फलनिष्पत्ती : ऑस्ट्रियाचे फेडरल चॅन्सलर डॉ.ख्रिस्तियन स्टॉकर यांच्या भारत भेटीमध्ये उभय देशांमध्ये झालेले करार
April 16th, 03:01 pm
हा करार दोन्ही देशांतील चित्रपट उद्योगांच्या दरम्यान वाढीव सहकार्यासाठीची चौकट उपलब्ध करून देईल आणि संयुक्त चित्रपट निर्मिती, सर्जनशील देवाणघेवाण तसेच अधिक उत्तम सांस्कृतिक सहभागासाठी सुलभता निर्माण करेल.ऑस्ट्रियाच्या चॅन्सलरसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
April 16th, 11:55 am
चार दशकांनंतर ऑस्ट्रियाच्या चॅन्सलर यांचा हा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ष 2026 च्या ऐतिहासिक भारत-युरोपीय महासंघासोबतच्या मुक्त व्यापार करारानंतर, भारत आणि युरोपीय महसंघ यांच्यातील संबंधांमध्ये एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. चॅन्सेलर स्टॉकर यांच्या दौऱ्यामुळे आम्ही भारत-ऑस्ट्रिया संबंधांनाही एका नव्या युगात घेऊन जात आहोत.क्रिस्तियान स्टॉकर यांनी ऑस्ट्रियाचे फेडरल चान्सेलर म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे अभिनंदन
March 04th, 11:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिस्तियान स्टॉकर यांनी ऑस्ट्रियाचे फेडरल चान्सेलर अर्थात राष्ट्र प्रमुख म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात भारत आणि ऑस्ट्रियातील विस्तारती भागिदारी स्थीर प्रगती करत राहील असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.