पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये उपस्थितांना संबोधित करणार

September 24th, 06:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15 वाजता नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.

नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

September 12th, 04:54 pm

आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

September 12th, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी म्यानमारच्या राष्ट्र सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन ऑन्ग हलिंग यांची घेतली भेट

August 31st, 04:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या राज्य सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन आंग हलिंग यांची भेट घेतली. भारतासाठी 'नेबरहूड फर्स्ट', 'ॲक्ट ईस्ट' आणि 'इंडो-पॅसिफिक' धोरणांचा एक भाग म्हणून म्यानमारसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत,असे पंतप्रधानांनी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि विकास भागीदारी, संरक्षण आणि सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि सीमा व्यापार यासह द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक पैलूंवर आणखी प्रगती करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या संपर्कव्यवस्था प्रकल्पांमधील प्रगतीमुळे दोन्ही देशांच्या लोकांमध्ये अधिक संवाद वाढेल, तसेच भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणात संकल्पना केलेल्या प्रादेशिक सहकार्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन मिळेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

India - China cooperation is linked to the interests of 2.8 billion people: PM Modi in Tianjin

August 31st, 11:06 am

In his remarks, PM Modi thanked Chinese President Xi Jinping for the warm welcome. Recalling their meaningful discussions in Kazan, the PM noted that an atmosphere of peace and stability has been established following the border disengagement. He further highlighted the resumption of the Kailash Mansarovar Yatra and congratulated the President on China’s successful presidency of the SCO.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा

August 31st, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑगस्ट 2025 रोजी तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) च्या नेत्यांच्या शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये तिआनजीन येथे आगमन

August 30th, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच चीनमध्ये दाखल झाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेल्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी हा दौरा करत आहेत. तियानजिन येथील शिखर परिषद होत असताना ते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत.

जपान आणि चीन दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन

August 28th, 08:40 pm

पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून, मी 15 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे.

पंतप्रधानांचा जपान आणि चीन दौरा

August 22nd, 06:15 pm

जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अनुक्रमे 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला आणि 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनला भेट देणार आहेत. जपानमध्ये, पंतप्रधान 15 व्या वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होणार असून जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्याशी चर्चा करतील. चीनमध्ये पंतप्रधान तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

August 19th, 07:34 pm

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

ASPI च्या क्रिटिकल टेक्नॉलॉजी ट्रॅकरमध्ये भारताला पहिल्या पाच देशांमध्ये स्थान मिळाल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून स्वागत

October 03rd, 07:35 pm

एएसपीआय क्रिटिकल टेक्नॉलॉजी ट्रॅकरनुसार, 64 पैकी 45 तंत्रज्ञानांमध्ये भारत पुढे असल्याने त्याची आता पहिल्या पाच देशांमध्ये वर्णी लागली आहे. या अभ्यासात क्रिटिकल तंत्रज्ञानाच्या विकासाचा मागोवा घेण्यात आला असून त्यामध्ये वैज्ञानिक आणि संशोधनातील प्रगतीची चढाओढ आणि जागतिक प्रतिभा टिकवून ठेवण्याची क्षमता या निकषांचा समावेश होता. या अभ्यासात जगातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञानाच्या विकास आणि नियंत्रणास आधार ठरणारे महत्त्वाचे घटक आणि त्यांचा देशाच्या आर्थिक क्षेत्रातील कर्तबगारीशी असलेला संबंध याचा सविस्तर लेखाजोखाही मांडण्यात आला आहे.

आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान संवाद साधणार आणि त्यांना संबोधित करणार

October 31st, 05:04 pm

आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 नोव्हेंबर रोजी 2023 दुपारी 4:30 च्या सुमाराला नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडिअम येथे संवाद साधणार आहेत आणि त्यांना संबोधित करणार आहेत.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या अलौकिक कामगिरीची पंतप्रधानांकडून प्रशंसा

October 28th, 11:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या 111 पदकांच्या अलौकिक कामगिरीची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या अतूट समर्पण आणि अदम्य सहसाचेही कौतुक केले.

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल किशन गांगोलीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 28th, 08:48 pm

हांगझोऊ येथे दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ B2 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल किशन गंगोलीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी हिमांशी राठी, संस्कृती मोरे, वृती जैन यांचे केले अभिनंदन

October 28th, 08:45 pm

हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला बुद्धिबळ B1 गटात आज कांस्य पदक जिंकल्याबद्दल हिमांशी राठी, संस्कृती मोरे आणि वृत्ती जैन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकणाऱ्या किशन गांगोली, आर्यन जोशी, सोमेंद्र यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 28th, 08:44 pm

हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ B2 सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल किशन गंगोली, आर्यन जोशी आणि सोमेंद्र यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अश्विन मकवाना याचे केले अभिनंदन

October 28th, 08:38 pm

हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुषांच्या बुद्धिबळ B1 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अश्विन मकवाना याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या T-20 श्रेणीत 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी पूजाचे केले अभिनंदन

October 28th, 08:35 pm

हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या T-20 श्रेणीत 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजाचे अभिनंदन केले आहे.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी टेक चंद महलावत याचे केले अभिनंदन

October 28th, 08:32 pm

हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक -F55 प्रकारात आज कांस्य पदक जिंकल्याबद्दल टेक चंद महलावत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दर्पण इनानी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 28th, 11:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ क्रीडा प्रकारात आज सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दर्पण इनानी यांचे अभिनंदन केले.