रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 26th, 11:23 am

आज 51000 हून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये पक्क्या सरकारी नोकरीची पत्रे देण्यात आली आहेत. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तरुणांच्या नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात झाली आहे. तुमची जबाबदारी देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्याची आहे, तुमची जबाबदारी देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याची आहे, देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही तुमची जबाबदारी आहे, कामगारांच्या जीवनात मूलभूत बदल घडवून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तुमची कामे जेवढ्या प्रामाणिकपणे पूर्ण कराल तेवढा त्याचा सकारात्मक परिणाम विकसित भारताच्या प्रवासावर पडलेला दिसेल. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडाल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित

April 26th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन केले; याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नवनियुक्त 51,000 हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण आज करण्‍यात आले. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये या तरुणांच्या कारकिर्दीतील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होते आहे, असे पंतप्रधानांनी आजच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले. देशाची आर्थिक चौकट मजबूत करणे, अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्‍ये योगदान देणे आणि कामगारांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडवणे, अशी आवश्‍यक कर्तव्ये पार पाडण्‍याचे काम या तरुणांना करावयाचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. तरुण ज्या प्रामाणिकतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील त्याचा भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासावर सकारात्मक परिणाम होईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित कले. नव्याने कामावर रूजू होणारे तरुण अत्यंत समर्पण भावाने त्यांची कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

इंडिया स्टील 2025 कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

April 24th, 02:00 pm

आज आणि पुढील दोन दिवस, आपण भारताच्या सनराईज सेक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलाद क्षेत्राच्या सामर्थ्य आणि संधींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. हे एक असे क्षेत्र आहे, जे भारताच्या प्रगतीचा आधार आहे, विकसित भारताचा मजबूत पाया आहे, आणि जो भारतात मोठा बदल घडवून आणणाऱ्या नव्या युगाची गाथा लिहीत आहे. मी इंडिया स्टील 2025 मध्ये आपले मन:पूर्वक स्वागत करतो. मला विश्वास आहे की हा कार्यक्रम नव्या कल्पनांची देवाणघेवाण, नव्या भागीदारींची निर्मिती आणि नवप्रवर्तनाला चालना देणाऱ्या एका नव्या प्लॅटफॉर्मची भूमिका पार पाडेल. पोलादक्षेत्रात एका नव्या पर्वाची ही सुरुवात ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमाला केले संबोधित

April 24th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत झालेल्या इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढचे दोन दिवस भारताच्या उदयोन्मुख क्षेत्राची - स्टील अर्थात पोलाद उद्योग क्षेत्राची क्षमता आणि संधी यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. हे क्षेत्र भारताच्या प्रगतीचा पाया आहे, हे क्षेत्र विकसित भारताचा पाया मजबूत करणारे क्षेत्र आहे, तसेच हे क्षेत्र देशाच्या परिवर्तनाचा नवा अध्याय लिहीत आहे, असे ते म्हणाले. आपल्या संबोधनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. हा कार्यक्रम परस्परांसोबत नवीन कल्पना सामायिक करण्यासाठी, नवीन भागीदाऱ्या स्थापित करण्यासाठी तसेच नवोन्मेषाला चालना देण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून कामी येईल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम पोलाद उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या नव्या अध्यायाशी संबंधित पाया रचेल असे ते म्हणाले.

गुजरातमधील नवसारी येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

March 08th, 11:50 am

काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला. आणि आज, मला मातृशक्तीच्या या महान कुंभमेळ्यात आशीर्वाद मिळाला आहे. महाकुंभमेळ्यात गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला आणि आजच्या या मातृशक्तीच्या महाकुंभात सर्व माता - भगिनींचा आशीर्वाद मिळाला. आजचा हा महिला दिन, गुजरातची माझी मातृभूमी आणि इतक्या मोठ्या संख्येने आपणा सर्व माता, भगिनी आणि मुलींची उपस्थिती, या खास दिवशी तुमचे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल मी मस्तक झुकवून मातृशक्तीला वंदन करतो. गुजरातच्या या भूमीवरून मी सर्व देशवासीयांना, देशातील सर्व माता आणि भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आज येथे गुजरात सफल आणि गुजरात मैत्री या दोन योजनांचा शुभारंभ देखील झाला. अनेक योजनांचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले गेले आहेत. याबद्दलही मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील नवसारी येथे विकासकामांचा प्रारंभ

March 08th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता, भगिनी आणि मुलींच्या प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणि या विशेष दिनानिमित्त देशातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. महाकुंभ मेळ्यात आपण माँ गंगेचा आशीर्वाद प्राप्त केला तर आज मातृशक्तीच्या महाकुंभात माता भगिनींचे आशीर्वाद मिळवल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आज गुजरातमध्ये जी-सफल (G-SAFAL) (गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ऑगमेंटिंग लाईव्हलीहूड्स) आणि जी-मैत्री (G-MAITRI) (गुजरात मेंटॉरशिप अँड एक्सेलरेशन ऑफ इंडिव्हिजुअल्स फॉर इंडिव्हिजुअल्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग रुरल इन्कम) या दोन योजनांचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले. विविध योजनांचा निधी थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आणि या यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान 1 मार्च रोजी "कृषी आणि ग्रामीण समृद्धी" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये होणार सहभागी

February 28th, 07:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मार्च रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

पंतप्रधानांचे मध्यप्रदेशात भोपाळ येथे आयोजित जागतिक गुंतवणूकदार परिषद 2025 मधील उद्घाटनपर भाषण

