पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
July 25th, 08:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माले येथील राष्ट्राध्यक्ष कार्यालयात मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले आणि रिपब्लिक स्क्वेअर येथे त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही भेट स्नेहमय होती, आणि दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचा दाखला देणारी होती.मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
July 25th, 06:00 pm
सर्वप्रथम सर्व भारतीयांच्या वतीने मी मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्षाच्या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष आणि मालदीवच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
April 05th, 11:30 am
आज राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांच्या हस्ते ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही, तर हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा भारत आणि श्रीलंकेतील नागरिकांमधील ऐतिहासिक संबंधांचा आणि दाट मैत्रीचा सन्मान आहे.भारत आणि मालदीव: सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठी दृष्टिकोन
October 07th, 02:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा व्यापक आढावा घेतला.दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या या देशांतील ऐतिहासिक घनिष्ठ आणि विशेष संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची देखील त्यांनी नोंद घेतली.