First the product, then components and now the semiconductor; this is the definitive next phase of Make in India: PM Modi in Sanand, Gujarat

July 04th, 05:15 pm

PM Modi inaugurated the CG Semi OSAT facility in Sanand, Gujarat and lauded the joint efforts of Indian, Japanese and Thai industry partners. He praised the transition into active commercial production capable of delivering 20 crore units annually, while expressing confidence in the team's ambitious target of reaching 500 crore units. He reiterated that, with a complete commitment to ease of doing business, 140 crore Indians will definitely make the nation developed by 2047.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातच्या साणंद येथील 'सीजी सेमी'च्या 'आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट' (ओसॅट) सुविधेचे उद्घाटन

July 04th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साणंद येथे सीजी सेमी'च्या आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट' (ओसॅट) सुविधेचे उद्घाटन केले. या प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी हा उद्घाटन सोहळा म्हणजे देशाने निर्धारित केलेली उद्दीष्टे पूर्ण करण्याप्रती दृढ कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे उद्गार काढले. देशाने केलेले दृढ संकल्प कोणत्याही प्रकारे न डगमगता प्रत्यक्ष वास्तवात उतरवणे गरजेचे असल्याच्या मुदद्यावर त्यांनी भर दिला. भारत जेव्हा एखादा संकल्प करतो, तेव्हा तो पूर्णत्वास नेतोच; आजचा कार्यक्रम हा त्याचाच पुरावा असल्याचे मोदी म्हणाले.

'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)

June 28th, 11:30 am

'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.