित केल्याबद्दल त्यांनी ब्राझीलचे आभार मानले. भारतासाठी हवामान बदल हा केवळ ऊर्जेशी निगडित प्रश्न नसून जीवन आणि निसर्ग यांच्यातील समतोलावर परिणाम करणारा प्रश्न आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. हवामान न्याय या मुद्द्याकडे भारत नैतिक जबाबदारी या दृष्टिकोनातून बघत असून ती पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. हवामानाशी सुसंगत कृतीसाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध असून त्यादिशेने नागरिक आणि आपल्या वसुंधरेच्या समृद्धी आणि विकासाकरता भारत, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैवइंधन आघाडी, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स, मिशन लाईफ, एक पेड माँ के नाम इत्यादी उपक्रम राबवत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.ब्रिक्स सत्रात पर्यावरण, सीपीओ-30 आणि जागतिक आरोग्य विषयावर पंतप्रधानांचे निवेदन
July 07th, 11:13 pm
मला आनंद आहे की ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली, ब्रिक्सने (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) पर्यावरण आणि आरोग्य सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना उच्च प्राधान्य दिले आहे. हे विषय केवळ परस्पर संबंधित नाहीत, तर मानवतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.रिओ दि जानेरो येथील G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
November 20th, 08:05 pm
रिओ दि जानेरो येथे सुरु असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची भेट घेतली.