Today India is working in every sector, in every area with unprecedented speed: PM at NDTV World Summit
October 21st, 10:25 am
Prime Minister Narendra Modi addressed the NDTV World Summit 2024. “Today, India is working in every sector and area with unprecedented speed”, the Prime Minister said. Noting the completion of 125 days of the third term of the government, PM Modi threw light on the work done in the country.Prime Minister Shri Narendra Modi addresses NDTV World Summit 2024 in New Delhi
October 21st, 10:16 am
Prime Minister Narendra Modi addressed the NDTV World Summit 2024. “Today, India is working in every sector and area with unprecedented speed”, the Prime Minister said. Noting the completion of 125 days of the third term of the government, PM Modi threw light on the work done in the country.गुजरात मध्ये गांधीनगर इथे रि-इन्व्हेस्ट 2024 या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 16th, 11:30 am
गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडूजी, राजस्थानचे मुख्यमंत्री श्री भजन लाल शर्माजी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री मोहन यादवजी…. छत्तीसगडचे मुख्यमंत्रीजी सुद्धा इथे दिसत आहेत, गोव्याचे मुख्यमंत्रीही आहेत आणि अनेक राज्यांचे ऊर्जामंत्रीही मला दिसत आहेत.त्याचप्रमाणे, परदेशी पाहुणे, जर्मनीच्या आर्थिक सहकार्य मंत्री, डेन्मार्कचे उद्योग व्यवसाय मंत्री, माझे मंत्रिमंडळातील सहकारी प्रल्हाद जोशी, श्रीपाद नाईकजी आणि जगातील अनेक देशांमधून आलेले सर्व प्रतिनिधी, स्त्री-पुरुष सज्जनहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे केले चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्घाटन
September 16th, 11:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्घाटन केले. ही तीन-दिवसीय शिखर परिषद भारताच्या 200 GW पेक्षा जास्त स्थापित बिगर-जीवाश्म इंधन क्षमता साध्यतेच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान करत आहे. मोदी यांनी यावेळी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट-अप आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक नवोन्मेषाचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनास्थळी पायी चालत आढावाही घेतला.पंतप्रधान 4 ते 6 मार्च दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार
March 03rd, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्च 2024 दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेतबोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 19th, 03:15 pm
बेंगळुरूमध्ये परदेशातील सर्व आदरणीय पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. बेंगळुरू हे आकांक्षांना नवकल्पना आणि यशाची जोड देते आणि भारताच्या तांत्रिक क्षमतेला जागतिक मागणीशी संलग्न करते. ही ओळख अधिक मजबूत करण्यासाठी बेंगळुरूमध्ये बोईंगच्या नवीन जागतिक तंत्रज्ञान संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, हे संकुल अमेरिकेबाहेर बोईंग कंपनीची सर्वात मोठी सुविधा आहे, जे केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक विमान वाहतूक बाजारालाही नवीन ऊर्जा देईल. पण मित्रांनो, या सुविधेचे महत्त्व इतकेच मर्यादित नाही. या सुविधेचे महत्त्व जागतिक तांत्रिक प्रगती, संशोधन, नवोन्मेष, संरचना आणि मागणी यांच्या पूर्ततेत भारताच्या वचनबद्धतेशी निगडित आहे. ते 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या आमच्या संकल्पाला बळ देते. शिवाय, या संकुलाची उभारणी ही भारताच्या प्रतिभेवर जगाचा विश्वास अधोरेखित करते. आजचा सोहोळा हा एक दिवस भारत या सुविधेत 'भविष्यातील विमान' डिझाइन करेल या विश्वासाचा आहे. म्हणून, मी संपूर्ण बोईंग व्यवस्थापन आणि सर्व हितधारकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो; आणि तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.पंतप्रधानांच्या हस्ते कर्नाटकातील बंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन
