आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 (NH-15) वर गुवाहाटीजवळील बैहाटा चारियाली ते तेजपूर या दरम्यान, 15.11 किमीचा मंगलडोई बाह्यवळण मार्ग वगळता) एकंदर 135.87 किमी लांबीच्या चौपदरी महामार्गाच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; प्रकल्पाचा खर्च 8970.20 कोटी रुपये
August 06th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 (NH-15) वरील 135.871 किलोमीटर लांबीच्या, चौपदरी आणि ‘प्रवेश-नियंत्रित’ गुवाहाटी-तेजपूर मार्गिकेच्या विकासाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ‘राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित अर्थात [NH(O)] अंतर्गत, 8,970.20 कोटी रुपये इतक्या एकूण भांडवली खर्चासह 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' (BOT) या पथकर -आधारित पद्धतीवर विकसित केला जाईल.कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 'मल्टी-ट्रॅकिंग' प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 46 किलोमीटरने वाढणार
July 24th, 04:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बेल्लारी-गुंटकल विभागासाठी तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 1,264 कोटी रुपये इतका आहे.आंध्र प्रदेशातील अमरावती या राजधानीच्या नव्या शहरात ‘जनरल पूल रेसिडेन्शिअल अकोमोडेशन (जीपीआरए)’ च्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 10th, 01:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या राजधानीच्या शहरात 'जनरल पूल रेसिडेन्शियल अकोमोडेशन' (जीपीआरए) अर्थात, सरकारी निवासस्थानांच्या बांधकामाला मंजुरी दिली. अमरावती या राजधानीच्या शहरात, तसेच आंध्र प्रदेश राज्यात राबवला जाणारा हा पहिलाच जीपीआरए प्रकल्प आहे.मंत्रिमंडळाची आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या राजधानी शहरात केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या उभारणीस मंजुरी
June 10th, 01:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत आंध्र प्रदेशातील नव्या राजधानी शहर अमरावती येथे केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या (सीजीजीपीओए) उभारणीला मंजुरी देण्यात आली.हायब्रीड ॲन्युइटी मोड अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग-347B वरील हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी दरम्यानच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण तसेच देशगाव - जुलवानिया दरम्यानच्या 108.643 किलोमीटर रस्त्याच्ये 4 पदरी मार्गात रुंदीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 03rd, 03:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींविषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA - Cabinet Committee on Economic Affairs) आज मध्य प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-347B च्या अद्यवतीकरणाच्या कामांना मंजुरी दिली. या अंतर्गत हायब्रीड ॲन्युइटी मोडवर 4,415.60 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी टप्प्यातील सध्याच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण केले जाईल. यासोबतच देशगाव-जुलवानिया टप्प्याअंतर्गत विद्यमान 2 पदरी रस्त्याचे 108.643 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी रस्त्यात रुंदीकरण केले जाईल.तेलंगणामधील राष्ट्रीय महामार्ग-63 च्या आर्मूर-जगतियाल-मंचेरियाल टप्प्याचे हायब्रिड ॲन्युइटी मॉडेलवर, तर राष्ट्रीय महामार्ग-563 च्या जगतियाल-करीमनगर टप्प्याचे बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वावर 4-पदरी मानकांमध्ये रुंदीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 03rd, 03:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज राष्ट्रीय महामार्ग 63 च्या सध्याच्या 'आर्मूर-जगतियाल-मंचेरियाल' टप्प्याचे 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल'वर आणि राष्ट्रीय महामार्ग 563 च्या 'जगतियाल-करीमनगर' टप्प्याचे 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' तत्त्वावर, 4-पदरी मानकांप्रमाणे रुंदीकरण करण्यास मंजुरी दिली. हे काम तीन कार्य-गटांतर्गत हाती घेतले जाणार असून, या प्रकल्पाची एकूण एकत्रित लांबी 190.76 किमी आहे. यासाठी एकूण एकत्रित भांडवली खर्च 7597.16 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.ओडिशामधील रामेश्वर ते पारादीप दरम्यान नवीन सागरी महामार्गाच्या (एकूण 163.180 किमी लांबीच्या दोन टप्प्यांतील सागरी महामार्गाचा भाग) हायब्रीड ॲन्युइटी मोडवरील बांधकामाला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
June 03rd, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज ओडिशामध्ये रामेश्वर ते पारादीप दरम्यान हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (HAM) वर आधारित दोन टप्प्यांच्या पॅकेजेसद्वारे नवीन सागरी महामार्गाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या महामार्गाची एकूण लांबी 160.18 किमी असून भांडवली खर्च 8300.79 कोटी रुपये अपेक्षित आहे.सार्थक-पीडीएस व्यापक योजनेंतर्गत दोन योजनांचे एकत्रीकरण करून त्यांची अंमलबजावणी सुरु ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
May 27th, 02:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) 16 व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात केंद्राचा वाटा म्हणून 25,530 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह “अन्नधान्य वाहतूक तसेच हाताळणीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक वितरण प्रणालीचे (पीडीएस) स्वयंचलिकरण करण्यासाठीच्या योजनेची (सार्थक-पीडीएस) व्यापक योजना म्हणून अंमलबजावणी सुरु ठेवायला मंजुरी दिली आहे.Cabinet approves two railway projects in Uttar Pradesh and Andhra Pradesh worth Rs 24,815 crore
April 18th, 04:00 pm
The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by PM Modi, has approved two railway projects worth around Rs. 24,815 crore. Covering 15 districts across the states of Uttar Pradesh and Andhra Pradesh, these projects are in line with PM Modi’s vision of New India and aim to make the people in the region Atmanirbhar. They will increase the existing network of Indian Railways by about 601 km.अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यात 1200 मेगावॅट क्षमतेच्या कलाई-2 जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी 14105.83 कोटी रुपयांच्या खर्चाच्या गुंतवणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
