TMC is Anti-North Bengal, Anti-tribal, Anti-tea garden, Anti-women & Anti-youth: PM Modi in Siliguri
April 12th, 01:15 pm
Ahead of the West Bengal Assembly elections, Prime Minister Narendra Modi today turbocharged the BJP’s campaign with a high-energy address in Siliguri, drawing massive public support. Addressing a packed rally in North Bengal, the PM launched a scathing attack on the ruling All India Trinamool Congress (TMC), accusing it of corruption, neglect and fostering a climate of fear.PM Modi’s high-energy speech electrifies the Siliguri crowd
April 12th, 01:00 pm
Ahead of the West Bengal Assembly elections, Prime Minister Narendra Modi today turbocharged the BJP’s campaign with a high-energy address in Siliguri, drawing massive public support. Addressing a packed rally in North Bengal, the PM launched a scathing attack on the ruling All India Trinamool Congress (TMC), accusing it of corruption, neglect and fostering a climate of fear.केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम,2026 (दिनांक 01.04.2026 ते 30.09.2026)साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (पी अँड के) खतांवरील पोषक तत्त्व आधारित अनुदानाच्या (एनबीएस) दरांना दिली मंजुरी
April 08th, 04:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज खते विभागाच्या, खरीप हंगाम 2026 (01.04.2026 ते 30.09.2026) साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (पी अँड के) खतांवरील पोषक तत्त्व आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. खरीप हंगाम 2026 साठी अंदाजित अर्थसंकल्पीय आवश्यकता सुमारे 41,533.81 कोटी रुपये असेल. ही रक्कम खरीप 2025 हंगामाच्या अर्थसंकल्पीय आवश्यकतेपेक्षा अंदाजे 4,317 कोटी रुपयांनी अधिक आहे. खरीप 2025 साठीचा अर्थसंकल्प 37,216.15 कोटी रुपये होता.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.
March 29th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.कृषी आणि ग्राम परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनामधील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद.
March 06th, 01:14 pm
अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील तिसऱ्या वेबिनारमध्ये, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. याआधी, तंत्रज्ञान, सुधारणा आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन वेबिनार झाले आहेत. आज, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होत आहे. तुम्ही सगळ्यांनी अर्थसंकल्प तयार करण्यात तुमच्या मौल्यवान सूचनांच्या माध्यमातून खूप सहकार्य केले आणि तुम्ही पाहिले असेल, अर्थसंकल्पात तुम्हा सगळ्यांच्या सूचना प्रतिबिंबित झाल्या आहेत, खूप कामी आल्या आहेत. पण आता अर्थसंकल्प सादर झाला आहे, या अर्थसंकल्पानंतर त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ देशाला मिळावा, या दिशेनेही तुमचा अनुभव, तुमच्या सूचना आणि सुलभ रितीने अर्थसंकल्पाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळायला हवा. अर्थसंकल्पातील एकेक पैसा ज्या हेतूने दिला गेला आहे, तो पूर्ण कसा करता येईल? लवकरात लवकर कसा करता येईल? तुमच्या सूचना या वेबिनारसाठी खूप महत्वाच्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कृषी आणि ग्रामीण परिवर्तनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित
March 06th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कृषी आणि ग्रामीण परिवर्तन' या विषयावर भर असलेल्या तिसऱ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाशी संबंधित मागील सत्रांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी नमूद केले की, अर्थसंकल्प तयार करताना भागधारकांनी मोलाचे सहकार्य केले होते. आता, अर्थसंकल्पानंतर हे तितकेच महत्त्वाचे आहे की देशाला त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ मिळावा, आणि या दृष्टीने तुमच्या सूचना आणि हा अर्थसंकल्पोत्तर वेबिनार अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर मोदी यांनी यावर भर दिला.'आर्थिक विकास शाश्वत आणि बळकट करताना' या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांचे संबोधन
March 03rd, 11:30 am
गेल्या आठवड्यात, अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील पहिल्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते आणि तो यशस्वी झाला असे मला कळले आहे, आणि अर्थसंकल्पामधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक खूप चांगल्या सूचना दिल्या, सर्वांच्या सक्रिय सहभागीचे मी स्वागत करतो आणि आज या मालिकेतल्या दुसऱ्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मला सांगण्यात आले आहे की, हजारोंच्या संख्येने, अनेक विषयांवर असंख्य लोक आपल्या सूचना देणार आहेत. विषय तज्ज्ञही यामध्ये सहभाग घेणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पावर चर्चा होणे, हा नक्कीच मोठा यशस्वी प्रयोग आहे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या वेबिनरमध्ये सहभागी झाला आहात. मी आफल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपले स्वागत करतो. या वेबिनारचे विषयसूत्र देशाच्या आर्थिक विकासाला सातत्यपूर्ण बळकटी देणे असा आहे. आज, देश आपल्या बळकट अर्थव्यवस्थेमुळे साऱ्या जगाचे आशास्थान झाला आहे, आज जेव्हा जागतिक पुरवठा साखळीची पुनर्रचना होते आहे, तेव्हा अर्थव्यवस्थेची वेगाने होणारी प्रगती विकसित भारताचा मोठा आधार आहे. आमची दिशा स्पष्ट आहे, आमचा संकल्प स्पष्ट आहे, अधिक निर्मिती, अधिक उत्पादन, अधिक संपर्क आणि आता गरज आहे ती अधिक निर्यातीची आणि आज तु्म्हा सर्वांमध्ये निश्चितच विचारमंथन होणार आहे, या विचार मंथनातून येणाऱ्या सूचना यामध्ये मोठी भूमिका बजावतील.