राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर

February 05th, 05:35 pm

विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासात मागील वर्ष जलद प्रगती आणि विकासाचे वर्ष राहिले आहे. हा काळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी परिवर्तनाचा कालखंड राहिला आहे. देश योग्य दिशेने जलद गतीने पुढे जात आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी अतिशय उत्तम पद्धतीने , अतिशय संवेदनशीलतेने हे विषय आपल्यासमोर मांडले आहेत .

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर

February 05th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार प्रस्तावाच्या समर्थनार्थ आपल्या भावना व्यक्त करणे हे आपले भाग्य असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की गेल्या वर्षभरात विकसित भारताच्या प्रवासात वेगाने प्रगती झाली आहे, प्रत्येक क्षेत्रात आणि समाजाच्या सर्व घटकांमध्ये परिवर्तन झालेले दिसून येत असून देश योग्य दिशेने वेगाने पुढे जात आहे. राष्ट्रपतींनी हे विषय अतिशय संवेदनशीलतेने आणि स्पष्टपणे मांडले आहेत असे मोदी यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

July 13th, 10:47 am

राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.