मणिपूरमधल्या चुराचांदपूर येथे विविध विकासकामांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 13th, 12:45 pm
व्यासपीठावर उपस्थित राज्यपाल श्रीमान अजय भल्ला जी, राज्य प्रशासनाचा अधिकारी वर्ग आणि या कार्यक्रमाला उपस्थित मणिपूरच्या माझ्या बंधू-भगिनींनो,आपणा सर्वांना नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मणिपूरमधील चुराचांदपूर इथे 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी
September 13th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरमधील चुराचांदपूर इथे 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. मणिपूरची भूमी धैर्य आणि दृढनिश्चयाची भूमी असून, मणिपूरच्या डोंगरदऱ्या म्हणजे निसर्गाने दिलेली अनमोल देणगी असल्याचे ते म्हणाले. या डोंगरदऱ्या इथल्या जनतेच्या अविरत मेहनतीचे प्रतीक आहेत, असेही ते म्हणाले. मणिपूरच्या लोकांच्या भावनेला त्यांनी सलाम केला, तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानत, त्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.