संविधान हत्या दिनानिमित्त पंतप्रधानांनी लोकशाहीच्या रक्षकांना वाहिली आदरांजली
June 25th, 09:32 am
राज्यघटनेच्या मूल्यांवर झालेल्या गंभीर हल्ल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, ज्या दिवशी मूलभूत अधिकार स्थगित केले गेले, वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यात आली त्याचबरोबर असंख्य राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकले गेले तो 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जातो.'इग्नायटिंग कलेक्टिव्ह गुडनेस: मन की बात @100 - मन की बातचा प्रवास
October 22nd, 11:41 am
2014 मध्ये विजय दशमीला सुरू झालेल्या मन की बात या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमाच्या 100 भागांचा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यापर्यंतच्या कालखंडाचा प्रवासाची अत्यंत बारकाव्यांसह टिपण्यात आला आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इग्नायटिंग कलेक्टिव्ह गुडनेस: मन की बात @ 100' या पुस्तकासाठी विशेष प्रस्तावना लिहिली असून कार्यक्रमाच्या या प्रेरणादायी प्रवासाला आदरांजली वाहणारे हे पुस्तक आता ऑनलाइन उपलब्ध आहे. हे पुस्तक केवळ प्रतिलेखांचा संग्रह किंवा भूतकाळाचे प्रतिबिंब यापलीकड जाऊन ते भारताच्या प्रगतीच्या विकसित होत असलेल्या कथनाचा आकर्षक इतिहास ठरते.