आर्थिक विकासाची शाश्वतता आणि बळकटीकरण या विषयावरील वेबीनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
March 03rd, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्प वेबीनार मालिकेच्या दुसऱ्या भागात संबोधित करताना “शाश्वत आणि बळकट आर्थिक विकास” या संकल्पनेवर भर दिला. मागील आठवड्यातील प्रगतीचा आढावा घेताना पहिले वेबिनार अतिशय यशस्वी ठरल्याचे आणि त्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत उत्तम सूचना देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सध्याचे वेबिनार हे देशाच्या आर्थिक विकासासाठी सलग बळ देण्याशी संबंधित आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.भारत-कॅनडा मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदेतील पंतप्रधानांच्या सीईओ फोरम मधील भाषणाचा मजकूर
March 02nd, 02:30 pm
आज आपण भारत-कॅनडा संबंधांमध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहोत. पंतप्रधान कार्नी यांचा एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, परंतु आपल्या संबंधांनी जणू एका प्रकाशवर्षाची झेप घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत विश्वास वाढला आहे, स्पष्टता आली आहे आणि नवीन गती निर्माण झाली आहे. हे सर्व त्या काळात घडत आहे, जेव्हा जग आर्थिक अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे आणि जागतिक आर्थिक व्यवस्था दबावाखाली आहे. अशा वेळी भारत आणि कॅनडातील व्यावसायिक नेत्यांचे हे चिंतन आपल्या भागीदारीचा नवीन आराखडा तयार करेल. आपणा सर्वांच्या दृष्टीकोन आणि बांधिलकीचे मी अभिनंदन करतो.पुद्दुचेरीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
March 01st, 12:00 pm
पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी मनसुख मांडवीय, पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन, सभापती आर. सेल्वम, गृहमंत्री ए. नमस्सिवायम, इतर नेते, पुद्दुचेरीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, वणक्कम्!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये 2700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली
March 01st, 11:45 am
यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, पुद्दुचेरी ही सिद्ध, संत, कवी आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे, जिथे महाकवी सुब्रमण्य भारती यांनी राष्ट्रवादाची ज्योत पेटवली आणि श्री अरविंद व माताजींनी जगाला आध्यात्मिक दृष्टी प्रदान केली.Today, Uttar Pradesh and the entire country are witnessing a new era of world-class infrastructure: PM Modi in Meerut
February 22nd, 01:30 pm
PM Modi inaugurated the Namo Bharat Rapid Rail and the Meerut Metro in Meerut, calling them a new surge of energy for a ‘Viksit Uttar Pradesh’ and a ‘Viksit Bharat’. He highlighted that the government conferred the Bharat Ratna upon Chaudhary Charan Singh ji and inspired by his vision, the double-engine government is working to increase farmers' income. He noted that a transformed Uttar Pradesh has triggered a major economic surge and manufacturing boom.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या 'नमो भारत' प्रादेशिक जलद परिवहन व्यवस्था (आर आर टी एस) चे केले उद्घाटन आणि दिल्ली-मीरत नमो भारत कॉरिडॉर राष्ट्राला केला समर्पित
February 22nd, 01:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीरत इथे 'नमो भारत रॅपिड रेल' या द्रुतगती रेल्वे सेवेचे आणि 'मीरत मेट्रो' मार्गाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचे वर्णन त्यांनी, ‘विकसित उत्तर प्रदेश’ आणि ‘विकसित भारत’ यासाठी एका नवीन ऊर्जेचा संचार असे केले. रॅपिड रेल आणि मेट्रो सेवा एकाच दिवशी एकाच फलाटावरून सुरू होण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे.ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाचे इंग्रजी भाषांतर
February 13th, 08:30 pm
आपल्या सर्वांचे या ग्लोबल बिझनेस समिटमध्ये मी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण येथे “ए डिकेड ऑफ डिसरप्शन, ए सेंच्युरी ऑफ चेंज” या विषयावर चर्चा करत आहोत. विनीतजींचे भाषण ऐकल्यानंतर मला वाटते की, माझे काम खूप सोपे झाले आहे. मात्र एक छोटीशी विनंती करतो, आपल्याला इतके सगळे माहीत आहे, तर कधीतरी इटी मध्येही ते दिसायला हवे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026 ला केले संबोधित
