पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये कोक्राझार येथे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण

March 13th, 03:00 pm

हवामान खराब असल्यामुळे मी कोक्राझारला येऊ शकत नाही आहे. मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. येथून गुवाहाटीवरूनच तुमच्याशी संवाद साधणे शक्य झाले आहे. मी दिल्लीहून निघालो होतो तुमच्याकडे येण्यासाठी, परंतु मला गुवाहाटीमध्येच उतरावे लागले आणि आता मी गुवाहाटीतूनच तुमचे दर्शनही घेत आहे आणि तुमच्याशी बोलतही आहे.

आसाममधील कोकराझार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4,570 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

March 13th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कोकराझार येथे विविध विकासकामांची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केली. हवामान खराब असल्यामुळे ते प्रत्यक्ष कोकराझारला जाऊ शकले नाहीत असे सांगून त्यांनी उपस्थित नागरिकांची मनापासून क्षमा मागितली. आपण गुवाहाटीहून संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले. बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा आणि रूपनाथ ब्रह्मा अशा या भूमीतील महान व्यक्तिमत्त्वांना आपण अभिवादन केल्याचे ते म्हणाले.इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी लोकांचा ऋणी आहे आणि याची परतफेड या लोकांची सेवा आणि प्रदेशाचा विकास करून मी करेन असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी केरळ दौ-यावर

January 22nd, 02:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2026 रोजी केरळला भेट देणार आहेत. तिरुवअनंतपुरममध्ये सकाळी 10:45 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि आरंभ करण्यात येईल. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी

January 05th, 06:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.