January 19th, 02:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील बंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन केले. 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बांधण्यात आलेले हे 43 एकर क्षेत्राचे संकुल बोइंगची अमेरिकेबाहेरची अशी सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पंतप्रधानांनी बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा देखील प्रारंभ केला ज्याचा उद्देश देशातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रात भारतातील जास्तीत जास्त मुलींच्या प्रवेशाला पाठबळ देणे हा आहे.India & Greece have a special connection and a relationship spanning centuries: PM Modi
August 25th, 09:30 pm
PM Modi addressed the Indian community at Athens Conservatoire, in Athens. In his address, PM Modi emphasized the unprecedented transformation that India is currently undergoing and the strides being made in various sectors. He lauded the success of the Chandrayaan mission. Prime Minister highlighted the contribution of the Indian community in Greece in advancing the multi-faceted India-Greece relations and urged them to be a part of India’s growth story.Prime Minister’s interaction with the Indian Community in Athens
August 25th, 09:00 pm
PM Modi addressed the Indian community at Athens Conservatoire, in Athens. In his address, PM Modi emphasized the unprecedented transformation that India is currently undergoing and the strides being made in various sectors. He lauded the success of the Chandrayaan mission. Prime Minister highlighted the contribution of the Indian community in Greece in advancing the multi-faceted India-Greece relations and urged them to be a part of India’s growth story.हेलिकॉप्टरसाठी कामगिरी आधारित नेव्हिगेशनच्या आशियातील पहिल्या प्रात्यक्षिकाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
June 02nd, 08:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगन उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून जुहू ते पुणे या उड्डाणासाठी हेलिकॉप्टरसाठी कामगिरी-आधारित नेव्हिगेशनच्या आशियातील पहिल्या प्रात्यक्षिकाचे कौतुक केले आहे.पंतप्रधानांनी सामायिक केली त्यांच्या नुकत्याच झालेल्या विमानतळाशी संबंधित कार्यक्रमांची छायाचित्रे
April 12th, 07:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या विमानतळाशी संबंधित कार्यक्रमाची छायाचित्रे सामायिक केली आहे.पर्यटनाचा मिशन मोडवर विकास साधणे या विषयावर आयोजित केलेल्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेलं संबोधन
March 03rd, 10:21 am
या वेबिनार मध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आहे. आजचा नवा भारत नव्या कार्यसंस्कृतीसह पुढे वाटचाल करत आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाचीही खूप प्रशंसा झाली आहे, देशातील लोकांनी या अर्थसंकल्पाला खूप सकारात्मकपणे घेतलं आहे. देशात जुनी कार्य संस्कृती असती तर अर्थसंकल्पाबाबत अशा प्रकारचे वेबिनार आयोजित करण्याचा कुणी विचारही केला नसता. मात्र आज आमचं सरकार अर्थसंकल्पाच्या आधी आणि अर्थसंकल्पानंतरही अर्थसंकल्पाशी संबंधित प्रत्येक भागधारकाशी विस्तृत चर्चा करत असते, या सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत असते. अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त फलनिष्पत्ती कशी करता येईल, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी निर्धारित कालमर्यादेच्या आत कशी पूर्ण होईल याबाबत, तसच अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अशा प्रकारचे वेबिनार उत्प्रेरकाप्रमाणे काम करतात. आपण हे जाणताच की सरकारचा प्रमुख म्हणून(गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून) काम करण्याचा मला वीस वर्षाहून जास्त अनुभव आहे. या अनुभवाचं सार हे आहे की जेव्हा कुठल्याही धोरणात्मक निर्णयाशी त्या निर्णयाशी संबंधित भागधारक सुद्धा जोडले जातात, सहभागी होतात तेव्हा त्या धोरणाचे परिणाम सुद्धा मनासारखे आणि वेळेत मिळतात. आपण पाहत आहात की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वेबिनार मध्ये आमच्या सोबत हजारो लोक सहभागी झाले, संपूर्ण दिवसभरात सर्वांनी मिळून खूप विचार मंथन केलं आणि मी हे सांगू शकतो की खूपच महत्त्वपूर्ण सूचना या वेबिनार मधून मांडल्या गेल्या आणि विशेष करुन आगामी काळाच्या अनुषंगाने पुढे आल्या. या वेबिनार मधून, जो अर्थसंकल्प आहे त्यावरच फक्त लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्यातूनच प्राप्त परिस्थितीत कसं पुढे जाता येईल याबद्दल खूप उत्तम सूचना आल्या. आज आता आपण देशाच्या पर्यटन क्षेत्राचा कायापालट करण्याबाबत विचार मंथन करण्यासाठी हा वेबिनार करत आहोत.