पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये देशवासियांना डिजिटल जनगणना 2027 मध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले.
April 26th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' भागात, पंतप्रधान मोदींनी अणू आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण, 'बीटिंग रिट्रीट' सोहळा, निसर्ग संवर्धन, बांबू क्षेत्र, प्राचीन ग्रंथ आणि 'गणितीय ऑलिम्पियाड कार्यक्रम' यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या मोहिमेबद्दलही माहिती दिली आणि सर्वांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.छत्तीसगडमध्ये शक्ती जिल्ह्यातील उर्जा प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
April 14th, 10:06 pm
छत्तीसगडमध्ये शक्ती जिल्ह्यातील उर्जा प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
April 07th, 02:07 pm
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.
March 29th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात कोईम्बतूर, छत्तीसगड, गुजरात आणि आसाममधील विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाची क्षणचित्रे केली सामायिक
February 10th, 05:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मधील परीक्षा पे चर्चा (PPC) या कार्यक्रमाच्या 9 व्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागादरम्यान कोईम्बतूर, छत्तीसगड, गुजरात आणि आसाममधील एक्झाम वॉरियर्स (Exam Warriors) सोबत अनौपचारिक संवाद साधला. परीक्षा पे चर्चाच्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित केला गेल्याचे नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस्तर पंडुम या महोत्सवाच्या विशेष सोहळ्याबद्दल छत्तीसगडच्या नागरिकांचे अभिनंदन केले
February 10th, 10:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या बस्तर पंडुम या महोत्सवाच्या विशेष सोहळ्याबद्दल छत्तीसगडच्या नागरिकांचे अभिनंदन केले. या महोत्सवादरम्यान बस्तर इथल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि आदिवासी वारशाचे अदभुतरम्य दर्शन घडले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सांस्कृतिक वारसा जपण्यात आणि स्थानिक समुदायांना सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.‘परीक्षा पे चर्चा 2026’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाचा मजकूर
February 09th, 10:30 am
माझ्या प्रिय मित्रांनो, 'परीक्षा पे चर्चा' च्या या महत्त्वपूर्ण भागात तुमचे स्वागत आहे. यावेळचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम काहीतरी वेगळा आहे, काहीतरी खास आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मला सूचना पाठवल्या होत्या की देशाच्या वेगवेगळ्या भागांतही परीक्षा पे चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून यावेळी मी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्यार्थ्यांसोबत बसून परीक्षा पे चर्चा केली आहे. या विशेष भागात तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे. तर चला प्रथम तामिळनाडूतील कोइम्बतूरला जाऊया. तामिळनाडूतील विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि उत्सुकता पाहून मी खूप प्रभावित झालो. चला, पाहूया.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
February 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा 2026 च्या 9 व्या आवृत्तीला पुढे सुरू ठेवत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात पंतप्रधानांनी कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील 'एक्झॅम वॉरियर्स'शी अनौपचारिक संवाद साधला. 'परीक्षा पे चर्चा'च्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना श्री मोदी यांनी नमूद केले की, यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांत आयोजित करण्यात आला आहे. कोईम्बतूर आवृत्तीची सुरुवात करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांमधील ऊर्जा आणि कुतूहलाने ते मनापासून प्रभावित झाले आहेत. वणक्कम म्हणून त्यांचे स्वागत करत त्यांनी हलकाफुलका संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता जेव्हा त्यांनी पंतप्रधानांना पाहिले; त्यांना वाटले होते की पंतप्रधानांचे आगमन खूप नाट्यमय असेल, परंतु त्यांना ते अत्यंत साधे, नम्र आणि जमिनीशी नाते असलेले वाटले. एका विद्यार्थ्याने आपला अनुभव सांगताना म्हटले की, पंतप्रधानांच्या आगमनाच्या वेळी त्यांना कमालीचे दडपण आल्यासारखे वाटत होते.पंतप्रधानांनी रायपूर येथील 60 व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक/ महानिरीक्षकांच्या परिषदेचे भूषवले अध्यक्षपद
November 30th, 05:17 pm
