आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 (NH-15) वर गुवाहाटीजवळील बैहाटा चारियाली ते तेजपूर या दरम्यान, 15.11 किमीचा मंगलडोई बाह्यवळण मार्ग वगळता) एकंदर 135.87 किमी लांबीच्या चौपदरी महामार्गाच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; प्रकल्पाचा खर्च 8970.20 कोटी रुपये

August 06th, 04:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 (NH-15) वरील 135.871 किलोमीटर लांबीच्या, चौपदरी आणि ‘प्रवेश-नियंत्रित’ गुवाहाटी-तेजपूर मार्गिकेच्या विकासाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ‘राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित अर्थात [NH(O)] अंतर्गत, 8,970.20 कोटी रुपये इतक्या एकूण भांडवली खर्चासह 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' (BOT) या पथकर -आधारित पद्धतीवर विकसित केला जाईल.

कॉम्प्रेस्ड बायोगॅससाठी भारताची राष्ट्रीय एकात्मिक योजना असलेल्या 'गोबरधन'ला 23,731 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

August 06th, 04:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय परिपत्रक जैवऊर्जा योजना असलेल्या 'गोबरधन'ला (GOBARdhan) एकूण 23,731 कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी दिली आहे.

Cabinet approves 'Samudra Manthan' (National Offshore Exploration Scheme) with an outlay of Rs.84,084 crore

July 31st, 04:17 pm

The Union Cabinet chaired by PM Modi has approved 'Samudra Manthan' – the National Offshore Exploration Scheme with an approved outlay of Rs.84,084 crore for implementation up to FY 2030-31. The Scheme is expected to stimulate significant investments across the exploration and production value chain, creating long-term opportunities for industry, innovation and economic growth.

Cabinet approves revamped Khelo India Scheme and enhanced Assistance to National Sports Federations (ANSFs)

July 31st, 04:15 pm

The Union Cabinet chaired by PM Modi has approved an expanded Khelo India Scheme and enhanced Assistance to National Sports Federations (ANSFs) with a combined outlay of Rs.36,441 crore for the period 2026-27 to 2030-31. Aligned with the vision of Khelo Bharat Niti 2025 and the NEP 2020, the scheme integrates sports with education, fitness, technology and high-performance training.

Cabinet approves continuation of the PM-KISAN Scheme from 2026-27 to 2030-31 with a Financial Outlay of Rs.3.15 lakh crore

July 31st, 04:13 pm

The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the continuation of the PM-KISAN Scheme with an outlay of ₹3.15 lakh crore for 2026–31. The scheme will continue providing direct income support to eligible farmers, strengthening agricultural investment and rural prosperity.

Cabinet approves Pradhan Mantri Surya Sarovar Yojana (PM-SSY) with a total outlay of Rs.5,070 crore

July 31st, 04:11 pm

The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the ₹5,070 crore Pradhan Mantri Surya Sarovar Yojana to develop 5,000 MW of floating solar projects with energy storage. The scheme will boost clean energy, strengthen the grid and create new employment opportunities.

Cabinet approves scheme of Chemical Parks “Bharat Audyogik Vikas Yojana Rasayan (BHAVYA Rasayan)

July 24th, 04:12 pm

The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the BHAVYA - Rasayan Scheme for establishing three dedicated Chemical Parks at a cost of ₹3,030 crore. The scheme, which will run for five years from FY 2026-27 to FY 2030-31, will lead to a cascading effect through enhanced development of downstream sectors of the economy, thereby generating higher employment and promoting greater economic growth, helping achieve the goal of Viksit Bharat @ 2047.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 'मल्टी-ट्रॅकिंग' प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 46 किलोमीटरने वाढणार

July 24th, 04:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बेल्लारी-गुंटकल विभागासाठी तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 1,264 कोटी रुपये इतका आहे.

आज होणार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर फुटीप्रकरणी अधिक कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

July 24th, 06:08 am

उद्या होणार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर फुटीप्रकरणी अधिक कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एका व्हिडिओ संदेशाद्वारे केली आहे.

