'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी
November 30th, 11:30 am
या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.दृष्टीबाधित महिला टी20 विश्वकरंडक विजेत्या संघाशी पंतप्रधानांचा संवाद
November 28th, 10:15 am
सर, ती गाते हे तुम्हाला कसे कळलेभारतीय अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद
November 28th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग येथे भारतीय अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्यांशी संवाद साधला. मोदींनी खेळाडूंशी अतिशय जिव्हाळ्याने बातचीत केली. त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक केले; आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करत त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. कठोर परिश्रमाने पुढे जाणारे लोक केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर जीवनातील इतर क्षेत्रातही कधीच अपयशी ठरत नाहीत, यावर त्यांनी भर दिला. खेळाडूंनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे त्यांनी नमूद केले.हीपंतप्रधानांनी अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे केले स्वागत
November 27th, 10:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंध महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधला, त्यावेळी खेळाडूंनी स्पर्धेतील त्यांचे अनुभव सामायिक केले.भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने मिळवलेल्या पहिल्या T20 अंध महिला क्रिकेट विश्वचषक विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन
November 24th, 12:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे, अंध महिला T 20 विश्वचषक प्रथमच जिंकून इतिहास रचल्याबद्दल अभिनंदन केले आहे.