15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेतील संयुक्त निवेदन: आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी भागीदारी

August 29th, 07:06 pm

जपानचे पंतप्रधान महामहीम इशिबा शिगेरू यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला अधिकृत कार्य भेट दिली. 29 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत पंतप्रधान इशिबा यांनी पंतप्रधान कार्यालयात (कांटेई) केले, जिथे त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दोन्ही पंतप्रधानांनी शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा केली. यावेळी त्यांनी भारत आणि जपानमधील दीर्घकाळापासून कायम राहिलेल्या मैत्रीची आठवण केली, जी ऐतिहासिक संबंध, सामायिक मूल्ये आणि हितसंबंध, समान धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्परांबद्दलचा आदर यामध्ये रुजलेली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी गेल्या दशकात भारत-जपान भागीदारीने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे कौतुक केले आणि आगामी दशकात परस्पर सुरक्षितता आणि समृद्धी साधण्यासाठी धोरणात्मक आणि दूरगामी भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर रचनात्मक चर्चा केली.

पंतप्रधान 22 ऑगस्ट रोजी बिहार आणि पश्चिम बंगालला भेट देणार

August 20th, 03:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ऑगस्ट रोजी बिहार आणि पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. ते सकाळी 11 च्या सुमारास बिहारमधील गया येथे सुमारे 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. तसेच ते दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर, ते गंगा नदीवरील औंटा-सिमरिया पूल प्रकल्पाला भेट देऊन त्याचे उद्घाटन करतील.

संयुक्त निवेदन: भारत आणि ब्राझील - उच्च उद्देश असलेली दोन महान राष्ट्रे

July 09th, 05:55 am

ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जुलै 2025 रोजी ब्राझील दिली. मैत्री आणि विश्वास हा जवळपास आठ दशकांपासून ब्राझील-भारत संबंधांचा पाया राहिला आहे. 2006 मध्ये हे संबंध धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाले.

पंतप्रधानांचा ब्राझील दौरा: फलश्रुति

July 09th, 03:14 am

आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधात सहकार्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहिम ली जे-म्युंग यांची G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट

June 18th, 03:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस येथे 51 व्या जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांची भेट घेतली. भारत आणि कोरियन प्रजासत्ताक वाणिज्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, जहाजबांधणी आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्याचा प्रयत्नशील राहतील, असे पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर परिषदेत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांशी साधला संवाद

June 18th, 02:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस इथे झालेल्या 51 व्या जी-7 शिखर परिषदे दरम्यान युनायटेड किंगडमचे पंतप्रधान,केर स्टार्मर यांच्याशी संवाद साधला. भारत आणि युनायटेड किंगडममधील संबंध अधिक दृढ होत आहेत, यातून व्यापार आणि वाणिज्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी केलेल्या प्रगतीची प्रचिती येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेल्या भाषणाचा अनुवाद

March 12th, 06:07 am

10 वर्षांपूर्वी याच दिवशी मी मॉरिशसला आलो होतो तेव्हा इथे येण्यापूर्वी एकच आठवडा आधी होळी साजरी केली होती. मी इथे येताना भारतातून फागुआचा उत्साह माझ्यासोबत घेऊन आलो होतो. यावेळी मी मॉरिशसमधून होळीचे रंग भारतात घेऊन जाईन. आपण एक दिवसानंतर तिथे होळी साजरी करू. 14 तारखेला चारी दिशांना रंग असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसमधील भारतीय समुदायाला केले संबोधित

March 11th, 07:30 pm

मॉरीशसमधील त्रियानॉन कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरीशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगोलम यांच्यासह मॉरीशसमधील भारतीय समुदाय तसेच भारताचे मित्रगण यांच्या मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमात विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक-सांस्कृतिक संघटना तसेच व्यापार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींसह समग्र भारतीय समुदायाने उत्साहाने भाग घेतला. मॉरीशस सरकारमधील अनेक मंत्री, संसद सदस्य तसेच इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गोव्याचा झुआरी पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्याबद्दल पंतप्रधानांनी गोवेकरांचे केले अभिनंदन

December 23rd, 05:51 pm

गोव्यातला झुआरी पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवेकरांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान आणि ओमानचे सुलतान यांची भेट

December 16th, 09:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान सुलतान हैथम बिन तारिक यांची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला.

पंतप्रधान 26-27 सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार

September 25th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते, 'व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर सुमारे पाऊण वाजता पंतप्रधान बोडेली, छोटा उदयपूर येथे पोहोचणार आहेत. तिथे ते 5200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत.

तुर्कियेच्या राष्ट्र्पतींसमवेत पंतप्रधानांची बैठक

September 10th, 05:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने तुर्कियेचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली.

भारत आता वाणिज्य तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे: पंतप्रधान

May 01st, 03:43 pm

केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्ग मंत्रालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे की जागतिक बँकेच्या एलपीआय 2023 या अहवालातील माहितीनुसार, इतर अनेक देशांपेक्षा भारतातील बंदरांनी कमी वेळेत अधिक चांगल्या पद्धतीने कार्य पूर्ण केले असून त्यांची कार्यक्षमता तसेच उत्पादकता यांना अधिक चालना मिळाली आहे.

अहमदाबाद-महेसाणा या (64.27 किमी) मार्गाच्या गेज परिवर्तनाचे कार्य पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला संतोष

March 06th, 09:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद-महेसाणा या(64.27 किमी) मार्गाच्या गेज परिवर्तनाचा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल संतोष व्यक्त केला आहे.

GIFT City celebrates both wealth and wisdom: PM Modi

July 29th, 03:42 pm

PM Modi laid the foundation stone of the headquarters building of the International Financial Services Centres Authority (IFSCA) in GIFT City, Gandhinagar. The Prime Minister noted that GIFT City was making a strong mark as a hub of commerce and technology. GIFT City celebrates both wealth and wisdom, he remarked.

PM lays foundation stone of IFSCA headquarters at GIFT City in Gandhinagar

July 29th, 03:41 pm

PM Modi laid the foundation stone of the headquarters building of the International Financial Services Centres Authority (IFSCA) in GIFT City, Gandhinagar. The Prime Minister noted that GIFT City was making a strong mark as a hub of commerce and technology. GIFT City celebrates both wealth and wisdom, he remarked.

पंतप्रधानांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

July 06th, 12:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

India-Nepal Joint Vision Statement on Power Sector Cooperation

April 02nd, 01:09 pm

On 02 April 2022, His Excellency Prime Minister Narendra Modi and Rt. Hon'ble Prime Minister Sher Bahadur Deuba had fruitful and wide ranging bilateral discussions in New Delhi.

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराप्रसंगी (IndAus ECTA) दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या स्वाक्षरी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला अभिप्राय

April 02nd, 10:01 am

आज, माझे मित्र स्कॉट यांच्यासोबत एका महिन्यापेक्षाही कमी काळात झालेला हा माझा तिसरा समोरासमोर केलेला संवाद आहे. गेल्या आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या परिषदेत आमची अतिशय फलदायी अशी चर्चा झाली. त्यावेळी, आम्ही आमच्या समूहातील सदस्यांना लवकरात लवकर आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावरील वाटाघाटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आणि आज या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होत असल्याने मला खूप आनंद होत आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मी दोन्ही देशांच्या व्यापार प्रतिनिधींचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार-(IndAus ECTA) वर स्वाक्षरी

April 02nd, 10:00 am

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (“IndAus ECTA”) भारताचेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूकमंत्री डॅन तेहान, यांनी एका आभासी पध्दतीने झालेल्या समारंभात स्वाक्षरी केली.