पंतप्रधानांनी परमपूज्य मोरन मोर इग्नाटियस अफ्रेम II यांची भेट घेतली

February 27th, 04:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, अँटिऑक आणि ऑल द ईस्टचे पॅट्रिआर्क तसेच युनिव्हर्सल सिरियाक ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च प्रमुख परमपूज्य मोरन मोर इग्नाटियस अफ्रेम II यांची भेट घेऊन सन्मानित झाल्याची भावना व्यक्त केली.

लखनौ इथे राष्ट्र प्रेरणा स्थळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

December 25th, 06:16 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी आणि लखनौचे खासदार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान पंकज चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी,महिला आणि पुरुषहो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन

December 25th, 05:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान यांची नाताळच्या सकाळच्या सेवेला उपस्थिती

December 25th, 10:43 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील 'द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन' येथे झालेल्या नाताळ सकाळच्या सेवेला उपस्थिती लावली. या सेवेतून प्रेम, शांती आणि करुणेचा कालातीत संदेश प्रतिबिंबित झाला. नाताळची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि सद्भावना निर्माण करो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी सायरो-मलबार चर्चच्या प्रमुखांची भेट घेतली

November 04th, 09:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायरो-मलबार चर्चचे प्रमुख, मेजर आर्चबिशप मारफाएल थॅटिल, आर्चबिशप डॉ. कुरियाकोस भरणीकुलंगारा आणि इतर मान्यवरांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना पवित्र व आनंदी ईस्टरच्या शुभेच्छा

April 20th, 09:47 am

‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशात पंतप्रधानांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे,

गुड फ्रायडेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी अधोरेखित केले दया आणि करुणा या मूल्यांचे महत्त्व

April 18th, 09:42 am

गुड फ्रायडेच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येशू ख्रिस्तांच्या महान बलिदानाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या जीवनात दयाबुद्धी, करुणा आणि औदार्याचा अंगिकार करण्याचे स्मरण करून देणारा हा दिवस आहे, यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या नाताळच्या शुभेच्छा

December 25th, 09:36 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाताळच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी सीबीसीआय येथे नाताळच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे काही क्षणही सामायिक केले आहेत.

कैथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया द्वारा आयोजित ख्रिसमस समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

December 23rd, 09:24 pm

आता तीन-चार दिवसापूर्वीच मी माझे सहकारी भारत सरकारमधील मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्याकडे ख्रिसमस निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आणि आज तुमच्या समवेत उपस्थित राहण्याचा आनंद मिळत आहे. कैथलिक बिशप्स कौन्फरन्स औफ इंडिया- सीबीसीआय चे हे आयोजन ख्रिसमसच्या आनंदात तुमच्याबरोबर सहभागी होण्याची ही संधी, हा दिवस आपणा सर्वांसाठी अविस्मरणीय राहणार आहे. ही संधी यासाठी देखील खास आहे, कारण याच वर्षी सीबीसीआय च्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मी सीबीसीआय आणि त्यांच्याशी संलग्न सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या नाताळ कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

December 23rd, 09:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्‍याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्‍ये होणा-या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.

नवी दिल्लीतील सीबीसीआय सेंटरमध्ये 23 डिसेंबर रोजी कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाद्वारे आयोजित नाताळ उत्सव कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी

December 22nd, 02:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्ली येथील कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नाताळ विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

गोव्यामधील विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 06th, 02:38 pm

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले जी, येथील तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीगण, इतर मान्यवर आणि गोव्यातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.समस्त गोंयकारांक, मना-कालझा सावन नमस्कार। तुमचो मोग अनी उर्बा पूड़ोंन, म्हाका गोयांत योन सदांच खोस सता।

पंतप्रधानांनी गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 "या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

February 06th, 02:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. आज पायाभरणी तसेच उद्घाटन झालेल्या विकास प्रकल्पांमध्ये शिक्षण, क्रीडा, जलसंस्करण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देणे आदींचा समावेश आहे. पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध विभागांमध्ये नव्याने भरती झालेल्या 1930 सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेशही वितरित केले. विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांनी मंजुरी पत्रेही सुपूर्द केली.

नाताळ सणानिमित्त, लोककल्याण मार्ग इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

December 25th, 02:28 pm

त्यामुळे, माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे. अनिल जी यांनी मला खूप मदत केली, त्यामुळे, त्यांचे ही मी विशेष आभार मानतो. या उपक्रमासाठी मी मायनॉरिटी फौंडेशनचा देखील आभारी आहे.

नाताळच्या निमित्ताने पंतप्रधानांनी साधला ख्रिस्ती समुदायासोबत संवाद

December 25th, 02:00 pm

यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना विशेषतः ख्रिस्ती समुदायाच्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा देताना या अतिशय विशेष आणि पवित्र प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या आणि त्यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. भारतीय अल्पसंख्याक मंचाने दिलेला नाताळ एकत्र साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले. ख्रिस्ती समुदायाबरोबर प्रदीर्घ काळापासून असलेल्या घनिष्ठ आणि अतिशय जिव्हाळ्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना ख्रिस्ती समुदाय आणि त्यांच्या नेत्यांसोबत ठराविक काळाने होत असलेल्या बैठकांच्या आठवणींना उजाळा दिला. काही वर्षांपूर्वी पवित्र पोप यांच्यासोबत झालेल्या संवादाची त्यांनी आठवण केली आणि तो एक संस्मरणीय क्षण होता असे नमूद करताना, पृथ्वीला एक चांगले स्थान बनवण्यासाठी सामाजिक सौहार्द, जागतिक बंधुभाव, हवामान बदल आणि समावेशक विकास यांसारख्या मुद्यांवरील चर्चा अधोरेखित केली.

ईस्टरच्या विशेष प्रसंगी पंतप्रधानांनी ख्रिस्ती समुदायातल्या आध्यात्मिक गुरूंची भेट घेतली

April 09th, 07:17 pm

दिल्ली इथल्या सॅक्रेड हार्ट कॅथेड्रल ला दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे सामायिक केली.

येशू ख्रिस्ताचे धैर्य आणि बलिदान यांचे गुड फ्रायडेच्या दिनाला पंतप्रधानांनी केले स्मरण

April 15th, 09:25 am

येशू ख्रिस्तांचे सेवा आणि बंधुत्व यांचे आदर्श अनेकांसाठी मार्गदर्शक आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कोविड -19 बाबत पंतप्रधानांनी धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी साधला संवाद

July 28th, 07:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी कोविड -19 च्या परिस्थितीबद्दल धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

परम पावन मोरान मार बॅसेलीयोस मारथोमा पाओलोस द्वितीय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

July 12th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, इंडियन ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च प्रमुख परम पावन मोरान मार बॅसेलीयोस मारथोमा पाओलोस द्वितीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ईस्टर निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

April 04th, 09:39 am

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “ईस्टरच्या शुभेच्छा !