भारताच्या एकात्मतेसाठी आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन
July 06th, 08:00 am
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे स्मरण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ६ जुलै हा राष्ट्रवाद आणि निःस्वार्थ सेवेचे आदर्श जपणाऱ्या असंख्य लोकांसाठी एक विशेष दिवस आहे. आम्ही डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती साजरी करत आहोत, ज्यांचे जीवन शौर्य आणि भारत मातेबद्दलच्या अढळ बांधिलकीचे एक शाश्वत उदाहरण आहे. आधुनिक भारतातील फार कमी नेत्यांनी बुद्धिमत्ता, जनसेवा आणि नैतिक दृढनिश्चय यांचा इतका सखोल संगम साधला असेल, जितका डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी आपल्या जीवनात दाखवून दिला.इटली आणि भारत: हिंद-भूमध्यसागर क्षेत्रासाठी एक धोरणात्मक भागीदारी
May 20th, 11:00 am
भारत आणि इटली मधील संबंध आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. अलिकडच्या वर्षांत, आपले संबंध अभूतपूर्व गतीने विस्तारले आहेत. स्वातंत्र्य आणि लोकशाहीची मूल्ये तसेच भविष्यासाठीच्या समान दृष्टिकोनावर आधारित असलेल्या एका सलोख्याच्या मैत्रीचे रूपांतर आता एका खऱ्या धोरणात्मक भागीदारीत झाले आहे.भारत आणि स्वीडन: एकत्र मिळून विकास, लवचिकता आणि शाश्वतता वाढवणे…
May 19th, 09:00 am
वाढती भू-राजकीय अनिश्चितता, ऊर्जा असुरक्षितता आणि आर्थिक विखंडन अशा काळात, जगासमोर एक महत्त्वपूर्ण निवड आहे — एकतर संकुचित राष्ट्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार करणे किंवा एकत्र मिळून विकास, लवचिकता आणि शाश्वतता वाढवणाऱ्या भागीदारींना अधिक बळकट करणे.सोमनाथ आणि भारताची अजिंक्य जिद्द!
May 08th, 08:30 am
पंतप्रधान मोदींनी एका लेखामध्ये लिहिले आहे की, सोमनाथ आपल्याला एक सांस्कृतिक संदेश देते. त्याच्या समोरील अथांग समुद्र अनादी काळाची जाणीव करून देतो. त्या लाटा आपल्याला सांगतात... की वादळे कितीही भीषण असली किंवा भरती कितीही खवळलेली असली, तरी माणूस नेहमीच सन्मानाने आणि सामर्थ्याने पुन्हा उभा राहू शकतो. लाटा पुन्हा किनाऱ्याकडे परततात, जणू प्रत्येक पिढीला ही आठवण करून देतात की लोकांची जिद्द फार काळ दडपली जाऊ शकत नाही.महात्मा जोतिराव फुलेः एक प्रकाश जो भारताला अजूनही मार्ग दाखवत आहे
April 11th, 08:00 am
महात्मा जोतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, महात्मा फुले हे एक थोर समाजसुधारक होते. त्याशिवाय, त्यांचे जीवन नैतिक धैर्य, सतत शोध घेण्याची वृत्ती आणि सामाजिक हितासाठी अढळ वचनबद्धतेने व्यापलेले होते. महात्मा फुले यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांनी चालवलेल्या चळवळींमुळे त्यांचे सदैव स्मरण केले जाते.चला, आपण सर्व मिळून आपल्या नारी शक्तीला सशक्त करूया!
