राष्ट्रकुल देशांतील लोकसभांचे सभापती तसेच अध्यक्ष यांच्या 28 व्या परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 15th, 11:00 am

लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंशजी, आंतर-संसदीय संघाच्या अध्यक्ष तुलिया अॅकसन, राष्ट्रकुल संसदीय संघटनेचे अध्यक्ष ख्रिस्तोफर कलीला, राष्ट्रकुल सदस्य देशांचे सभापती आणि अध्यक्ष, इतर प्रतिनिधी आणि सभ्य स्त्रीपुरुषहो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान सदनाच्या मध्‍यवर्ती सभागृहामध्ये राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे केले उद्घाटन

January 15th, 10:32 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील संसद भवन परिसरातील संविधान सदनाच्या मध्‍यवर्ती सभागृहामध्ये राष्ट्रकुल देशांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे (सीएसपीओसी) उद्घाटन केले. संसदीय लोकशाहीमध्ये सभापतींची भूमिका अद्वितीय असते, असे पंतप्रधान मोदी याप्रसंगी बोलताना म्हणाले. सभापतींना जास्त बोलण्याची संधी मिळत नाही, परंतु त्यांची जबाबदारी इतरांचे ऐकणे आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याची संधी मिळेल याची खात्री करणे ही असते, हे त्यांनी अधोरेखित केले. गोंगाट करणाऱ्या किंवा अतिउत्साही सदस्यांनाही हसतमुखाने हाताळणे हा सभापतींचा समान गुणधर्म आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे करणार उद्घाटन

January 14th, 11:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील संसद भवन संकुलातील संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रकुलमधील सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे (सीएसपीओसी) उद्घाटन करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.