देशभरात नागरी क्षेत्रांतर्गत 5862 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह 57 नवीन केंद्रीय विद्यालये (KVS) सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

October 01st, 03:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी देशभरात नागरी क्षेत्रांतर्गत 57 नवीन केंद्रीय विद्यालये (केव्ही) सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 2026-27पासून नऊ वर्षांच्या कालावधीत 57 नवीन केंद्रीय विद्यालये स्थापन करण्यासाठी एकूण 5862.55 कोटी रुपये (अंदाजे) निधीची आवश्यकता आहे. यामध्ये 2585.52 कोटी रुपये (अंदाजे) भांडवली खर्च आणि 3277.03 कोटी रुपये (अंदाजे) कार्यकारी खर्च समाविष्ट आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 साठी आदर्श शाळा म्हणून, पहिल्यांदाच, या 57 केंद्रीय विद्यालयांना बालवाटिकांसह, म्हणजेच पूर्व-प्राथमिक शिक्षणाच्या 3 वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रां अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडण्यास आणि सर्व वर्गांमध्ये 2 अतिरिक्त विभाग जोडून विद्यमान एक KV म्हणजेच KV शिवमोग्गा, कर्नाटकच्या विस्तारास, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

December 06th, 08:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने, देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रा अंतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) उघडायला आणि कर्नाटकात शिवमोग्गा जिल्ह्यात विद्यमान एक KV चा विस्तार करायला मान्यता दिली आहे.केंद्रीय विद्यालय योजना (केंद्रीय क्षेत्र योजना) अंतर्गत सर्व वर्गांमध्ये दोन अतिरिक्त विभाग जोडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची वाढलेली संख्या सामावून घेण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे . या 86 केंद्रीय विद्यालयांची यादी सोबत जोडली आहे.