संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिन समारंभात पंतप्रधान झाले सहभागी

November 26th, 09:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीतील संविधान सदनच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये आयोजित संविधान दिन समारंभात सहभागी झाले.

PM to participate in Constitution Day Celebrations at Central Hall of Samvidhan Sadan on 26th November

November 25th, 04:19 pm

As India marks the 76th anniversary of the adoption of its Constitution on 26th November, PM Modi will participate in the Constitution Day Celebrations at the Central Hall of Samvidhan Sadan. Translated versions of the Constitution of India in nine languages and a commemorative booklet will also be released during the programme.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद

January 23rd, 04:26 pm

आपल्या देशाला विकसित बनवायचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त साधला विद्यार्थ्यांशी संवाद

January 23rd, 03:36 pm

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या पराक्रम दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात युवा मित्रांशी विशेष संवाद साधला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले की 2047 पर्यंत काय साध्य करणे हे राष्ट्राचे ध्येय आहे, या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला एका विद्यार्थ्याने अत्यंत आत्मविश्वासाने “भारताला विकसित राष्ट्र (विकसित भारत) बनवणे” हे उत्तर दिले. पंतप्रधानांनी ‘2047 पर्यंतच का”? असे विचारले असता, तोपर्यंत, भारत जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा आपली सध्याची पिढी देशसेवेसाठी तयार असेल असे उत्तर दुसऱ्या विद्यार्थ्याने दिले.

संविधान दिनानिमित्त संविधान सदनमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी

November 26th, 02:46 pm

संविधान दिनानिमित्त संविधान सदन येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली आणि ते अंतदृष्‍टी देणारे असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात संसद सदस्यांना उद्देशून केलेले भाषण

September 19th, 11:50 am

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी तुम्हाला आणि संपूर्ण देशाला हार्दिक शुभेच्छा देतो. आज, नवीन संसद भवनात आपण एकत्रितपणे उज्वल भविष्याच्या दिशेने एक नवीन प्रवास सुरू करत आहोत. आज, नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी आम्ही विकसित भारताप्रती आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत आणि पूर्ण समर्पण तसेच दृढनिश्चयाने हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःला समर्पित करत आहोत. माननीय सदस्यांनो, ही इमारत आणि विशेषतः हे केंद्रीय सभागृह आपल्या भावनांनी ओतप्रोत आहे. हे सभागृह गहन भावना जागृत करते आणि सोबतच आम्हाला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित देखील करते. स्वातंत्र्यापूर्वी, ही वास्तू एक प्रकारचे वाचनालय म्हणून वापरली जात होते. परंतु स्वातंत्र्यानंतर, ती संविधान सभांच्या सभांचे ठिकाण बनली. इथेच आयोजित बैठकांमध्ये आपल्या राज्यघटनेवर बारकाईने विचार केला गेला आणि आजच्या संविधानाने आकार घेतला. याच वास्तूत ब्रिटिश सरकारने भारताकडे सत्ता हस्तांतरित केली. या हस्तांतरणाचा केंद्रीय सभागृह साक्षीदार आहे. याच केंद्रीय सभागृहात भारतीय तिरंग्याला स्विकृती देण्यात आली आणि आपले राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दोन्ही सभागृहे या केंद्रीय सभागृहात अनेक ऐतिहासिक प्रसंगी चर्चा करण्यासाठी, सहमती दर्शवण्यासाठी आणि भारताच्या भविष्याला आकार देणारे निर्णय घेण्यासाठी एकत्र आली आहेत.

विशेष अधिवेशनात संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पंतप्रधानांचे खासदारांना संबोधन

September 19th, 11:30 am

सभागृहात उपस्थितांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. नव्या संसद भवनात कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्प आणि निश्चयासह आपण नव्या संसद भवनात चाललो आहोत,” असे पंतप्रधान म्हणाले.