April 09th, 08:00 am
16 तारखेला, विधिमंडळांमध्ये महिला आरक्षणाला चालना देणारे एक महत्त्वाचे विधेयक मांडण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलावले जाईल. याचे वर्णन केवळ 'कायदेशीर प्रक्रिया' म्हणून करणे हे कमीपणाचे ठरेल; हे भारतातील कोट्यवधी महिलांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. 'जेव्हा महिला प्रगती करतात तेव्हाच समाजाची प्रगती होते' या आपल्या सांस्कृतिक मूल्यांना आणि तत्त्वांना दिलेली ही पुष्टी आहे.India AI Impact Summit 2026: Shaping a human-centric future for AI
February 22nd, 08:47 am
India’s persity, democracy, and demographic dynamism provide the right atmosphere for inclusive innovation. Solutions that succeed in India can serve humanity everywhere, says PM Modi. India brings scale and energy to everything it does, and this India AI Impact Summit was no exception. He adds that this summit has placed the principle of “Sarvajana Hitaya, Sarvajana Sukhaya” at the core.काशी-तमिळ संगम आणि एक भारत, श्रेष्ठ भारतला अभिवादन
January 15th, 08:30 am
पंतप्रधान मोदींनी काशी-तमिळ संगममबद्दलचे आपले विचार शेअर केले असून त्यामध्ये ते म्हणतात, या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक आकलन बळकट करणे, शैक्षणिक आणि लोकांच्या परस्पर देवाणघेवाण देण्यास चालना देणे आणि सामायिक सांस्कृतिक नीतीमूल्ये असलेल्या देशाच्या भागांमध्ये कायमस्वरूपी बंध निर्माण करणे यासारखे अर्थपूर्ण परिणाम दिसून येत आहेत. यामुळे 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला चालना मिळाली आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.सोमनाथ स्वाभिमान पर्व- 1000 वर्षांची अढळ श्रद्धा
January 05th, 08:00 am
पंतप्रधान मोदी यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, सोमनाथ मंदिराच्या दृष्टीने 2026 हे वर्ष महत्त्वाचे आहे. या भव्य मंदिरावर सर्व प्रथम आक्रमण झाले त्याला 1,000 वर्षे पूर्ण झाली आहेत. जानेवारी 1026 मध्ये गझनीच्या महमूदाने श्रद्धा आणि संस्कृतीचे एक महान प्रतीक नष्ट करण्याचा हेतूने या मंदिरावर अत्यंत हिंसक आणि निर्घृण पद्धतीने हल्ला केला. त्यानंतर त्याच्या जीर्णोद्धारासाठी केल्या गेलेल्या अनेक प्रयत्नांमुळे एक हजार वर्षांनंतरही सोमनाथ मंदिर पूर्वीसारखेच वैभवशाली भव्यतेने दिमाखात उभे आहे.2025 – The year of reforms
December 30th, 04:25 pm
PM Modi, in a LinkedIn post, said, India has emerged as the centre of global attention. This is due to the innovative zeal of our people. Today, the world sees India with hope and confidence. They appreciate the manner in which the pace of progress has been accelerated with next-generation reforms, which are cross-sectoral and amplify the nation’s growth potential.Your Money, Your Right
December 10th, 09:00 am
From bank deposits to insurance proceeds, many Indians have money waiting to be claimed. With the Your Money, Your Right initiative, the Government is simplifying the process so every family can recover its rightful savings.भारत आणि नैसर्गिक शेती...या पुढील मार्ग!
December 03rd, 01:07 pm
या वर्षी ऑगस्टमध्ये, तामिळनाडूतील शेतकऱ्यांचा एका गटाने मला भेटून शाश्वतता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आपण नवीन शेती तंत्रांचा कसा वापर करत आहेत याबद्दल माहिती दिली. त्यांनी मला कोइम्बतूर येथे होणाऱ्या नैसर्गिक शेतीवरील शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले. मी त्यांचे आमंत्रण स्वीकारून त्यांना वचन मी कार्यक्रमात त्यांच्यासोबत सहभागी होण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून, काही आठवड्यांपूर्वी, 19 नोव्हेंबर रोजी, मी कोइम्बतूर या सुंदर शहरात आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेत 2025 ला उपस्थित राहिलो. एमएसएमईचा आधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात नैसर्गिक शेतीवरील या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता.संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांचे पत्र
November 26th, 09:00 am