February 24th, 10:35 am

सर्वप्रथम मला इथे येण्यास विलंब झाला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. विलंब अशासाठी झाला की काल मी जेव्हा इथे पोहोचलो, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आज 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे, आणि त्यांच्या परीक्षेची वेळ आणि माझी राजभवनातून बाहेर पडण्याची वेळ साधारण एकच होती. आणि त्यामुळे शक्यता अशी होती की सुरक्षेच्या कारणाने जर रस्ते बंद झाले तर, मुलांना परीक्षेच्या वेळेत पोहोचणं कठीण झालं असतं. हा अडथळा येऊ न देता मुलं एकदाची परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतरच राजभवनातून निघावं असा विचार मी केला, त्यामुळे मी निघतानाच 15-20 मिनिटं उशीर केला आणि त्यामुळे तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे केले उद्घाटन

February 24th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात भोपाळ येथे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद(GIS) 2025 चे उद्धाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी या कार्यक्रमात येण्यासाठी त्यांना विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दहावी आणि बारावी इयत्तांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे कार्यक्रमाच्या मार्गावर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांना असुविधा होऊ नये म्हणून विलंबाने आल्याचे त्यांनी सांगितले. राजा भोज यांच्या भूमीमध्ये गुंतवणूकदार आणि व्यवसाय क्षेत्रातील अग्रणी यांचे स्वागत करताना आपल्याला अतिशय अभिमान वाटत आहे, असे मोदी म्हणाले. विकसित भारताच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत विकसित मध्य प्रदेश किंवा विकास झालेला मध्य प्रदेश महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मध्य प्रदेश सरकारचे या शिखर परिषदेच्या अतिशय उत्तम आयोजनाबद्दल अभिनंदन केले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर

February 06th, 04:21 pm

आदरणीय राष्ट्रपती जी यांनी भारताच्या कामगिरीविषयी,जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि भारताच्या जनसामान्यांचा आत्मविश्वास, विकसित भारत हा संकल्प या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे आणि देशाला आगेकूच करण्यासाठी दिशाही दाखवली आहे. आदरणीय राष्ट्रपती जी यांचे भाषण प्रेरकही होते, प्रभावीही होते आणि भविष्यासाठी काम करण्याकरिता आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन करणारेही होते. आदरणीय राष्ट्रपती जी यांच्या संबोधनासाठी धन्यवाद देण्याकरिता मी उपस्थित आहे.

Prime Minister Shri Narendra Modi’s reply to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha

February 06th, 04:00 pm

PM Modi, replying to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha, highlighted India’s development journey under his government since 2014. He emphasized Sabka Saath, Sabka Vikas as the guiding principle, focusing on inclusive growth, SC/ST/OBC empowerment, Nari Shakti, and economic self-reliance through initiatives like MUDRA and PM Vishwakarma Yojana.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

July 22nd, 10:30 am

आज श्रावणातील पहिला सोमवार आहे.आजच्या पवित्र दिवशी एका महत्त्वपूर्ण सत्राचा प्रारंभ होत आहे आणि श्रावणातील या पहिल्या सोमवारच्या देशवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांसोबत साधला संवाद

July 22nd, 10:15 am

तब्बल 60 वर्षांच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच एखादे सरकार सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडून आल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. एखाद्या सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करणे ही एक अभूतपूर्व घटना असून, अवघा देश ती अनुभवतो आहे असे पंतप्रधान म्हणाले. हा अर्थसंकल्प अमृत काळातील मैलाचा दगड ठरणार असून, आम्ही गेल्या काही काळात नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प आपल्या नेतृत्वातील सध्याच्या सरकारच्या पुढच्या पाच वर्षांच्या वाटचालीची दिशा ठरवेल तसेच 2047 सालापर्यंत विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नाचा भक्कम पाया रचेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे अभिभाषण आगामी काळात भारताला आणखी विकसित करण्याचा दृष्टीकोन अधोरेखित करणारे : पंतप्रधान

January 31st, 05:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आजच्या अभिभाषणाने 140 कोटी भारतीयांची सामूहिक शक्ती अधोरेखित केली आहे.”

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 31st, 10:45 am

या नव्या संसद भवनात जे पहिले अधिवेशन झाले होते, त्याच्या शेवटच्या दिवसात या संसदेने एक मोठा गौरवशाली निर्णय घेतला होता, आणि तो निर्णय होता - नारी शक्ती वंदन कायदा. आणि त्यानंतर 26 जानेवारीला देखील आपण पाहिले, कशाप्रकारे देशाने कर्तव्यपथावर नारी शक्ती सामर्थ्याचा, नारी शक्तीच्या शौर्याचा, नारी शक्तीच्या संकल्पाच्या शक्तीचा अनुभव घेतला. आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे तेव्हा राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामन जी यांच्याद्वारे हंगामी अर्थसंकल्प सादर केला जाणे, हा एक प्रकारे नारीशक्तीच्या साक्षात्काराचाच पर्व आहे.

संसदेच्या अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

January 31st, 10:30 am

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीत झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे स्मरण केले आणि या पहिल्या अधिवेशनात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकला. महिला सक्षमीकरणाचा नारीशक्ती वंदन कायदा संमत होणे हा आपल्या देशासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.” असे मोदी म्हणाले. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा संदर्भ देत त्यांनी, नारी शक्तीचे सामर्थ्य, शौर्य आणि दृढनिर्धार याची अनुभूती देशाने घेतली आहे असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्याचे महिला सक्षमीकरणाचा उत्सव असे वर्णन केले.