नांदेडमधील दुर्घटनेत झालेल्या जिवीतहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

September 11th, 09:11 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

दिल्लीतील सत्य निकेतन येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

September 06th, 08:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील सत्य निकेतन येथे इमारत कोसळल्याच्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

प्रसिद्ध गुजराती संगीतकार गौरांग व्यास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

September 03rd, 12:25 pm

गुजराती संगीत जगतातील प्रसिद्ध संगीतकार गौरांग व्यास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मध्य प्रदेशातील रीवा येथे दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

September 02nd, 07:46 pm

मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

कौशांबी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

August 31st, 10:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती त्यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे तसेच जखमी तत्काळ बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

नॉर्वेचे राजे महामहीम हॅराल्ड पंचम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

August 28th, 04:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे राजे महामहीम हॅराल्ड पंचम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या वर्षाच्या सुरुवातीला नॉर्वेच्या दौऱ्यादरम्यान महामहीम राजांसमवेत झालेल्या भेटीचा आठवण काढत, मोदी यांनी त्यांच्यातील स्नेहभाव आणि नॉर्वेचे लोक आणि राष्ट्र यांच्याप्रती असलेली त्यांची निस्सीम सेवावृत्ती यांचे स्मरण केले.

ए. बालकृष्णन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

August 27th, 12:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून सेवा बजावलेल्या ए. बालकृष्णन जी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. बालकृष्णन यांनी आपल्या आयुष्याची पाच दशकांहून अधिक वर्षे स्वामी विवेकानंदांच्या आदर्श आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित केली होती, याची आठवण पंतप्रधानांनी काढली. ईशान्य भारताशी त्यांचे विशेष आणि सखोल नाते होते. शैक्षणिक, सामाजिक तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेपाळच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून चर्चा

August 26th, 06:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधूभगिनींसोबत एकजुटीने उभी आहे, असे मोदी यांनी सांगितले.

तेलंगणातील सूर्यपेट येथे झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

August 26th, 02:21 pm

तेलंगणातील सूर्यपेट येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामना त्यांनी केली आहे.

कोलकाता येथील आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख

August 19th, 02:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पश्चिम बंगालमधील बिरभूम येथील आग दुर्घटनेतील जीवितहानीबाबत पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

August 17th, 01:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये बिरभूम येथील आग दुर्घटनेत नागरिकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी बिहार मधील लखीसराई येथे झालेल्या चेंगराचेंगरीतील जीवितहानीबद्दल केले दुःख व्यक्त

August 17th, 12:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधील लखीसराई येथे झालेल्या चेंगराचेंगरीतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

हिमाचल प्रदेशातील चंबा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

August 08th, 11:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील चंबा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी डी.वाय.पाटील जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

August 04th, 03:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक डी. वाय. पाटील जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डी. वाय. पाटील जींनी नेहमी इतरांचे, विशेषतः गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी काम केले,असे मोदी यांनी म्हटले आहे.

Prime Minister expresses grief over loss of lives due to building collapse in Thane

July 31st, 01:08 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the loss of lives due to the collapse of a building in Thane, Maharashtra.

सिक्कीममधील नामची येथे बोगदा कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख

July 21st, 01:01 pm

सिक्कीममधील नामची येथे बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांनी शोकाकुल कुटुंबांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

July 18th, 09:00 pm

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. चेन्नम्मा त्यांच्या नम्र स्वभावासाठी आणि समाजसेवेप्रती असलेल्या त्यांच्या तळमळीसाठी सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

July 18th, 07:13 pm

गुजरातच्या अहमदाबाद येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

July 13th, 09:55 pm

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांकडून कतारचे माजी अमीर महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

July 12th, 03:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे माजी अमीर महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.