तुझ्यातील सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवलेस यातच सर्व आले , अशा शब्दात पंतप्रधानांनी केले तलवारबाज भवानीदेवीचे कौतुक
July 26th, 10:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची तलवारबाजीतील खेळाडू सी ए भवानीदेवीचे कौतुक केले आहे. भवानी देवीने काल ऑलिंपिक तलवारबाजी खेळातील सामना जिंकून भारताचा या खेळातील पहिलावहिला विजय नोंदवला होता , परंतु पुढील फेरीत तिला पराभव पत्करावा लागला.