सातत्यपूर्ण सागरी विमा संरक्षण सुलभ करण्यासाठी 12980 कोटी रुपयांच्या सार्वभौम हमीसह 'भारत सागरी विमा संकोष' तयार करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

April 18th, 03:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सातत्यपूर्ण सागरी विमा संरक्षण सुलभ करण्यासाठी 12,980 कोटी रुपयांच्या सार्वभौम हमीसह 'भारत सागरी विमा संकोष' या नावाने देशांतर्गत विमा संकोष तयार करण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. अगदी अस्थिर सागरी कॉरिडॉरमधून प्रवास करतानाही कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून भारतीय बंदरांपर्यंत आणि त्याउलट माल वाहून नेणाऱ्या जहाजांसाठी भारतीय व्यापाराला परवडणाऱ्या दरात विमा संरक्षण उपलब्ध असेल, याची खातरजमा भारत सागरी विमा संकोषामुळे होणार आहे.

आसाममध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 18th, 12:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये ‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’ प्रकल्पाचा प्रारंभ केला आणि दोन पुलांची पायाभरणी केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आसाम आणि मेघालायचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आसाममध्ये पंतप्रधानांनी केला 'महाबाहु-ब्रह्मपुत्र’चा प्रारंभ आणि दोन पुलांची केली पायाभरणी

February 18th, 12:30 pm