केरळच्या आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 28th, 02:39 pm
आज या प्रतिष्ठेच्या प्रसंगी, तुम्हा सर्वांशी जोडले जाणे माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि प्रसार करण्यात आर्य वैद्यशाळेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या 125 वर्षांच्या प्रवासात या संस्थेने, आयुर्वेदाला उपचाराची एक सशक्त व्यवस्था म्हणून प्रस्थापित केले आहे. आज या निमित्ताने, मी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्नम पी. एस. वारियर जी यांच्या योगदानाचे स्मरण करतो. आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठी असलेले त्यांचे समर्पण, आजही आपल्याला प्रेरित करते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ मधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याला केले संबोधित
January 28th, 02:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केरळमधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी प्रत्येकाला भेटण्याचा योग आल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आर्य वैद्यशाळेने आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि त्याला आधुनिक रुप देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे, आपल्या सव्वाशे वर्षांच्या प्रवासात या संस्थेने आयुर्वेदाला उपचारांची एक प्रभावी पद्धत म्हणून प्रस्थापित केले, असे ते म्हणाले. त्यांनी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्न पी.एस. वारियर यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठीची त्यांची निष्ठा आजही प्रेरणा देत आहे, असे सांगितले.Narendra Modi donates for the well-being of daughters of Government employees
May 23rd, 06:06 pm
Narendra Modi donates for the well-being of daughters of Government employees