तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतील संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 19th, 04:25 pm
लोकशाही, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीयतेप्रति असलेली सामायिक वचनबद्धता आपल्या दोन्ही देशांना नैसर्गिक भागीदार बनवते. तंत्रज्ञान व शाश्वतता यांमधील सामायिक प्राधान्यक्रम आपल्या संबंधांना अनेक संधी देऊन परिपूर्ण करतात. म्हणूनच, आठ वर्षांपूर्वी, नॉर्डिक देशांसोबतच्या संबंधांना अधिक ऊर्जा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी आपण ही शिखर परिषद घेत आहोत.पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) दौरा
May 15th, 03:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे अधिकृत भेट दिली. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले, आणि त्यांना औपचारिक मानवंदना देण्यात आली.संयुक्त निवेदन: संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भारत भेट
January 19th, 08:10 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी 19 जानेवारी 2026 रोजी भारताला अधिकृत भेट दिली. महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची गेल्या दहा वर्षांतील ही पाचवी भेट असून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची तिसरी भेट आहे.पंतप्रधानांनी ओमानचे महामहिम सुलतान यांची भेट घेतली
December 18th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. राजवाड्यामध्ये आगमन झाल्यावर महामहिम सुलतानांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान प्रदान केला.