इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत नेत्यांच्या पूर्ण सत्रात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 19th, 01:00 pm
एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे भारतात स्वागत करताना मला आनंद होतो आहे. ही शिखर परिषद मानव-केंद्रित, संवेदनशील जागतिक एआय परिसंस्था तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास मला वाटतो.इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये नेत्यांच्या पूर्ण सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 19th, 12:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये आज झालेल्या राष्ट्रप्रमुखांच्या पूर्ण सत्राला संबोधित केले. भारताने आयोजित केलेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी झालेल्यांचे त्यांनी आपल्या निवेदनातून पुन्हा एकदा स्वागत केले. ही परिषद मानव केंद्रित आणि संवेदनशील, जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मानवतेने कायमच आव्हानात्मक बदलांचे संधींमध्ये रुपांतरीत केल्याचे इतिहासात अनेकदा घडले असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. आजच्या काळातही अशाच आव्हानात्मक बदलांना मानवतेसाोठीच्या मोठ्या संधीमध्ये रुपांतरीत करण्याचा क्षण लाभला असल्याचे त्यांनी नमूद केले.पवित्र देवनिमोरी अवशेष दर्शनार्थ खुले केल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींकडे व्यक्त केली कृतज्ञता
February 05th, 10:45 am
कोलंबो येथील पवित्र गंगारामया मंदिरात पवित्र देवनिमोरी अवशेष दर्शनार्थ खुले केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली आहे.भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
January 03rd, 12:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
January 03rd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.दिल्लीतील राय पिथौरा सांस्कृतिक संकुलामधील पिप्रहवा अवशेषांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असे पंतप्रधानांचे आवाहन
January 02nd, 06:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला राय पिथौरा सांस्कृतिक संकुलामधील ‘पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या’ भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. ‘द लाईट अँड द लोटस :रेलिक्स ऑफ द अवेकन वन (प्रकाश आणि कमळ : प्रबुद्धाचे अवशेष)’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे.पंतप्रधानांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार
January 01st, 05:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. द लाइट अँड द लोटस: रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन या संकल्पनीय शीर्षकाअंतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली
November 11th, 06:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिंपू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. दिल्ली दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल भूतानच्या राजांनी शोक व्यक्त केला.पंतप्रधानांचे भूतानला रवाना होण्याआधीचे निवेदन
November 11th, 07:28 am
मी 11-12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भूतान राज्याला भेट देणार आहे.भूतानमध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल पंतप्रधानांकडून भूतानच्या नेत्यांचे आणि नागरिकांचे कौतुक
November 09th, 03:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून भूतानमध्ये गेलेल्या बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल, भूतानच्या जनतेचे आणि नेत्यांचे मनापासून कौतुक केले. हे अवशेष शांतता, करुणा आणि सौहार्दाचा कालातीत संदेश देत असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले आहे. भगवान बुद्धांची शिकवण ही उभय राष्ट्रांच्या सामाईक आध्यात्मिक वारसातील पवित्र दुवा आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.Prime Minister Narendra Modi to pay a State visit to Bhutan
November 09th, 09:59 am
PM Modi will pay a State visit to Bhutan from 11-12 November 2025 to strengthen the ties between the two countries. During the visit, the PM will meet His Majesty Jigme Khesar Namgyel Wangchuck, the King of Bhutan and Bhutanese PM Tshering Tobgay. The PM will also attend the 70th birth anniversary celebrations of His Majesty Jigme Singye Wangchuck, the Fourth King of Bhutan and the Global Peace Prayer Festival.नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 12th, 04:54 pm
आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
