पंतप्रधानांनी भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसेच सामाजिक सुरक्षा करार याबाबतचा लेख सामायिक केला
July 15th, 12:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' (सीईटीए ) आणि 'सामाजिक सुरक्षा करार' यांवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला. हा करार भारत-ब्रिटन भागीदारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की, हे दोन करार भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करतील तसेच दोन्ही देशांच्या सामायिक आकांक्षांचे रूपांतर तेथील जनतेसाठी ठोस संधींमध्ये करतील.भारत-युके व्यापक आर्थिक आणि व्यापार करार द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
June 17th, 10:03 pm
भारत-युके व्यापक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलै 2026 पासून अंमलात येणार असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेतील संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांसमोर केलेले निवेदन
October 09th, 11:25 am
पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त, आज त्यांचे इथे- मुंबईमध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.