दिल्लीतील राय पिथौरा सांस्कृतिक संकुलामधील पिप्रहवा अवशेषांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असे पंतप्रधानांचे आवाहन

January 02nd, 06:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला राय पिथौरा सांस्कृतिक संकुलामधील ‘पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या’ भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. ‘द लाईट अँड द लोटस :रेलिक्स ऑफ द अवेकन वन (प्रकाश आणि कमळ : प्रबुद्धाचे अवशेष)’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे.

मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी

November 30th, 11:30 am

या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.

भूतानचे राजे (चौथे) यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी मजकूर

November 11th, 12:00 pm

भारत आणि भूतान यांच्यात शतकानुशतकांपासून भावनिक आणि सांस्कृतिक बंध रुजलेले आहेत. म्हणूनच, या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी भारत आणि मी स्वतः देखील वचनबद्ध आहोत.

भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

November 11th, 11:39 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमधील थिंपू येथील चांगलीमेथांग सेलिब्रेशन ग्राउंड येथे भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना शुभेच्छा दिल्या. राजघराण्यातील सन्माननीय सदस्य, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि इतर उपस्थित मान्यवरांना त्यांनी आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाच्या राष्ट्रपतींसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत केलेले निवेदन

October 14th, 01:15 pm

मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे सहा वर्षांनंतर भारतात आगमन होणे ही एक विशेष बाब आहे. भारत आणि मंगोलिया आपल्या राजनैतिक संबंधांची 70 वर्ष तसेच धोरणात्मक भागीदारीची 10 वर्षे साजरी करत असताना ही भेट होत आहे. या निमित्ताने आम्ही आमचा सामायिक वारसा, वैविध्य आणि घनिष्ठ नागरी संबंधांचे प्रतीक म्हणून एक संयुक्त टपाल तिकीट जारी केले आहे.

जपानच्या प्रशासनिक राज्यपालांशी संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले मनोगत

August 30th, 08:00 am

या सभागृहात मला सैतामाची वेगवान धडपड जाणवते, मियागीचे जिद्दीपण जाणवते, फुकुओकाची चैतन्य आणि नाराच्या वारशाची सुगंधी झुळूक अनुभवायला मिळते. आपल्यामध्ये कुमामोतोची आत्मीयता आहे, नागानोची ताजेपणा आहे, शिझुओकाची रमणीयता आहे, आणि नागासाकीचे स्पंदन आहेत. आपण सर्व फुजी पर्वताच्या सामर्थ्याचे आणि साकुराच्या आत्म्याचे प्रतीक आहात. एकत्रितपणे आपण जपानला शाश्नत बनवत आहात.

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन

April 05th, 11:30 am

आज राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांच्या हस्ते ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही, तर हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा भारत आणि श्रीलंकेतील नागरिकांमधील ऐतिहासिक संबंधांचा आणि दाट मैत्रीचा सन्मान आहे.

Prime Minister’s visit to Wat Pho

April 04th, 03:36 pm

PM Modi with Thai PM Paetongtarn Shinawatra, visited Wat Pho, paying homage to the Reclining Buddha. He offered ‘Sanghadana’ to senior monks and presented a replica of the Ashokan Lion Capital. He emphasized the deep-rooted civilizational ties between India and Thailand, strengthening cultural bonds.

थायलंडच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत केलेले निवेदन

April 03rd, 03:01 pm

पंतप्रधान शिनावात्रा यांनी अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपामध्ये बळी पडलेल्यांविषयी मी भारताच्या नागरिकांच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करतो. यामध्ये जे लोक जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आम्ही प्रार्थना देखील करतो.

पंतप्रधान 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार

October 19th, 05:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला ते आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन करतील. हे रुग्णालय विविध नेत्र विकारांसाठी सर्वसमावेशक वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देईल. रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर दुपारी 4.15 च्या सुमाराला ते वाराणसीमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पोलंडमधील वॉर्सा इथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 21st, 11:45 pm

हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे आणि तुमचा उत्साह देखील अद्भुत आहे . मी इथं पाय ठेवल्यापासून पाहतो आहे तुम्ही थकतच नाही आहात. तुम्ही सर्व जण पोलंडच्या वेगवेगळ्या भागातून आला आहात, सर्वांची भाषा, बोली, खाण्याच्या सवयी भिन्न आहेत. मात्र प्रत्येकजण भारतीयत्वाच्या भावनेने जोडलेला आहे. तुम्ही माझे येथे इतके छान स्वागत केले आहे, या स्वागतासाठी मी तुम्हा सर्वांचा, पोलंडच्या जनतेचा खूप आभारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पोलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित

