हूल दिवसानिमित्त पंतप्रधानांनी शूरवीरांना वाहिली श्रद्धांजली
June 30th, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हूल दिवसानिमित्त, परकीयांच्या जुलमी राजवटीविरुद्ध खंबीरपणे लढा देणाऱ्या, सिदो-कान्हू, चांद-भैरव आणि फूलो-झानो यासारख्या आदिवासी वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. आदिवासी समुदायाची प्रतिष्ठा आणि सन्मान याच्या संरक्षणासाठी, त्यांचा संघर्ष आणि बलिदान कायमच देशवासीयांच्या हृदयात ऊर्जा आणि अभिमानाची भावना निर्माण करणारा असेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी ‘हूल दिवस’ निमित्त आदिवासी वीरांना वाहिली आदरांजली
June 30th, 02:28 pm
‘हूल दिवस’ या आदिवासी वीरांच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या आदिवासी समाजाच्या अदम्य साहस आणि असामान्य पराक्रमाला विनम्र अभिवादन केले. ऐतिहासिक संथाल विद्रोहाच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी सिदो-कान्हू, चांद-भैरव, आणि फूलो-झानो यांसारख्या थोर स्वातंत्र्यसैनिकांसह अन्य असंख्य आदिवासी वीर शहीदांना आदरांजली अर्पण केली, ज्यांनी परकीय सत्तेच्या अत्याचाराविरुद्ध आपले बलिदान दिले.