‘मिशन मोडमध्ये पर्यटन विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 03rd, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन मोडमध्ये पर्यटनाचा विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला आज संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित करण्यात आलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे आयोजित 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार्सच्या मालिकेतील हे सातवे वेबिनार आहे.हवाई वाहतूक क्षेत्र लोकांना जवळ आणत आहे आणि देशाच्या प्रगतीला चालना देत आहे : पंतप्रधान
February 22nd, 12:45 pm
विमानतळाच्या संख्येत झालेली वाढ तसेच कोविडनंतर नवा उच्चांक गाठत देशांतर्गत विमान प्रवासी संख्या 4.45 लाखांवर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 14th, 04:31 pm
या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विशेष आभार मानतो.एअर इंडिया-एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून साधला संवाद
February 14th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एच.ई. इमॅन्युएल मॅक्रॉन, रतन टाटा, एमेरिटस, टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, टाटा सन्स बोर्डाचे अध्यक्ष, कॅम्पबेल विल्सन, एअर इंडियाचे सीईओ आणि एअरबस चे सीईओ गिलॉम फौरी यांच्याशी, व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला.कोविड 19 पूर्व काळापासून सर्वाधिक प्रवासी संख्या नोंदवल्याबद्दल भारतीय नागरी विमान वाहतुकीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
October 11th, 10:26 am
दैनंदिन प्रवासी संख्या 4 लाखांपर्यंत पोहोचल्याबद्दलच नव्हे, तर कोविड 19 पूर्व काळापासून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे कौतुक केले आहे. आर्थिक प्रगती आणि जीवनमान सुलभ होण्यासाठी महत्वाचे असलेले संपूर्ण भारतातील दळणवळण अधिक सुधारण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे असे मोदी म्हणाले.पंतप्रधानांची स्वीडनच्या पंतप्रधानांशी चर्चा
May 04th, 02:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या भारत- नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोपनहेगन येथे स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.भव्य विचार करा, मोठी स्वप्ने पहा आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार ! यावेळी आपण सगळे 2021 ला निरोप आणि 2022 च्या स्वागताच्या तयारीत गुंतले असाल. नव्या वर्षात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, पुढच्या वर्षात आणखी काही अधिक उत्तम करण्याचा संकल्प करतात. गेल्या सात वर्षात, आपला हा ‘मन की बात’ कार्यक्रम देखील, व्यक्तीच्या, समाजातल्या, देशातल्या चांगुलपणाच्या, सकारात्मकतेच्या कथा सांगत, आपल्याला आणखी काही चांगले करण्याची, अधिक चांगले बनण्याची, प्रेरणा देत आला आहे. या सात वर्षात मी ‘मन की बात’ कथन करत असतांना, सरकारच्या कामगिरीवरही चर्चा करु शकलो असतो. कदाचित आपल्यालाही ते आवडलं असतं, आपणही त्याचं कौतुक केलं असतं. मात्र, माझा हा अनेक दशकांचा अनुभव आहे, की प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून दूर, कोटी कोटी लोक आहे, जे फार उत्तम कामे करत आहेत.हे लोक देशाच्या उद्याच्या भविष्यासाठी, आपला ‘आज’ खर्च करत आहेत. ते देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आज आपल्या कामांमध्ये आपले आयुष्य वेचत आहेत. अशा लोकांच्या कथा आपल्याला खूप समाधान देऊन जातात. खूप खोलवर प्रेरित करतात. माझ्यासाठी ‘मन की बात’ कायमच, अशाच लोकांच्या प्रयत्नांनी भरलेला, बहरलेला, सजलेला एक सुंदर बगिचा आहे. आणि ‘मन की बात’ मध्ये तर दर महिन्यात मला यावर विचार करावा लागतो, की या बागेतली कोणती फुले आज तुमच्यासाठी घेऊन येऊ.उत्तरप्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 20th, 10:33 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री किरेन रिजिजू जी, श्री किशन रेड्डी जी, जनरल व्ही के सिंग जी, श्री अर्जुन राम मेघवाल जी, श्री श्रीपाद नायक जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री नंद गोपाल नंदी जी, संसदेतील माझे सहकारी श्री विजय कुमार दुबे जी, आमदार श्री रजनीकांत मणि त्रिपाठी जी, विविध देशांचे राजदूत - राजनीतिज्ञ, इतर लोकप्रतिनिधी, आणि बंधू आणि भगिनींनो!