जिनोम इंडियाप्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात पंतप्रधानांचे विचार
January 09th, 06:38 pm
आज भारताने संशोधनाच्या जगात एक अतिशय ऐतिहासिक पाऊल उचललेआहे. जीनोम इंडिया प्रकल्पाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, कोविडच्या आव्हानांना न जुमानता, आपल्या शास्त्रज्ञांनी मोठ्या मेहनतीने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. मला आनंद आहे की आयआयएससी, आयआयटी, सीएसआयआर आणि ब्रिक यांसारख्या देशातील 20 हूनअधिक आघाडीच्या संशोधन संस्थांनी या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रकल्पाचा डेटा, 10,000 भारतीयांचा जीनोम क्रम, आता भारतीय जैविक डेटा सेंटरमध्ये उपलब्ध आहे. मला विश्वास आहे की हा प्रकल्प जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो.जिनोम इंडिया प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले विचार
January 09th, 05:53 pm
जिनोम इंडिया प्रकल्पाचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आज आपले विचार व्यक्त केले. भारताने संशोधन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे, असे पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. जिनोम इंडिया प्रकल्पाला 5 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती आणि आपल्या शास्त्रज्ञांनी प्रामाणिकपणे काम केले आणि कोविड महामारीने उभ्या केलेल्या आव्हानानंतरही हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला, असे ते म्हणाले.भारत होतो आहे जगाची वैद्यकशाळा
November 30th, 01:13 pm
जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात गुंतल्या असून, ऑक्सफर्ड ॲस्ट्रा झेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने कोविड -19 लस उत्पादन आणि वितरण यंत्रणा सुरू केली आहे.