1996 च्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या विशेष संवादाचा मजकूर
April 05th, 10:25 pm
मला बरं वाटतय की मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आणि मला वाटते की तुमचा संघ असा आहे की आजही भारतातील लोक तो लक्षात ठेवतात….कशी गोलंदाजांची धुलाई करुन तुम्ही आला होता, ते लोक विसरलेले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत साधला संवाद
April 05th, 10:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेत कोलंबो इथे श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत संवाद साधला. हा एक मनमोकळा अनौपचारिक संवाद होता. या संवादादरम्यान, क्रिकेटपटूंनी पंतप्रधानांना भेटून आनंद आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. पंतप्रधानही या संघाला भेटून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. या संघाची प्रभावी कामगिरी भारतीय नागरिकांच्या अद्यापही स्मरणात असल्याचे, विशेषत: कायमस्वरूपी छाप सोडलेला त्यांचा अविस्मरणीय विजय त्यांना अजूनही आठवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या संघाची कामगिरी आजही देशात गाजत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.