February 13th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026 ला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना, पंतप्रधानांनी जागतिक व्यापार शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले आणि 'संकटांचे दशक, बदलाचे शतक' या संकल्पनेवर आपले विचार मांडले. 21 व्या शतकातील गेल्या दशकात अभूतपूर्व संकटे आली, ज्यात जागतिक महामारी, वेगवेगळ्या भागांमध्ये तणाव आणि युद्धे आणि जागतिक संतुलन बिघडवणारे पुरवठा साखळीतील बिघाड यांचा समावेश आहे, यावर त्यांनी भर दिला. संकट काळातच देशाचे सामर्थ्य समोर येते असे सांगून या अडथळ्यांना न जुमानता, भारताचे दशक उल्लेखनीय विकास, उत्कृष्ट कामगिरी आणि लोकशाहीच्या बळकट करणारे ठरले याबद्दल अभिमान व्यक्त केला.केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनात कशा प्रकारे योगदान देईल याचे सर्वसमावेशक चित्र मांडले आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
February 12th, 02:13 pm
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केलेल्या आपल्या भाषणात या वर्षीचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या आर्थिक परिवर्तनाला कसा हातभार लावेल याचे सर्वसमावेशक चित्र मांडले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. “त्यांनी रिफॉर्म एक्सप्रेस, सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योगांना पाठबळ, कौशल्य विकास, पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांना चालना देण्याचे प्रयत्न अशा मुद्द्यांवर भर दिला”, असे पंतप्रधान म्हणाले.केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
February 01st, 01:38 pm
आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे; यातून देशातील महिलांच्या शक्तीचे सशक्त प्रतिबिंब झळकते. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मलाजींनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा अर्थसंकल्प अफाट संधींचा राजमार्ग आहे. हा अर्थसंकल्प वर्तमानातील स्वप्ने साकार करतो आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करतो. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताच्या दिशेने उंच भरारीचा एक मजबूत पाया आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्प 2026-27 विषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया
February 01st, 01:00 pm
आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य माध्यमाव्दारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून त्यात देशातील सक्षम महिलांच्या भावनांचे प्रतिबिंब दिसत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सलग नऊ वेळा सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असून, हा एक विक्रम आहे असे त्यांनी अधोरेखित केले. हा अर्थसंकल्प म्हणजे अनंत संधींनी परिपूर्ण असा एक महामार्ग असून भारताच्या वर्तमानातील स्वप्ने पूर्ण करणारा तसेच उज्वल भवितव्याची पायाभरणी करणारा आहे, असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पाकडे झेप घेण्यास देशाची तयारी करत आहे, असे त्यांनी म्हटले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथे ‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
September 20th, 11:00 am
आपल्या भावनगरने तर अगदी ‘धमाका‘च केला आहे, हे आत्ता लक्षात आले. आज इथे मला मंडपाबाहेर जनसागर - जणू माणसांचा समुद्र दिसतोय. इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी आले आहात, त्यासाठी आपल्या सर्वांचा खूप-खूप आभारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमाला केले संबोधित; भावनगर, गुजरात येथे 34,200 कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भावनगर इथे 34,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमात केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सर्व मान्यवर आणि उपस्थित जनतेचे स्वागत केले. 17 सप्टेंबर रोजी मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा उल्लेख करत, लोकांकडून मिळालेले प्रेम हा उर्जेचा मोठा स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वकर्मा जयंतीपासून गांधी जयंतीपर्यंत, म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत, देश 'सेवा पंधरवडा' साजरा करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांत गुजरातमध्ये अनेक सेवाभावी उपक्रम झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. शेकडो ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, आतापर्यंत एक लाख व्यक्तींनी रक्तदान केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अनेक शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून, लाखो नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यभरात 30,000 हून अधिक आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत, तिथे सामान्य जनतेला आणि विशेषतः महिलांना वैद्यकीय तपासणी आणि उपचार पुरवले जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी देशभरातील सेवा उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले आणि आभार मानले.