April 08th, 04:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यातील लोहित नदीवर कलाई-2 जलविद्युत प्रकल्पाच्या (एचईपी) बांधकामासाठी 14105.83 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी 78 महिन्यांचा आहे.अरुणाचल प्रदेशातील कमले, क्रा दादी आणि कुरुंग कुमे जिल्ह्यांमध्ये 1720 मेगावॅट क्षमतेच्या कमला जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी 26,069.50 कोटी रुपये खर्चाच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
April 08th, 04:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय समितीने अरुणाचल प्रदेशातील कमले, क्रा दादी आणि कुरुंग कुमे जिल्ह्यांमध्ये कमला जलविद्युत प्रकल्पाच्या (HEP) बांधकामासाठी 26,069.50 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी 96 महिने आहे.राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथील एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड या कंपनीच्या खर्चात आणि भांडवली बाजारातील गुंतवणुकीत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
April 08th, 04:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड (एचआरआरएल) प्रकल्पाचा खर्च 43,129 कोटी रुपयांवरून 79,459 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यास आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) द्वारे 8,962 कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे. या वाढीनंतर एचपीसीएलची भांडवली बाजारातील एकूण गुंतवणूक 19,600 कोटी रुपये इतकी होईल.'इमिग्रेशन, व्हिसा, परदेशी नागरिक नोंदणी आणि ट्रॅकिंग' (IVFRT) योजनेच्या विस्ताराला मंत्रिमंडळाची मंजुरी
March 25th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने, 'इमिग्रेशन, व्हिसा, परदेशी नागरिक नोंदणी आणि ट्रॅकिंग' (आयव्हीएफआरटी) योजनेचा कालावधी 31 मार्च, 2026 नंतर आणखी पाच वर्षे पुढे वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आता ही योजना 1 एप्रिल, 2026 ते 31 मार्च, 2031 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सुरू राहील. या योजनेसाठी 1,800 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.Cabinet approves upgradation of NH-160A section in Maharashtra worth Rs.3320.38 crore
February 14th, 01:05 pm
The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by PM Modi, has approved the rehabilitation and upgradation of NH-160A in Maharashtra worth Rs. 3,320.38 crore. The project, proposed in line with PM GatiShakti principles, will reduce travel time and enhance basic infrastructure in the tribal region, contributing to overall economic development.Cabinet approves upgradation of National Highway-56 sections in Gujarat at Rs.4583.64 Crore
February 14th, 01:02 pm
The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by PM Modi, has approved the project for the construction of 4-lane sections in Gujarat with a total project length of 107.67 km, costing Rs. 4583.64 crore. The project will improve connectivity to tribal areas, thereby supporting economic growth and development of the region. It will also enhance connectivity to the Statue of Unity.Cabinet approves the widening of National Highway-167 in Telangana worth Rs.3175.08 crore
February 14th, 01:00 pm
The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by PM Modi, has approved the widening of National Highway-167 from Gudebellur to Mahabubnagar on the Hyderabad-Panaji Economic Corridor to 4-lane standards in Telangana, worth Rs. 3175.08 crore. It will provide seamless connectivity to key economic, social and logistics nodes across Telangana and provide employment opportunities.आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीखाली प्रत्येकी 2 पदरी ट्विन ट्यूब टीबीएम (Twin Tube TBM - अत्याधुनिक यंत्राद्वारे खोदलेले दोन स्वतंत्र समांतर बोगदे) या पाण्याखालील रस्ते बोगद्याच्या बांधकामाला मंत्रिमंडळाची मंजुरी, एका ट्यूबमध्ये रेल्वे पायाभूत सुविधांची तरतूद, प्रकल्पाची एकूण लांबी 33.7 किमी
February 14th, 12:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आसाममधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 15 वरील गोहपूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 715 वरील नुमालीगड या दरम्यान 4 पदरी प्रवेश नियंत्रित हरित संपर्क जोडणीविषयक बांधकामाला काल मंजुरी दिली आहे. याअंतर्गत ब्रह्मपुत्रा नदीखाली 15.79 किमी लांबीच्या रस्ते आणि रेल्वे बोगद्याचा (Road cum Rail Tunnel) समावेश आहे. हा संपूर्ण प्रकल्प एकूण 18,662 कोटी रुपये भांडवली खर्चासह अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC - Engineering Procurement Construction) तत्त्वावर विकसित केला जाणार आहे.दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र व कर्नाटकमधील 12 जिल्ह्यांतील तीन बहुमार्गी प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, भारतीय रेल्वेच्या मार्गांमध्ये 389 किलोमीटरची वाढ
February 14th, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या तीन (3) प्रकल्पांना तसेच 18,509 कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या एकंदर खर्चाला काल मंजूरी दिली. हे प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत-Cabinet approves 4-lane road project in Bihar worth Rs.3,822.31 crore
September 24th, 03:07 pm
The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by PM Modi, has approved the 4-lane Sahebganj-Areraj-Bettiah road project in Bihar at Rs. 3,822.31 crore. The project will improve access to key heritage and Buddhist sites, strengthening the Buddhist circuit and tourism in Bihar. It will also improve employment opportunities, boosting regional growth.बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील भागलपूर-दुमका -रामपूरहाट एकेरी रेलमार्गाचे (177 किमी) दुहेरीकरण करण्याच्या एकूण 3169 कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 10th, 03:05 pm
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील भागलपूर-दुमका -रामपुरहाट एकेरी रेलमार्गाचे (177 किमी ) दुहेरीकरण करण्याच्या एकूण 3169 कोटी रूपये (अंदाजित) खर्चाच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली आहे.