केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना दिल्या शुभेच्छा
March 10th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दृढनिश्चय, कठोर शिस्त आणि समर्पणासाठी ओळखले जाणारे, सीआयएसएफ देशभरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कर्तव्याप्रती असलेली त्यांची अढळ वचनबद्धता भारताच्या सुरक्षिततेत आणि प्रगतीत मोठे योगदान देते, असे मोदी यांनी म्हटले आहे .सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑगस्टच्या रोजगार मेळाव्यात 51 हजाराहून जास्त नियुक्तीपत्रे करणार प्रदान
August 27th, 07:08 pm
सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्यप्रणाली द्वारे, 51,000 हून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान करतील. यावेळी पंतप्रधान या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करतील.केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
March 10th, 08:30 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.