पंतप्रधानांनी स्वगणना प्रक्रिया केली पूर्ण, भारतातील नागरिकांना त्यांच्या कुटुंबाची माहिती स्वतः भरण्याचे आणि जनगणना प्रक्रियेत सहभागी होण्याचे केले आवाहन

April 01st, 08:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली. जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली. हा टप्पा घरांची यादी आणि गृहनिर्माण कार्यांशी संबंधित आहे. मोदी म्हणाले की, या जनगणनेत प्रथमच डिजिटल माध्यमांद्वारे माहिती संकलन केले जात आहे. यामुळे भारतातील जनतेला त्यांच्या कुटुंबाचा तपशील स्वतः भरण्याचे सामर्थ्य मिळणार आहे.

भारताच्या जनगणना 2027 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

December 12th, 04:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्‍ये भारताच्या जनगणना 2027 ला मंजुरी देण्‍यात आली. या जनगणनेसाठी अंदाजे 11,718.24 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या खर्चालाही आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.