उत्तर प्रदेशातील NH-34 वर कानपूर ते कबरई 4/6 पदरी प्रवेश-नियंत्रित मार्गाच्या कामास मंत्रिमंडळाची मंजुरी; 7145.14 कोटी खर्चाचा हा प्रकल्प साकारणार बीओटी (टोल) तत्त्वावर

July 01st, 03:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने आज 117.7 किलोमीटर लांबीच्या कानपूर- कबरई प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. हा मार्ग चार पदरी असेल, यावरील पूल आणि इतर बांधकामे भविष्यातील सहा पदरीकरणाचा विचार करून डिझाइन केली जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग कार्यक्रमांतर्गत भोपाळ-कानपूर आर्थिक कॉरिडॉरचा हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

राष्ट्रीय महामार्ग (ओ) योजनेंतर्गत मिश्र वार्षिकी तत्वावर (एचएएम) 6969.67 कोटी रुपये खर्चासह, एकूण 8.1 किमी प्रकल्प लांबीच्या आणि द्वारका द्रुतगती महामार्गाला (एनएच 248 बीबी)दिल्लीस्थित वसंत कुंज परिसरातील नेल्सन मंडेला मार्गाशी जोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग – 148 एई वर उभारण्यात येणाऱ्या 6 पदरी रस्ता बोगद्याच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

July 01st, 03:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने आज राष्ट्रीय महामार्ग (ओ) योजनेंतर्गत मिश्र वार्षिकी तत्वावर (एचएएम) 6969.67 कोटी रुपये खर्चासह, एकूण 8.1 किमी प्रकल्प लांबीच्या आणि द्वारका द्रुतगती महामार्गाला (एनएच 248 बीबी)दिल्लीस्थित वसंत कुंज परिसरातील नेल्सन मंडेला मार्गाशी जोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग – 148 एई वर उभारण्यात येणाऱ्या 6 पदरी रस्ता बोगद्याच्या बांधकामाला मंजुरी दिली.

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2A ला (कोटेश्वर रोड ते विमानतळ कॉरिडोअर) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 10th, 01:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2(A) ला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 5 स्थानकांचा (4 उन्नत आणि 1 भूमिगत) समावेश असलेला 6.032 किलोमीटर लांबीचा कॉरिडोअर बांधला जाणार आहे. टप्पा 2(A) कार्यान्वित झाल्यानंतर, अहमदाबाद-गांधीनगर दरम्यान एकूण 77.63 किलोमीटरचे सक्रिय मेट्रो रेल्वेचे जाळे स्थापित होणार आहे. आश्रम रोड, कोटेश्वर प्राचीन मंदिर, साबरमती रिव्हर, सरदार नगर आणि एअरपोर्ट अशी या टप्पा 2(A) कॉरिडोअरअंतर्गतच्या पाच स्थानकांची नावे आहेत.

आंध्र प्रदेशातील अमरावती या राजधानीच्या नव्या शहरात ‘जनरल पूल रेसिडेन्शिअल अकोमोडेशन (जीपीआरए)’ च्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 10th, 01:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या राजधानीच्या शहरात 'जनरल पूल रेसिडेन्शियल अकोमोडेशन' (जीपीआरए) अर्थात, सरकारी निवासस्थानांच्या बांधकामाला मंजुरी दिली. अमरावती या राजधानीच्या शहरात, तसेच आंध्र प्रदेश राज्यात राबवला जाणारा हा पहिलाच जीपीआरए प्रकल्प आहे.

मंत्रिमंडळाची आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या राजधानी शहरात केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या उभारणीस मंजुरी

June 10th, 01:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत आंध्र प्रदेशातील नव्या राजधानी शहर अमरावती येथे केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या (सीजीजीपीओए) उभारणीला मंजुरी देण्यात आली.

सलग सर्वाधिक कार्यकाळासाठी निवडून आलेले पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मंत्रिमंडळाने केला मंजूर

June 10th, 01:50 pm

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 10 जून, 2026 हा दिवस भारतीय लोकशाहीच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. सर्वाधिक कालावधीसाठी देशाचे निर्वाचित पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. निर्वाचित पंतप्रधान म्हणून 4,399 दिवसांच्या सलग सेवेचा विक्रम प्रस्थापित करून त्यांनी 1952 ते 1964 या काळात 4,398 दिवस सलग सेवा बजावलेल्या जवाहरलाल नेहरू यांचा पूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की, हा प्रसंग भारताची लोकशाही जाणीव, जनतेचा विश्वास आणि सार्वजनिक सहभागाच्या शक्तीचे प्रतीक आहे, तसेच 'राष्ट्र प्रथम' या संकल्पाने प्रेरित नेत्याला लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याचे प्रतिबिंब आहे.

