भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासातील उल्लेखनीय गतीवर पंतप्रधानांनी टाकला प्रकाश
June 05th, 05:10 pm
भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासाने आता उल्लेखनीय गती घेतली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. एअरट्रंक कंपनीने, भारतात सुमारे 3 लाख कोटी रुपये (30 अब्ज डॉलर्स) गुंतवणूक करण्याची आणि 5 गिगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ही देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधा व्यवस्थेमधील सर्वात मोठ्या प्रस्तावित गुंतवणुकींपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.गुजरातमध्ये मायक्रॉन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 28th, 02:45 pm
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा,अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर, उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेनंतर आजआपण येथे आणखी एका ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार बनत आहोत. एआय परिषदेने जगाला भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेची ओळख करून दिली, आजचादिवस हा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाच्या वचनबद्धतेचा आणखीएक वस्तुपाठ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्ट अँड पॅकेजिंग (एटीएमपी) सुविधेचे उद्घाटन
February 28th, 02:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन एटीएमपी (असेंब्ली, टेस्ट, मार्किंग आणि पॅकेजिंग) सुविधेचे उद्घाटन केले. व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात हा जागतिक तंत्रज्ञानातील नेतृत्वाच्या दिशेने भारताच्या प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा आहे.हैदराबाद इथल्या जागतिक माहिती तंत्रज्ञान परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांचे संबोधन
February 19th, 11:30 am
जागतिक माहिती तंत्रज्ञान संमेलनाचे उद्घाटन करतांना मला खूप आनंद होत आहे. भारतात प्रथमच हे संमेलन आयोजित होत आहे. नॅसकॉम, विट्सा आणि तेलंगणा सरकारच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.