संविधान दिनानिमित्त, 140 कोटी नागरिकांना लिहिलेल्या पत्रात, पंतप्रधान मोदी म्हणतात, 26 नोव्हेंबर हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले, तेव्हापासूनच ह पवित्र दस्तऐवज स्पष्टता आणि दृढनिश्चयाने देशाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करत आहे.सागरी क्षेत्रात भारताचे पुनरुत्थान
October 30th, 02:56 pm
पंतप्रधान मोदी यांनी भारतात होत असलेल्या सागरी परिवर्तनाला देशाच्या गौरवशाली सागरी वारशाची कशी जोड दिली जात आहे, हे अधोरेखित करणारा ब्लॉग लिहिला आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, हरित उपक्रम आणि महत्त्वाच्या सुधारणांमुळे कशाप्रकारे अभूतपूर्व विकास झाला आहे हे त्यांनी विशद केले आहे. पंतप्रधानांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या वाढत्या नील अर्थव्यवस्थेत सहभागी होण्याचेही आवाहन केले.व्ही के मल्होत्रा जी यांना श्रद्धांजली
October 06th, 08:00 am
काही दिवसांपूर्वी, आम्ही आमचे एक ज्येष्ठ नेते, श्री विजय कुमार मल्होत्रा जी यांना गमावले. ते दीर्घ आणि कर्तृत्ववान जीवन जगले, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी अथक परिश्रमाने, दृढनिश्चयाने आणि सेवा वृत्तीने जीवन व्यतीत केले. त्यांच्या आयुष्यातील कोणताही पैलू पाहिल्यास प्रत्येकाला …प्रतिकूल परिस्थितीत धैर्य राखणे, स्वतःपेक्षा सेवेला महत्त्व आणि राष्ट्रीय आणि सांस्कृतिक मूल्यांप्रती बांधिलकीत रुजलेली रा.स्व. संघ, जनसंघ आणि भाजपच्या नीतीमूल्यांचे मर्म समजून घेता येईल,” पंतप्रधान मोदी लिहितात.राष्ट्राच्या सेवेची 100 वर्षे
October 02nd, 08:00 am
शंभर वर्षांपूर्वी, विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. ती काही पूर्णपणे नवीन निर्मिती नव्हती. तर वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपात, काळाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अभिव्यक्त होणाऱ्या भारताच्या चिरंतन राष्ट्र भावनेच्या प्राचीन कालापासूनच्या परंपरेचे एक नवीन स्वरुपातील प्रकटीकरण होते, पंतप्रधान मोदी लिहितात.पंतप्रधानांचे पत्र
September 22nd, 05:23 pm
या सणासुदीच्या मोसमात, 'जीएसटी बचत उत्सव' साजरा करूया! कमी जीएसटी दर म्हणजे प्रत्येक घरासाठी अधिक बचत आणि व्यवसायांसाठी अधिक सुविधा. - पंतप्रधान नरेंद्र मोदीA leader who has connected power to the people
September 22nd, 12:10 pm
PM Modi’s political journey reflects grassroots leadership rooted in the struggles of ordinary Indians. Born in a modest household in Vadnagar, the Prime Minister displayed social responsibility early, running charity stalls and campaigns for underprivileged children. Unlike dynasty-driven leaders, his rise challenged elite politics, emphasizing service, empathy, and direct engagement with citizens.मोहन भागवत जी नेहमीच 'एक भारत श्रेष्ठ भारत'चे खंबीर पुरस्कर्ते राहिले आहेत: पंतप्रधान मोदी
September 11th, 08:00 am
पंतप्रधान मोदींनी रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करताना, स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण आणि 9/11चा हल्ला अशा 11 सप्टेंबर रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासात मोहन भागवत यांचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनाचा टप्पा म्हणून स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 'पंच परिवर्तन' च्या व्हिजनद्वारे मोहन जी भारतीयांना एक मजबूत, समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी सतत प्रेरणा देत असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले आहे.भूपेन दा यांना अभिवादन
September 08th, 08:30 am
भूपेन हजारिका याच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन करताना पंतप्रधान मोदींनी सीमा ओलांडून मानवतेला मूर्त रूप देणारा आसामचा कालातीत आवाज म्हणून अशा शब्दात त्यांचा गौरव केला आहे. भूपेन दा खोलवर लोकसेवेशी जोडलेले होते त्यामुळे त्यांच्या जीवन प्रवासात 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला प्रभावी अभिव्यक्ती मिळाली, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. एनडीए सरकारच्या कार्यकाळात 2019 मध्ये भूपेन हजारिका यांना भारतरत्न बहुमान प्रदान केला हे पंतप्रधानांनी अभिमानाने नमूद केले.