गुजरातमधील सूरत येथे भारताच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेला संवाद
November 16th, 03:50 pm
“तुम्हाला काय वाटतं? कामाची गती योग्य आहे का? तुम्ही ठरवलेल्या वेळापत्रकानुसार काम सुरू आहे का की काही अडचणी येत आहेत?”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सूरत येथे भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला
November 16th, 03:47 pm
गुजरातमधील सूरत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहणी केली. त्यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला आणि प्रकल्पाची प्रगती, विशेषतः निश्चित वेग आणि वेळापत्रकाच्या लक्ष्यांचे पालन याबाबत माहिती घेतली. कामगारांनी यावेळी पंतप्रधानांना प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविनाच सुरळीतपणे पुढे जात असल्याची खात्री दिली.पंतप्रधान 15 नोव्हेंबर रोजी सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देणार
November 14th, 11:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी 10 वाजता ते सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देऊन मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिका या देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतील. हा प्रकल्प भारताच्या उच्च-गती रेल्वे युगात पदार्पणाचे प्रतीक मानला जातो. मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर सुमारे 508 किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी 352 किलोमीटरचा भाग गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगरहवेलीमधून, तर 156 किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात येतो. हा कॉरिडॉर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी महत्त्वाची शहरे जोडणार आहे. हा प्रकल्प भारताच्या वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारा ठरणार आहे.महाराष्ट्रातील मुंबई येथे अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 08th, 03:44 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रामदास आठवले जी, के.आर. नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, अन्य मंत्रीगण, जपानचे भारतातील राजदूत केइची ओनो आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांचे देखील केले उद्घाटन आणि लोकार्पण
October 08th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले तसेच मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करत, मोदी यांनी उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.अलिकडेच पार पडलेल्या विजयादशमी आणि कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाचा उल्लेख करत त्यांनी आगामी दिवाळी सणासाठी शुभेच्छा दिल्या.राजस्थानमधील बिकानेर येथे विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 22nd, 12:00 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीयुत भजन लाल जी, माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधरा राजे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, अर्जुन राम मेघवाल जी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी जी, प्रेमचंद जी, राजस्थान सरकारमधील अन्य मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी मदन राठौर जी, अन्य खासदार आणि आमदारगण, आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधल्या बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले
May 22nd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना, त्यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे स्वागत केले आणि 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून ऑनलाईनरित्या लक्षणीय संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे कौतुक केले. त्यांनी अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले. देशभरातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेल्या सर्व मान्यवर आणि नागरिकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 06th, 02:00 pm
तमिळनाडूचे राज्यपाल एन. रवि, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, तमिळनाडू सरकारचे मंत्री, खासदार, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन
April 06th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.गुजरातमध्ये सूरत इथे सूरत अन्न सुरक्षा संपृक्तता मोहिमेचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 07th, 05:34 pm
आज देशातील आणि गुजरातच्या जनतेने मला तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली आहे हे माझे सद्भाग्य आहे. आणि त्यानंतर, ही माझी सुरतची पहिली भेट आहे. गुजरातने जे काही निर्माण केले, ते देशाने प्रेमाने स्वीकारले. मी तुमचा कायम ऋणी राहीन, माझे आयुष्य घडवण्यात तुम्ही खूप मोठे योगदान दिले आहे. आज, जेव्हा मी सुरतला आलो आहे, तेव्हा मला सुरतचा आत्मा जाणवत नाही किंवा तो मला दिसत नाही हे कसे शक्य आहे? काम आणि दान, या दोन गोष्टी सुरतला अधिक विशेष बनवतात. एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे, सर्वांच्या विकासाचा आनंद साजरा करणे, हे आपल्याला सुरतच्या ठायी ठायी आढळते. आजचा हा कार्यक्रम सुरतच्या याच आत्म्याला,या भावनेला पुढे नेणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूरत अन्न सुरक्षा संतृप्तता अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ
March 07th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सूरत मधील लिंबायत येथे सूरत अन्न सुरक्षा संतृप्तता अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ केला. पंतप्रधानांनी 2.3 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ वितरित केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी सूरत शहराच्या अनोख्या स्वभावावर भर देताना तेथील कामाचा आणि औदार्याचा मजबूत पाया अधोरेखित केला. शहराचे सार विसरता येत नाही कारण ते सामूहिक समर्थनाद्वारे आणि सर्वांचा विकास साजरा करण्यातून परिभाषित केले आहे असे ते म्हणाले.पंतप्रधानांच्या सिलवासा येथील विकास कामांच्या उद्घाटनावेळी दिलेल्या भाषणाचा मजकूर
March 07th, 03:00 pm
दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल्लभाई पटेल, संसदेमधील माझ्या सहकारी कलाबेन डेलकर, सर्व मान्यवर, बंधू-भगिनींनो, नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण
