जगातील सर्व देशांचे लक्ष आता भारतीय स्टार्ट-अप्सकडे असणार आहे: अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना पंतप्रधान मोदी
August 23rd, 11:42 am
पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्ट-अप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि एका नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. या संवादात खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले करणे, भारतीय कंपन्यांना सरकारी पाठिंबा, रोबोटिक अंतराळयाने, वारंवार होणारे रॉकेट प्रक्षेपण आणि भारतातील पहिले अंतराळ-औषध क्षेत्रातील स्टार्टअप यासह अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.पंतप्रधान मोदींनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या सीईओंशी साधला संवाद
August 23rd, 11:30 am
पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या सीईओंशी संवाद साधला; ज्यामध्ये त्यांनी नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या संवादात खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले करणे, भारतीय कंपन्यांना सरकारी पाठिंबा, रोबोटिक स्पेसक्राफ्ट, वारंवार होणारे रॉकेट प्रक्षेपण आणि भारताची पहिली स्पेस-फार्मा स्टार्ट-अप यासह अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा
August 21st, 02:21 pm
पंतप्रधानांनी 20 स्पेस स्टार्ट-अप्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या खाजगी अंतराळ परिसंस्थेवर आणि जागतिक प्रतिभा, कंपन्या व गुंतवणूक आकर्षित करण्याच्या तिच्या क्षमतेवर भर दिला. त्यांनी अंतराळ तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर, उद्योग क्षेत्रातील मजबूत सहकार्य आणि तरुण पिढीला अंतराळाविषयी प्रेरित करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.भारत-न्यूझीलंड संयुक्त निवेदन
July 11th, 07:59 am
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 जुलै 2026 रोजी ऑकलंड, न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या 40 वर्षांतला भारतीय पंतप्रधानाचा न्यूझीलंडचा हा पहिलाच दौरा असून, हा एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री व भागीदारीला एक नवीन दिशा देणारा आहे.The Indo-Pacific represents the shared aspirations of like-minded democracies such as India and Australia: PM Modi at the Joint Press Meet
July 09th, 11:15 am
Addressing a joint press meet with Australian Prime Minister Anthony Albanese, PM Modi highlighted the expanding India-Australia Comprehensive Strategic Partnership. He also likened the India-Australia partnership to cricket, saying the agenda is One-Day focused, decisions are as fast as T20 and the partnership is as long and deep as a Test match.भारत-ब्रिटन संयुक्त निवेदन
October 09th, 03:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणाला मान देऊन ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर दिनांक 08 ते 09 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.पंतप्रधान स्टार्मर यांच्यासमवेत ब्रिटनचे केंद्रीय व्यवसाय आणि व्यापार मंत्री तसेच व्यापार मंडळाचे अध्यक्ष काईल एमपी, स्कॉटलंडचे मंत्री डग्लस अलेक्झांडर एमपी, गुंतवणूक मंत्री जेसन स्टॉकवुड तसेच 125 सीईओ, उद्योजक, विद्यापीठांचे कुलगुरू आणि सांस्कृतिक नेत्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आले आहे.फलनिष्पत्तीची यादी: ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा
October 09th, 01:55 pm
भारत-ब्रिटन संपर्क आणि नवनिर्माण केंद्राची स्थापना.ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेतील संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांसमोर केलेले निवेदन
October 09th, 11:25 am
पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त, आज त्यांचे इथे- मुंबईमध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.पंतप्रधानांचा घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया दौरा (02 - 09 जुलै )
June 27th, 10:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 02-03 जुलै 2025 दरम्यान घानाला भेट देतील. पंतप्रधानांचा घानाचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल. तीन दशकांनंतर भारताचे पंतप्रधान घानाला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान घानाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करून मजबूत द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेतील आणि आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य आणि विकास सहकार्य भागीदारीद्वारे ती वाढवण्यासाठी अन्य मार्गांवर चर्चा करतील. हा दौरा दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि ECOWAS [पश्चिम आफ्रिकन देशांचा आर्थिक समुदाय] आणि आफ्रिकन संघासोबत भारताचे संबंध मजबूत करण्याप्रति सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.