फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
December 31st, 09:04 am
दोहा इथे झालेल्या फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. अलीकडेच फिडे रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्यापाठोपाठ अर्जुनने पुन्हा एकदा मिळविलेले यश जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारतासाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण ठरले आहे.पंतप्रधानांनी 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी चे केले अभिनंदन
December 29th, 03:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी याचे अभिनंदन केले आहे. त्याचा दृढनिश्चय कौतुकास्पद आहे. भविष्यातील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पीचे केले अभिनंदन
December 29th, 03:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये महिला गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन केले आहे. खेळाप्रती त्यांची निष्ठा प्रशंसनीय आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.PM welcomes return of FIDE World Cup to India
August 26th, 11:30 pm
Prime Minister Shri Narendra Modi today expressed immense pride and enthusiasm as India prepares to host the prestigious FIDE World Cup 2025, marking the tournament’s return to Indian soil after more than two decades.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या देशमुखचे ग्रँडमास्टर झाल्याबद्दल अभिनंदन केले.
July 29th, 06:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या देशमुख हिचे 2025 फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याबरोबरच ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तिची हि कामगिरी अनेकजणांना प्रेरणा देईल आणि युवावर्गामध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी लोकप्रियता आणखी वाढेल. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुखचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
July 28th, 06:29 pm
फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल दिव्या देशमुख हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. “कोनेरू हम्पी हिनेही संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा”, असे मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये ब्लिट्झ उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवल्याबद्दल दिव्या देशमुखचे केले अभिनंदन
June 19th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचे लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये ब्लिट्झ उपांत्य फेरीच्या सेकंड लेगमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या हौ यिफान’वर ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये मॅग्नस कार्लसनवर पहिला विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधानांकडून गुकेशचे अभिनंदन
June 02nd, 08:23 pm
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 च्या सहाव्या फेरीत मॅग्नस कार्लसनवर आपला पहिला विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुकेशचे अभिनंदन केले आहे.The National Games are a celebration of India's incredible sporting talent: PM Modi in Dehradun
January 28th, 09:36 pm
PM Modi during the 38th National Games inauguration in Dehradun addressed the nation's youth, highlighting the role of sports in fostering unity, fitness, and national development. He emphasized the government's efforts in promoting sports, the importance of sports infrastructure, and India's growing sports economy.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
January 28th, 09:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की आज उत्तराखंड युवकांच्या ऊर्जेने अधिक झळाळून निघाले आहे. ते पुढे म्हणाले की, बाबा केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगा मातेच्या आशीर्वादाने आज 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. उत्तराखंडच्या स्थापनेचे हे 25 वे वर्ष आहे असे अधोरेखित करून,मोदी म्हणाले की या तरुण राज्यात देशभरातील युवक त्यांची क्षमता प्रदर्शित करणार आहेत.विश्वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने पंतप्रधानांची भेट घेतली
January 03rd, 08:42 pm
पोस्ट केलेले: 03 जानेवारी 2025 8:42PM PIB दिल्ली द्वारे विश्वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताची मान गौरवाने उंचावल्याबद्दल कोनेरू हंपी हिचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी तिची कुशाग्र बुद्धी आणि अविचल निश्चय स्पष्टपणे दिसून येत होते असे नमूद केले .महिलांच्या 2024 फिडे जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या हम्पी कोनेरूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
December 29th, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंपी कोनेरूचे 2024 फिडे (FIDE- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) महिला जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. लाखो लोकांना प्रेरणादायक ठरणाऱ्या तिच्या धैर्य आणि निर्धाराचे, त्यांनी कौतुक केले.बुद्धिबळ विश्वविजेता गुकेश डी. याने पंतप्रधानांची घेतली भेट
December 28th, 06:34 pm
बुद्धिबळ विश्वविजेता गुकेश डी. याने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांनी गुकेशच्या निर्धार आणि निष्ठेची प्रशंसा केली आणि त्याचा आत्मविश्वास प्रेरणादायी असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी असेही सांगितले की, योग आणि ध्यानाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल आजचे संभाषण होते.सर्वात कमी वयाचा जागतिक बुद्धिबळ विजेता ठरल्याबद्दल गुकेश डी याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
December 12th, 07:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात कमी वयाचा जागतिक बुद्धिबळ विजेता ठरलेल्या गुकेश डी याचे आज अभिनंदन केले. त्याची कामगिरी ऐतिहासिक आणि अनुकरणीय असल्याचे सांगून कौतुकाचा वर्षाव केला.लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगैसीला दिल्या शुभेच्छा
October 27th, 11:08 am
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल अभिनंदन केले.45व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान मोदी यांनी केले कौतुक
September 23rd, 01:15 am
45व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले. अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनी पुरुषांच्या आणि महिलांच्या असामान्य बुद्धिबळ संघांचे अभिनंदन केले.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मुलांशी साधला संवाद
January 23rd, 06:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधला.तमिळनाडूत चेन्नई इथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभातले पंतप्रधानांचे संबोधन
January 19th, 06:33 pm
13 व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो.भारतीय क्रीडा विश्वासाठी 2024 ची सुरवात करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.इथे जमलेले माझे युवा मित्र युवा भारत,नव भारताचे प्रतिनिधित्व करतात. यांची ऊर्जा आणि उत्साह क्रीडा विश्वात आपल्या देशाला नव्या शिखरावर नेत आहे.देशभरातून चेन्नईला आलेल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमींना माझ्या शुभेच्छा.आपण सर्वजण एकत्रितपणे खऱ्या अर्थाने एक भारत श्रेष्ठ भारत चे दर्शन घडवत आहात.तामिळनाडूचे स्नेह पूर्ण लोक,लालित्यपूर्ण तमिळ भाषा,संस्कृती आणि खाद्य संस्कृती यामुळे आपणा सर्वांना आपुलकीचा प्रत्यय येईल.त्यांचे आदरातिथ्य आपणा सर्वांची मने जिंकेल याचा मला विश्वास आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आपल्यातल्या कौशल्याचे दर्शन घडवण्याची संधी नक्कीच देईल.त्याचबरोबर आपल्याला आयुष्य भर साथ देणारी नवी मैत्रीही जोडण्यासाठी मदत करेल.पंतप्रधानांच्या हस्ते तमिळनाडूतील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्घाटन
January 19th, 06:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूत चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 सोहळ्याचे उद्घाटन केले. मोदी यांनी प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणीही केली. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचे प्रतीक म्हणून त्यांनी दोन खेळाडूंनी दिलेली स्पर्धेची मशाल एका मोठ्या भांड्यात (cauldron) ठेवली.