पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) दौरा
May 15th, 03:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे अधिकृत भेट दिली. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले, आणि त्यांना औपचारिक मानवंदना देण्यात आली.पंतप्रधान येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार
February 12th, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी 14 तारखेला सकाळी 11 च्या सुमाराला चेन्नईत पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल आणि अनेक प्रकल्पांचा कोनशिला समारंभही होईल. तसेच अर्जुन मेन बॅटल टँक लष्कराला सुपूर्द करण्याचा समारंभही त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमाराला पंतप्रधान कोच्ची येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांच्या विकासाला महत्वाची गती मिळेल आणि या राज्यांची विकासक्षमता पूर्णपणे वापरण्याचा वेग वाढेल.