आयसीसी महिला विश्वचषक विजेत्या संघांशी पंतप्रधानांनी साधलेल्‍या संवादाचा मजकूर

November 06th, 10:15 am

माननीय पंतप्रधान महोदय, खूप खूप धन्यवाद. आम्हाला येथे येणे हा मोठा सन्मान आणि अभिमानाचा क्षण वाटतो. फक्त या मोहिमेबद्दल एक सांगू इच्छितो, या मुलींनी कमाल केली आहे, देशाच्या मुलींनी कमाल केली आहे. दोन वर्षांपासून मेहनत करत होत्या, सर, इतकी मेहनत की काय सांगू, प्रत्येक सराव सत्रामध्ये जोमाने खेळल्या, प्रत्येक सरावात तेवढ्याच ऊर्जेने मैदानात उतरल्या. इतकी मेहनत घेतली की आज त्या मेहनतीचं फळ मिळाले आहे.

पंतप्रधानांनी आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत साधला संवाद

November 06th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत संवाद साधला. भारतीय संघाने रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात केली होती. पंतप्रधानांनी काल देव दिवाळी आणि गुरुपूरब असल्याने हा दिवस विशेष असल्याचे सांगून सर्व उपस्थितांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ब्रिटनचे महामहिम राजे चार्ल्स तिसरे यांना जलद स्वास्थ्य लाभ व्हावा यासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

February 06th, 11:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आणि भारतीय जनतेच्या वतीने आज, ब्रिटनचे महामहिम राजे चार्ल्स तिसरे यांना जलद स्वास्थ्य लाभ व्हावा यासाठी तसेच उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या.

राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांच्या राज्याभिषेकाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले

May 07th, 09:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांचे त्यांच्या राज्याभिषेकाबद्दल अभिनंदन केले आहे.