पंतप्रधानांनी पोलिसांच्या प्रति असलेली लोकांची धारणा बदलण्याची तातडीची गरज व्यक्त केली. विशेषतः युवकांमध्ये व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि प्रतिसादक्षमता वाढवून हे साध्य करण्याचे त्यांनी सुचवले. त्यांनी शहरी पोलिसिंग मजबूत करणे, पर्यटन पोलिस व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे आणि वसाहतवादी कालखंडातील फौजदारी कायद्यांची जागा घेणाऱ्या नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यासंबंधी सार्वजनिक जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित केली.रायपूर येथे 29-30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 60 व्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी
November 27th, 12:45 pm
पंतप्रधान 29-30 नोव्हेंबर 2025 रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) येथे होणाऱ्या 60 व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत.नवी दिल्लीत सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानात पंतप्रधानांचे भाषण
November 17th, 08:30 pm
आज आपण सर्वजण अशा एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी येथे जमलो आहोत, ज्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकारिता, अभिव्यक्ती आणि लोकचळवळीच्या शक्तीला नवी उंची दिली. रामनाथजी यांनी एक दूरदर्शी म्हणून, एक संस्था निर्माते म्हणून, एक राष्ट्रवादी म्हणून आणि एक माध्यम अग्रणी म्हणून, इंडियन एक्सप्रेस समूहाला केवळ एक वृत्तपत्र नाही, तर एक मिशन म्हणून भारतातील लोकांसमोर स्थापित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह, भारताची लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय हितांचा आवाज बनला. म्हणूनच 21 व्या शतकातील या कालखंडात जेव्हा भारत विकसित होण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहे, तेव्हा रामनाथजी यांची बांधिलकी, त्यांचे प्रयत्न, त्यांची दूरदृष्टी आपल्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी इंडियन एक्सप्रेस समूहाचे आभार मानतो, त्यांनी मला या व्याख्यानासाठी आमंत्रित केले, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानमध्ये मांडले आपले विचार
November 17th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत द इंडियन एक्सप्रेसने आयोजित केलेल्या सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. मोदी म्हणाले की, आज आपण अशा एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत, ज्यांनी भारतातील लोकशाही, पत्रकारिता, अभिव्यक्ती आणि लोक चळवळींच्या शक्तीला नवी उंची दिली. रामनाथ गोएंका यांनी एक दूरदर्शी, संस्था निर्माते, राष्ट्रवादी आणि माध्यम नेते म्हणून, इंडियन एक्सप्रेस समूहाला केवळ एक वृत्तपत्र म्हणून नव्हे तर एक ध्येय म्हणून भारतातील लोकांमध्ये स्थापित केले. पंतप्रधानांनी नमूद केले की त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारताच्या लोकशाही मूल्यांचा आणि राष्ट्रीय हितांचा आवाज बनला. 21 व्या शतकाच्या या युगात, भारत विकसित होण्याच्या संकल्पाने पुढे जात असताना, रामनाथ गोएंका यांची वचनबद्धता, प्रयत्न आणि दूरदृष्टी खूप मोठी प्रेरणा स्रोत आहे यावर त्यांनी भर दिला. हे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी इंडियन एक्सप्रेस समूहाचे आभार मानले आणि उपस्थित सर्वांचे अभिनंदन केले.गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
November 15th, 03:15 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला केले संबोधित
November 15th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माँ नर्मदेची पवित्र भूमी आज आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार होत आहे असे सांगून, मोदी यांनी भारताची एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती याच ठिकाणी साजरी करण्यात आली होती, भारत पर्वाची सुरुवात झाली होती याची आठवण करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या भव्य सोहळ्यासह भारत पर्वचा समारोप होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले .या शुभ प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण आदिवासी पट्ट्यात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या गोविंद गुरुंचे आशीर्वाद देखील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. व्यासपीठावरून त्यांनी गोविंद गुरुंना आदरांजली वाहिली. थोड्या वेळापूर्वी देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभले असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा रायपूर येथे छत्तीसगड रौप्य महोत्सवी समारंभात केलेले भाषण
November 01st, 03:30 pm
छत्तीसगडचे राज्यपाल आदरणीय रमेन डेका जी, राज्याचे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री विष्णु देव साय जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे ज्येष्ठ मित्र जुएल ओरांव जी, दुर्गा दास उइके जी, तोखन साहू जी, राज्य विधानसभेचे अध्यक्ष रमन सिंह जी, उपमुख्यमंत्री अरुण साहू जी, विजय शर्मा जी, उपस्थित मंत्रीवर्ग, लोकप्रतिनिधी आणि छत्तीसगडच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आलेल्या प्रिय बंधु भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या रजत महोत्सवाला केले संबोधित
