पंतप्रधानांनी चिलीचे राष्ट्राध्यक्ष महामहीम गॅब्रिएल बोरिक फाॅन्ट यांचे दिल्लीत केले स्वागत
April 01st, 09:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत चिलीचे राष्ट्राध्यक्ष महामहीम गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांचे हार्दिक स्वागत केले, जे भारत-चिली भागीदारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. लॅटिन अमेरिकेतील एक प्रमुख मित्र म्हणून चिलीचे महत्त्व अधोरेखित करून, राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचे स्वागत करण्याची संधी मिळाल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला.फलनिष्पत्ती: चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा
April 01st, 06:45 pm
अंटार्क्टिका सहकार्याबाबत हेतू पत्रभारत - चिली संयुक्त निवेदन (01, एप्रिल 2025)
April 01st, 06:11 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, चिलीचे अध्यक्ष, महामहिम गॅब्रिएल बोरिक फॉन्ट हे 1-5 एप्रिल 2025 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना यंदा 76 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त ते भारतभेटीवर आहेत. अध्यक्ष बोरिक यांच्यासोबत परराष्ट्र व्यवहार, कृषी, खाणकाम, महिला आणि लिंगभाव समानता आणि संस्कृती, कला आणि वारसा मंत्री, संसद सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने उद्योजक देखील आले आहेत. नवी दिल्ली व्यतिरिक्त, अध्यक्ष बोरिक हे आग्रा, मुंबई आणि बंगळुरूला भेट देतील. अध्यक्ष बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अध्यक्ष बोरिक आणि पंतप्रधान मोदी यांची पहिली भेट नोव्हेंबर 2024 मध्ये रिओ डी जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेदरम्यान झाली होती.चिलीच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांच्या निवेदनाचा अनुवाद
April 01st, 12:31 pm
राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांचा भारताप्रती असलेला दृढ मैत्रीभाव आणि दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठीची त्यांची वचनबद्धता खरोखरच अद्भुत आहे. यासाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचं आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं मी मनापासून स्वागत करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली चिलीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
November 20th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी चिली प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांची ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. ही त्यांची पहिली भेट होती.Social Media Corner 6th September
September 06th, 07:27 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!