हायब्रीड ॲन्युइटी मोड अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग-347B वरील हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी दरम्यानच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण तसेच देशगाव - जुलवानिया दरम्यानच्या 108.643 किलोमीटर रस्त्याच्ये 4 पदरी मार्गात रुंदीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 03rd, 03:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींविषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA - Cabinet Committee on Economic Affairs) आज मध्य प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-347B च्या अद्यवतीकरणाच्या कामांना मंजुरी दिली. या अंतर्गत हायब्रीड ॲन्युइटी मोडवर 4,415.60 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी टप्प्यातील सध्याच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण केले जाईल. यासोबतच देशगाव-जुलवानिया टप्प्याअंतर्गत विद्यमान 2 पदरी रस्त्याचे 108.643 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी रस्त्यात रुंदीकरण केले जाईल.

तेलंगणामधील राष्ट्रीय महामार्ग-63 च्या आर्मूर-जगतियाल-मंचेरियाल टप्प्याचे हायब्रिड ॲन्युइटी मॉडेलवर, तर राष्ट्रीय महामार्ग-563 च्या जगतियाल-करीमनगर टप्प्याचे बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वावर 4-पदरी मानकांमध्ये रुंदीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 03rd, 03:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज राष्ट्रीय महामार्ग 63 च्या सध्याच्या 'आर्मूर-जगतियाल-मंचेरियाल' टप्प्याचे 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल'वर आणि राष्ट्रीय महामार्ग 563 च्या 'जगतियाल-करीमनगर' टप्प्याचे 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' तत्त्वावर, 4-पदरी मानकांप्रमाणे रुंदीकरण करण्यास मंजुरी दिली. हे काम तीन कार्य-गटांतर्गत हाती घेतले जाणार असून, या प्रकल्पाची एकूण एकत्रित लांबी 190.76 किमी आहे. यासाठी एकूण एकत्रित भांडवली खर्च 7597.16 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.

बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 व 231 वरील खगडिया–पूर्णिया मार्गाचे चौपदरीकरण करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; 143.529 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ₹3,936.05 कोटी खर्च अपेक्षित, प्रकल्पाची उभारणी बीओटी (टोल) तत्वावर

June 03rd, 03:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 आणि 231 च्या खगडिया-पूर्णिया टप्प्याचे बीओटी (BOT - Toll) तत्त्वावर चौपदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. 143.529 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 3,936.05 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील जुने ट्रक आणि बसेस बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला (एनसीआरपीबी) सहाय्य करण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 03rd, 03:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली-एनसीआर प्रदेशातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वच्छ वाहतुकीला चालना देण्यासाठी एका महत्त्वाच्या योजनेला मंजुरी दिली असून, ती दोन वर्ष चालेल. या योजनेला गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालया अंतर्गत, 'राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळा'मार्फत निधी पुरवला जाईल, आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे योजनेची अंमलबजावणी केली जाईल. दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाने शेड्यूल्ड भारतीय विमान कंपन्यांसाठी विमान इंधनाच्या किंमती स्थिर राखण्यासाठी निधीला दिली मंजुरी

June 03rd, 03:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने शेड्यूल्ड भारतीय विमान कंपन्यांना त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामकाजासाठी विमान इंधनाच्या किमतीत स्थैर्य आणण्यास पाठबळ देण्याकरता, तेल विपणन कंपन्यांसाठी 10,000 कोटी रुपये मर्यादेपर्यंतच्या एकरकमी अर्थसंकल्पीय साहाय्याला मंजुरी दिली आहे. तेल विपणन कंपन्यांना हे अर्थसंकल्पीय साहाय्य, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांच्या माध्यमातून आणि बिनव्याजी अग्रिम रकमेच्या स्वरूपात दिले जाईल. पश्चिम आशियातील संकटामुळे इंधनाच्या किमतींमध्ये सध्या सुरू असलेल्या चढ उतारांच्या परिस्थितीत, विमान कंपन्यांकरता स्थिर विमान इंधन दर सुनिश्चित करता यावेत या उद्देशाने तेल विपणन कंपन्यांना हे पाठबळ पुरवले जाणार आहे.