March 07th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी सिल्वासा येथे नमो रुग्णालयाचे उद्घाटनही केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी त्यांना या प्रदेशाशी जोडण्याची आणि सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील समर्पित कामगारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली . इथल्या लोकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे आणि दीर्घकालीन बंध यांचा त्यांनी उल्लेख केला आणि सांगितले की या प्रदेशाशी त्यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत . 2014 मध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव प्रदेशाने केलेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली . या प्रदेशांनी त्यांची क्षमता शक्तीमध्ये परिवर्तित करून आधुनिक आणि प्रगतीशील म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.भारत मंडपम, नवी दिल्ली येथे विकित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 02:15 pm
भारताच्या युवाशक्तीच्या ऊर्जेमुळेच आज हा भारत मंडपमही ऊर्जेने व्यापून गेला आहे आणि ऊर्जामय झाला आहे. आज संपूर्ण देश स्वामी विवेकानंद यांचे स्मरण करत आहे, त्यांना अभिवादन करत आहे. स्वामी विवेकानंदांचा देशातील तरुणांवर प्रचंड विश्वास होता. स्वामीजी म्हणत, की माझा तरुण पिढीवर, नव्या पिढीवर विश्वास आहे. स्वामीजी म्हणत की, माझे कार्यकर्ते तरुण पिढीतून येतील, सिंहाप्रमाणे ते प्रत्येक समस्येवर तोडगा काढतील. विवेकानंदजींचा जसा तुमच्यावर विश्वास होता, तसाच माझा विवेकानंदजींवर विश्वास आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे. त्यांनी भारतातील तरुणांसाठी जे काही विचार केले आणि सांगितले, त्यावर माझी अंधश्रद्धा आहे. खरोखरच, आज स्वामी विवेकानंद असते, आणि त्यांनी एकविसाव्या शतकातील तरुणांमधील ही ऊर्जा, त्यांचे सक्रीय प्रयत्न पहिले असते, तर त्यांनी भारतासाठी नवा विश्वास, नवी ऊर्जा, आणि नव्या स्वप्नांचे बीज पेरले असते.विकसित भारत युवा नेते संवाद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
January 12th, 02:00 pm
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे विकसित भारत युवा नेते संवाद 2025 या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात भारतभरातील 3,000 उत्साही तरुण नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील तरुणांच्या चैतन्यपूर्ण उर्जेने भारत मंडपममध्ये आणलेले सळसळते चैतन्य अधोरेखित केले. देशातील तरुणांवर अपार विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण देश स्मरण करत आहे आणि त्यांना आदरांजली वाहतो आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की तरुण पिढीतून येणारे त्यांचे शिष्य, सिंहांप्रमाणे निधड्या छातीने प्रत्येक समस्येचा सामना करतील, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे स्वामीजींनी तरुणांवर विश्वास ठेवला त्याचप्रमाणे स्वामीजींवर माझी पूर्ण स्वामीजींवर, विशेषत: तरुणांबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर पूर्ण श्रद्धा आहे, असेही ते म्हणाले. आज जर स्वामी विवेकानंद आपल्यामध्ये असते तर 21 व्या शतकातील तरुणांची जागृत शक्ती आणि सक्रिय प्रयत्न पाहून ते नव्या आत्मविश्वासाने भारले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.ओडिशा मधील भुवनेश्वर येथे आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 09th, 10:15 am
ओडिशाचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू जी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन चरण माँझी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एस. जयशंकरजी, ज्युएल ओरांवजी, धर्मेंद्र प्रधानजी, अश्विनी वैष्णवजी, शोभा करंदलाजेजी, कीर्ति वर्धन सिंहजी, पबित्रा मार्गेरिटाजी, ओडिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंहदेव, प्रवती परिदाजी तसंच अन्य मंत्रीगण, खासदार, आमदार, जगभरातून इथे उपस्थित भारतमातेचे सर्व सुपुत्र !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ओदिशामध्ये आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन
January 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातील भुवनेश्वर इथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींचे तसेच जगभरात विविध देशांमध्ये वसलेल्या भारतीय समुदायाच्या (Indian diaspora) नागरिकांचे स्वागत केले. या अधिवेशनाचे उद्घाटन गीत या पुढे, विविध वसेलेल्या भारतीय समुदायाच्या, जगभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्येही वाजवले जाईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. ग्रॅमी पुरस्कार विजेते कलाकार रिकी केज आणि त्यांच्या पथकाने या गाण्याच्या माध्यमातून जगभरात वसलेलेल्या भारतीय समुदाच्या संवेदना आणि भावना संयतरित्या टिपत त्याचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल अभिनंदनही केले.विविध रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.
January 06th, 01:00 pm
तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान जिष्णु देव वर्मा जी, ओदिशाचे राज्यपाल श्री हरि बाबू जी, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री श्रीमान उमर अब्दुल्ला जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, ओदिशाचे मुख्यमंत्री श्रीमान मोहन चरण मांझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अश्विनी वैष्णव जी, जी किशन रेड्डी जी, डॉ. जीतेंद्र सिंह जी, व्ही. सोमैया जी, रवनीत सिंह बिट्टू जी, बंडी संजय कुमार जी, अन्य मंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, अन्य महानुभाव तसेच बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
January 06th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजनचे उद्घाटन केले. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे डिव्हीजनच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन केले.मुंबई हे भारताचे आर्थिक ऊर्जाकेंद्र: पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात मुंबई येथे
May 17th, 07:30 pm
मुंबईतील एका प्रचंड जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यासाठी एक आकर्षक व्हिजन सादर करत भारताच्या विकासात असलेली मुंबईची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. पुरोगामी धोरणे आणि सुदृढ कारभार सुरू ठेवण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.