September 12th, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.जपानच्या प्रशासनिक राज्यपालांशी संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले मनोगत
August 30th, 08:00 am
या सभागृहात मला सैतामाची वेगवान धडपड जाणवते, मियागीचे जिद्दीपण जाणवते, फुकुओकाची चैतन्य आणि नाराच्या वारशाची सुगंधी झुळूक अनुभवायला मिळते. आपल्यामध्ये कुमामोतोची आत्मीयता आहे, नागानोची ताजेपणा आहे, शिझुओकाची रमणीयता आहे, आणि नागासाकीचे स्पंदन आहेत. आपण सर्व फुजी पर्वताच्या सामर्थ्याचे आणि साकुराच्या आत्म्याचे प्रतीक आहात. एकत्रितपणे आपण जपानला शाश्नत बनवत आहात.बिहारच्या गया जीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी पंतप्रधानांचे भाषण
August 22nd, 12:00 pm
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खानजी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमारजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जीतन राम मांझीजी, राजीव रंजन सिंह, चिराग पासवानजी, राम नाथ ठाकूरजी, नित्यानंद रायजी, सतीश चंद्र दुबेजी, राज भूषण चौधरीजी, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरीजी, विजय कुमार सिन्हाजी, बिहार सरकारचे मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी उपेंद्र कुशवाहा जी, इतर खासदार आणि बिहारमधील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील गया येथे 12,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन
August 22nd, 11:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधील गया येथे 12,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधाननांनी ज्ञान आणि मुक्तीचे पवित्र शहर असलेल्या गयाजीला अभिवादन केले आणि विष्णुपद मंदिराच्या या गौरवशाली भूमीतून सर्वांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. गयाजीची भूमी ही अध्यात्म आणि शांतीची भूमी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याच पवित्र भूमीवर भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. गयाजींचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अतिशय प्राचीन आणि समृद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या शहराचा उल्लेख केवळ गया असा न करता तो आदरपूर्वक गयाजी असा केला जावा अशा, या प्रदेशातील जनतेच्या अपेक्षेचा आणि भावनेचा आदर केल्याबद्दल पंतप्रधानांनी बिहार सरकारचे अभिनंदन केले. केंद्र सरकार आणि बिहारमधील सरकारे गयाजीच्या जलद विकासासाठी सातत्याने काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.पवित्र पिप्रहवा अवशेषांचे 127 वर्षांनंतर पुनरागमन झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी केले स्वागत
July 30th, 02:44 pm
भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांचे 127 वर्षांनंतर आज भारतात पुनरागमन झाले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले असून हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.ब्रिक्समध्ये पार पडलेल्या शांतता आणि सुरक्षा यांवरील सत्रामधील पंतप्रधानांचे संबोधन
July 06th, 11:07 pm
जागतिक शांतता आणि सुरक्षा हे केवळ आदर्श नव्हेत, तर ते आपल्या सामाईक हितसंबंध आणि भविष्य यांचा पाया आहेत. मानवतेची प्रगती केवळ शांततामय आणि सुरक्षित वातावरणातच शक्य आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यामध्ये ब्रिक्स खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते.आपण एकत्र येत, आपले एकत्रित प्रयत्न आणि आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.आदमपूर हवाई तळावर पंतप्रधानांनी शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी साधलेला संवाद
May 13th, 03:45 pm
या जयघोषाचे सामर्थ्य नुकतेच जगाने पाहिले आहे. भारत माता की जय हा केवळ जयघोष नव्हे तर भारत मातेची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या देशाच्या प्रत्येक सैनिकाची ही शपथ आहे.देशासाठी काही करू इच्छिणाऱ्या, देशहितासाठी जगणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा आवाज आहे. भारता माता की जय हा जयजयकार मैदानातही घुमतो आणि मोहिमांमधेही. भारतीय सैनिक जेव्हा भारत मातेचा जयजयकार करतात तेव्हा शत्रूचाही थरकाप उडतो.जेव्हा आपली ड्रोन्स, शत्रूची तटबंदी ढासळवतात, जेव्हा सणसणत जाणारी आपली क्षेपणास्त्रे अचूक लक्ष्यभेद करतात तेव्हा शत्रूला ऐकू येतो भारत मातेचा जयजयकार ! जेव्हा रात्रीच्या अंधारातही आम्ही सूर्याप्रमाणे लखलखीत उजेड करणारी कामगिरी करतो तेव्हा शत्रूसमोर तरळतो भारत मातेचा जयजयकार. शत्रूची अण्वस्त्रांची धमकी जेव्हा आपली सैन्यदले पोकळ ठरवितात तेव्हा आकाशापासून पाताळापर्यंत एकच जयजयकार दुमदुमतो-भारत माता की जय!