November 01st, 03:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवा रायपूर येथे छत्तीसगड राज्याच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित 'छत्तीसगड रजत महोत्सवा'ला संबोधित केले. त्यांनी रस्ते, उद्योग, आरोग्यसेवा आणि ऊर्जा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांना समाविष्ट करणाऱ्या 14,260 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास आणि परिवर्तनकारी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, छत्तीसगडच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आणि आज छत्तीसगड राज्याच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत, असे सांगितले. या निमित्ताने त्यांनी छत्तीसगडच्या जनतेचे मनापासून अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.नवा रायपूर येथे छत्तीसगड विधानसभेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 01st, 01:30 pm
छत्तीसगडचे राज्यपाल रमण डेका जी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी, छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष- माझे मित्र रमण सिंह जी, राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री तोखन साहू, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, अरूण साव, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते चरणदास महंत आणि उपस्थित इतर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित भगिनी आणि सद्गृहस्थ हो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये नवा रायपूर येथे केले छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
November 01st, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये नवा रायपूर येथे छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आजचा दिवस छत्तीसगडच्या विकासाच्या वाटचालीची सोनेरी सुरुवात आहे, असे नमूद केले. आपल्या स्वतःसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून जोपासना केलेल्या या भूमीसोबत आपले अतिशय दृढ भावनिक नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याच्या काळाची आठवण करून देत मोदी म्हणाले की छत्तीसगडमध्ये त्यांनी बराच काळ व्यतित केला आणि तिथून बरेच काही शिकायला मिळाले. छत्तीसगडबाबतचा दृष्टीकोन, त्याच्या निर्मितीचा संकल्प आणि या संकल्पाची पूर्तता यांची आठवण करून देत, छत्तीसगडच्या परिवर्तनाच्या प्रत्येक क्षणाचे आपण साक्षीदार राहिलो असल्याचे सांगितले. हे राज्य आपल्या 25 वर्षांच्या वाटचालीतील एका महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत असताना, या प्रसंगाचा एक भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने या राज्याच्या जनतेसाठी विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याचा बहुमान प्राप्त झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यांनी छत्तीसगडच्या जनतेला आणि राज्य सरकारला या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.नवा रायपूर येथे शांती शिखर- ब्रह्माकुमारी ध्यान केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 01st, 11:15 am
ॐ शांती! छत्तीसगडचे राज्यपाल रमन डेका जी, राज्याचे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री विष्णू देव साय जी, राजयोगिनी भगिनी जयंती जी, राजयोगी मृत्युंजय जी, सर्व ब्रह्मकुमारी भगिनी, येथे उपस्थित असलेले इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!पंतप्रधानांच्या हस्ते छत्तीसगढमधील नवा रायपूर येथील ‘शांती शिखर’ या ध्यान केंद्राचे उद्घाटन, ब्रह्मकुमारींनाही केले संबोधित
November 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज छत्तीसगढमधील नवा रायपूर येथे आध्यात्मिक शिक्षण, शांतता आणि ध्यानधारणेसाठीच्या ‘शांती शिखर’ या आधुनिक केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी ब्रह्मकुमारींना संबोधितही केले. छत्तीसगढच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली असल्याने आजचा दिवस अत्यंत विशेष आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केले. आज देशभरातील अनेक राज्ये आपला राज्य स्थापना दिवस साजरा करत असल्याचे सांगून, छत्तीसगढसोबतच, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांच्या स्थापनेलाही 25 वर्षे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्व राज्यांच्या नागरिकांना त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. राज्यांचा विकास राष्ट्राच्या प्रगतीला चालना देतो, या मार्गदर्शक तत्त्वानेच प्रेरित होऊन आपण विकसित भारताच्या निर्मितीच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.