Prime Minister holds bilateral talks with the Prime Minister of Ethiopia
December 17th, 12:02 am
During his visit to Ethiopia, PM Modi held discussions with Ethiopian PM Dr. Abiy Ahmed Ali in Addis Ababa. Both leaders reviewed the entire spectrum of the bilateral relationship and agreed to elevate the ties to the level of a Strategic Partnership. PM Modi thanked Ethiopia for its solidarity in the wake of the Pahalgam terror attack. Following the talks, the two leaders witnessed the exchange of MoUs.जी-7 राष्ट्र समुहाच्या उर्जा सुरक्षेवरील संवाद सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद (17 जून 2025)
June 18th, 11:15 am
जी-7 शिखर परिषदेकरता आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल आणि उत्तम स्वागतासाठी मी पंतप्रधान कार्नी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. जी-7 समुहाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मी सर्व मित्रांचे मनापासून अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी जी-7 आउटरीच सत्राला केले संबोधित
June 18th, 11:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाच्या कनानास्किस येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या आऊटरीच सत्रात सहभाग घेतला.‘ऊर्जा सुरक्षितता: बदलत्या जागतिक परिस्थितीत उपलब्धता व परवडणाऱ्या दरात ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविधता,तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा’ या विषयावरील सत्राला त्यांनी संबोधित केले. दरम्यान, जी-7 च्या 50 वर्षांच्या प्रवासाबद्दलही त्यांनी अभिनंदन केले आणि आमंत्रण दिल्याबद्दल कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे आभार मानले.अंगोलाच्या राष्ट्रपतींसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 03rd, 01:00 pm
मी राष्ट्रपती लोरेंसू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. 38 वर्षांनी अंगोलाचे राष्ट्रपती भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे केवळ भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा आणि गती मिळत आहे, तर भारत आणि आफ्रिका यांच्यातील भागीदारीला देखील बळ मिळत आहे.पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया दौऱ्याच्या समारोपाबाबत संयुक्त निवेदन
April 23rd, 12:44 pm
सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांच्या निमंत्रणावरून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या TV9 शिखर परिषद 2025 मधील भाषणाचा मराठी अनुवाद
March 28th, 08:00 pm
श्रीयुत रामेश्वर गारू जी, रामू जी, बरुण दास जी, TV9 ची संपूर्ण टीम, मी आपल्या नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांचे, इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतो, या शिखर परिषदेसाठी अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 शिखर परिषदेत केले भाषण
March 28th, 06:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित टीव्ही 9 शिखर परिषदेत भाग घेतला. या परिषदेमध्ये संबोधित करताना त्यांनी टीव्ही9च्या संपूर्ण टीमला आणि त्याच्या प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, टीव्ही9 चा विस्तृत प्रादेशिक प्रेक्षकवर्ग आहे आणि आता जागतिक प्रेक्षकवर्गही तयार होत आहे. त्यांनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडलेल्या परदेशस्थ भारतीयांचेही स्वागत केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.ऑस्ट्रियाच्या चॅन्सलर सोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
July 10th, 02:45 pm
सर्वप्रथम, हार्दिक स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी चॅन्सलर नेहमर यांचे आभार मानतो. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीला ऑस्ट्रियाला भेट देण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे. माझी ही भेट ऐतिहासिक आणि खास आहे. एकेचाळीस वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट दिली आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत असताना ही भेट होत आहे, हा देखील एक सुखद योगायोग आहे.पंतप्रधानांच्या दुसऱ्या 'व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट' येथील भाषणाचा मजकूर
November 17th, 04:03 pm
140 कोटी भारतीयांच्या वतीने, दुसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या उद्घाटन सत्रात मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ हे 21व्या शतकातील बदलत्या जगाचे सर्वात आगळेवेगळे व्यासपीठ आहे. भौगोलिकदृष्ट्या ग्लोबल साउथ नेहमीच पुढे राहिलेले आहे, पण असे व्यासपीठ आपल्याला पहिल्यांदाच मिळाले आहे आणि आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. यात 100 पेक्षा अधिक भिन्न देशांचा समावेश असला तरी आपले हित समान आहे, आमचा प्राधान्य क्रम समान आहे.