August 21st, 11:30 pm

त्याआधी पोलंडमधल्या भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोष आणि उत्साहात स्वागत केले. सुमारे 45 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या भेटीवर आल्याची बाब पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात नमूद केली. या भेटीत आपण पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेण्यासाठी, तसेच भारत आणि पोलंडमधली संबंध अधिक दृढ करण्यासाठी आतुर असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, या नात्याने तसेच भारत आणि पोलंडमधली एकसामाईक मूल्ये दोन्ही देशांना

व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिंग चिंग यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (1ऑगस्ट 2024)

August 01st, 12:30 pm

पंतप्रधान फाम मिंग चिंग आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. सर्व प्रथम, सर्व भारतीयांच्या वतीने मी, महासचिव न्युयेन फु चोंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

August 27th, 11:30 am

माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.

अरुणाचल प्रदेशात ग्यांगखार येथे शार निईमा त्शो सुम नामयिग ल्हाखांग (गोन्पा) च्या उद्धाटनाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

April 17th, 10:03 am

अरुणाचल प्रदेशात ग्यांगखार येथे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्याकडून शार निईमा त्शो सुम नामयिग ल्हाखांग (गोन्पा)च्या उद्घाटनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी केलेले एक ट्वीट सामाईक करताना पंतप्रधानांनी ट्वीट केलेः

पंतप्रधानांचा लुंबिनी, नेपाळ दौरा (16 मे 2022)

May 16th, 06:20 pm

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी 16 मे 2022 रोजी नेपाळमधील लुंबिनीला भेट दिली. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा नेपाळ दौरा होता तर लुंबिनीला त्यांनी प्रथमच भेट दिली.

श्रीलंकेचे अर्थमंत्री बसील राजपक्षे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

March 16th, 07:04 pm

दिल्लीत अधिकृत दौऱ्यावर असलेले श्रीलंकेचे अर्थमंत्री बसील राजपक्षे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या महापरिनिर्वाण मंदिरामध्ये अभिधम्म दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 20th, 12:31 pm

या पवित्र, मंगल कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी जी किशन रेड्डी, किरण रिजीजू, ज्योतिरादित्य शिंदे, श्रीलंकेतून कुशीनगरला आलेले, श्रीलंका सरकारच्या मंत्रिमंडळातले मंत्री नमल राजपक्षा, श्रीलंकेतून आलेले अति पूजनीय, आमचे इतर अतिथीगण, म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, लाओ पीडीआर, भूतान आणि दक्षिण कोरियाचे भारतातले राजदूत, श्रीलंका, मंगोलिया, जपान, सिंगापूर, नेपाळ आणि इतर देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, सर्व सन्माननीय भिक्षुगण आणि भगवान बुद्धांचे सर्व अनुयायी मित्रांनो!

कुशीनगर येथील महापरिनिर्वाण प्रार्थना स्थळातील अभिधम्म दिन सोहळ्यात पंतप्रधानांचा सहभाग

October 20th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर येथील महापरिनिर्वाण प्रार्थनास्थळी साजरा होणार्‍या अभिधम्मदिनाच्या सोहळ्यात भाग घेतला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल व मुख्यमंत्री तसेच जी किशन रेड्डी, किरेन रिजिजू ,ज्योतिरादित्य सिंधिया हे केंद्रीय मंत्री, नमल राजपक्षा हे श्रीलंकन सरकारमधील मंत्री, श्रीलंकेतून आलेले बुद्धिस्ट शिष्टमंडळ, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, लाओ पीडीआर, भूतान, दक्षिण कोरिया, श्रीलंका, मंगोलिया, जपान, सिंगापूर, नेपाळचे राजपत्रित अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.

उत्तरप्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

October 20th, 10:33 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री किरेन रिजिजू जी, श्री किशन रेड्डी जी, जनरल व्ही के सिंग जी, श्री अर्जुन राम मेघवाल जी, श्री श्रीपाद नायक जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री नंद गोपाल नंदी जी, संसदेतील माझे सहकारी श्री विजय कुमार दुबे जी, आमदार श्री रजनीकांत मणि त्रिपाठी जी, विविध देशांचे राजदूत - राजनीतिज्ञ, इतर लोकप्रतिनिधी, आणि बंधू आणि भगिनींनो!